पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत आणि ३ स्पर्धक गेले कि महाअंतिम फेरी सुरु होणार आहे. सुरवातीला मार्काप्रमाणे गायक गाणं सादर करतील. आज एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार आहे.

सलील आणि अवधूतच्या मते प्रथम तिघे अभिलाषा, उर्मिला आणि राहुल असावेत. प्रथम क्रमांकावर होती, अभिलाषा चेल्लम. अभिलाषाने "रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते". मुळ गायिका परवीन सुलताना गीत गंगाधर महाम्बरे, संगीत राम फाटक. या गाण्यात अभिलाषाचे उच्चार मराठी वाटले नाहीत. विशेषता "एक" "दाटलेले" हे शब्द नीट आले नाहीत. गाणं सुराला हलले असे अवधूतचे मत होते.



दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. त्याने "स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे" मुळ गायक शंकर महादेवन, गीत मंगेश कुलकर्णी, संगीत केदार पंडित, अल्बम श्रावणधारा. गाणं ठीक झाले. मुळ गाण्याचे बोल इतके खूप छान आहेत असे मला वाटले नाही. राहुल कडव्यातील काही शब्द विसरला. गाणं खूप गंभीर झाले असे सलीलचे मत होते. अवधूतची उपमा छान होती.




तिसऱ्या क्रमांकावर होती अपूर्वा गज्जाला होती. हिने "प्रतिमा उरी धरुनी मी प्रीती गीत गाते" मुळ गायिका लता मंगेशकर, गीत डी व्ही केसकर, संगीत वसंत प्रभू. सुरवातीच्या आलापात स्वर स्थिर लागले नाहीत. गाणं चांगले झाले.



चौथ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "तू माझी माउली कल्पवृक्षाची सावली" मुळ गायक व संगीत छोटा गंधर्व, रचना संत तुकाराम. गाणं खूपच भावपूर्ण म्हटले. चांगले झाले. गाणी स्पर्धक निवडत नाहीत, तर झीची रिसर्च टीम त्यांना गाणी शोधून देते हे आज या गाण्यानंतर कळले.



स्वरदा गोखले आणि मृण्मयी तिरोडकर या दोघींना सगळ्यात कमी मार्क मिळाले. त्यात प्रथम स्वरदाला बोलावण्यात आले. "नयन तुजसाठी आतुरले" मुळ गायिका जोत्स्ना हर्डीकर, गीत वंदना विटणकर, संगीत अनिल मोहिले. काही ठिकाणी सूर गेले असे अवधूतचे मत होते. पण तरीही गाणं खूप छान झाले असे मत होते. पण स्वरदाच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत होती परीक्षकांचे मत ऐकताना असे वाटले.




शेवटचे गाणं सादर करायला आली मृण्मयी तिरोडकर. "माझ्या मना रे ऐक रे जरा हळवेपणा हा नाही खरा", मुळ गायिका बेला शेंडे, गीत शांता शेळके, संगीत सलील कुलकर्णी, अल्बम "माझ्या मना"




Today there are 6 participants. Mega final will start when only 3 participants remains. As per the marks, participants came and presented song. First was Abhilasha Chellam she sung, Rasika tuzyachsathi mi ek geet gate. Second was by Rahul Saksena "swapnat pahilelya nagarit dur kothe". Third song was by Apurva Gajjala. She presented "pratima uti dharuni mi priti geet gate". Forth song was Urmila Dhangar sung "tu mahi mauli kalpavrukshachi savali". Bottom 2 were Mrunmayi Tirodkar and Swarada Gokhale. Swarada Gokhale sung "nayan tuj sathi aturale". Mrunmayi Tirodkar sung "mazya mana re eik jara, halavepana ha nahi khara".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

दुसऱ्या रौऊड साठी लोकगीत म्हणणार आहेत. मताप्रमाणे प्रथम क्रमांकावर होती स्वरदा गोखले. हिने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हावारी" मुळ गायिका शैला चिखले, गीत काशीराम चिंचय, विश्वनाथ चिंचय, संगीत विजय कठीण. हे एक कोळीगीत आहे. पारू ग पारू वेसावची पारू या अल्बममधील हे गाणं आहे. कोरस मध्ये अभिलाषा, अपूर्वा, उर्मिला, मृण्मयी होत्या.




मतांच्या प्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर, हिने "चल रे शिरपा देवाची क्रीपाची औंदा छान" मुळ गायक जयवंत कुलकर्णी, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत प्रभाकर जोग चित्रपट आंधळा मारतो डोळा. आवाज थरथरत होता असा वाटत होते. गाणं ठीक झाला. खूप छान झाले असे वाटले नाही.




तिसऱ्या क्रमांकावर उर्मिला धनगर होती. हिने "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसाव शालू नवा" हे गाणं सदर केले. लावणी आहे. सुलोचना चव्हाण मुळ गायिका, गीत ग. दि. माडगुळकर, संगीत वसंत पवार, चित्रपट मल्हारी मार्तंड. गाणं मस्त झाले. अवधूतच्या काय कॉमेंटस होत्या त्याला तरी कळल्या कि नाही देव जाणे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. हिने पारंपारिक जोगवा सादर केला, "अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मोहू महिषासुर मर्दना लागली" रचना संत एकनाथ. कोरस मध्ये होत्या मृण्मयी, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा. गाणं एकदमबेस्ट.




पाचव्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. ह्याने करूया उदो उदो उदो अंबाबाईचा. हा एक गोंधळ आहे. मुळ गायक प्रल्हाद शिंदे, गीत मधुकर ठाकूर संगीत मधुकर पाठक. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अभिलाषा आणि मृण्मयी होत्या. गाणं चांगले म्हटले.हा मधूनच काही शब्द विसरला. पण तरीही गाणं पुढे म्हटले.



सहाव्या क्रमांकावर आली अपूर्वा गज्जला. हिने एक भजन सादर केले "एक तत्व नाम दृढ धरी मना" मुळ गायक यशवंत निकम गीत शांताराम आठवले संगीत केशवरावभोळे चित्रपट संत ज्ञानेश्वर. गाणं खूपच छान झाले.







आता एलिमिनेशन. आज एक जण बाहेर जाणार आहे. आजच्या निकालाप्रमाणे मृण्मयी बाहेर पडली. सगळ्या स्पर्धकांचे मार्क खालीलप्रमाणे.
स्वरदा गोखले मार्क ८७.३३ मत ४५.६५
अभिलाषा चेल्लम, मार्क ९४.१७ मत १०.७७
उर्मिला धनगर मार्क ९१.२५ मत ११.२८
अपूर्वा गज्जला मार्क ९२.३३ मत ८.८८
राहुल सक्सेना मार्क ९३.५८ मत ५.८६
मृण्मयी तिरोडकर मार्क ८१.५० मत १७.५६





Second round was of folk song. In this round, participant came as per the SMS they received. First was Swarada Gokhale. She sung "ekavira aai tu dongaravari najar hay tuzi kolhavari". This is koligeet. Second was Mrunmayi Tirodkar. She presented "chal re shirpa devachi kirpa". Third song was by Urmila Dhangar. She sung "padaravarati jartaricha mor nachara hava". This is Lavani. Forth song was by Abhilasha Chellam. She sung "Anadi nirgun pragatali bhavani". This is Paramparik jogva. Fifth song was by Rahul Saksena. "karu ya udo udo udo ambabaicha". This is Gonghal. "Sixth song was Apruva Gajjala. She sung bhajan. "ek tatva naam dhrudh dhari mana". Last was eliminations. Today Mrunmayi Tirodkar was eliminated. Marks are as Below

Swarada Gokhale, mark 87.33 SMS 45.65
Abhilasha Chellam, mark 94.17 SMS 10.77
Urmila Dhangar, mark 91.25 SMS 11.28
Apurva Gajjala, mark 92.33 SMS 8.88
Rahul Saksena, mark 93.58 SMS 5.86
Mrunmayi Tirodkar, mark 81.50 SMS 17.56

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत. परीक्षकांचे मार्क ५०% तर SMS ५०% असे प्रमाण आहे. शंतनू मोहित्रा हे आजचे मान्यवर परीक्षक आहेत. प्रथम अभिलाषा चेल्लाम सादर करायला आली कैसी पहेली है ये जिन्दगानी. मुळ गायिका सुनिधी चौहान, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शंतनू मोहित्रा चित्रपट परिणीता. अभिलाषाला काल सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते. अभिलाषाला दोन वरचे "सा" मिळाले. अर्थात शांतनू मोहित्राचे मार्क दाखवण्यात आले नाहीत.




त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याने "लागा चुनरी में डाग छुपाऊ कैसे" हे गाणं सादर केले. मुळ गायक मन्ना डे, गीत साहीर लुधियानवी, संगीत रोशन चित्रपट "दिल हि तो है". गाणं चांगल झाले. भाव जरा कमी आले असा मोहित्राचे मत होते. अवधूतने वरचा सा तर सलीलने नी दिला. आजकाल पल्लवी राहुलशी मराठीत बोलते.




तिसरा क्रमांक होता उर्मिला धनगरचा. "बाबूजी धीरे चलना". मुळ गायिका गीता दत्त. गीत मजरूह सुलतानपुरी. संगीत ओ.पी. नय्यर, चित्रपट आर पार. गाणं ठीक होते. अवधूतला आता उर्मिलाच्या त्याच त्याच धाटणीच्या गाण्याचा कंटाळा आला आहे असा दिसतंय. तो पुन्हा म्हणाला कि जरा वेगळे गाणं म्हण. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




चवथा क्रमांक होता अपूर्वा गज्जलाचा. हिने "रैना बीती जाये, शाम न आये". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत आर. डी. बर्मन. चित्रपट अमर प्रेम. दोन वरचे सा.




पाचवा क्रमांक होता मृण्मयी तीरोडकरचा. "पियू बोले पिया बोले", मुळ गायिका श्रेया घोषाल, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शांतनू मोहित्रा, चित्रपट परिणीता. गाणं खूप छान झाले नाही. सुरवात तर खूपच घसरली. दोन नी मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले. "रात अकेली है, बुझ गये दिये". मुळ गायिका आशा भोसले, गीत मजरूह सुलतानपुरी, संगीत एस. डी. बर्मन. चित्रपट ज्वेल थीफ. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. खूपच लाडिक झाले. दोन ध मिळाले.




Today 6 participants are remaining in the competition. Now percentage of SMS is 50% and marks is 50%. Todays special guest is Shaantanu Mohitra. First round was of hindi songs. Abhilasha chellam presented "kaisi Paheli hai ye jindagani". Then came Rahul Saksena, who performed Laga chunari me daag chhupau kaise". Third was Urmila Dhangar, who sung "babuji dheere chalana". Then Apurva Gajjala sung "raina beeti jaaye sham na aaye" Bottom tow were Mrunmayi and Swarada. Mrunmayi Tirodkar presented "piyu bole piya bole". Last song in the first round was presented by Swarada Gokhale "raat akeli hai buz gaye diye".




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


"कंठातच रुतल्या कान्हा कुठे ग बाई कान्हा" हे गाणं अभिलाषा चेल्लामने सदर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे, संगीत श्रीनिवास खळे यांचे. गाणं खूपच छान म्हटले. हिचे उच्चार इतके सुंदर आहेत कि हि तमिळ आहे असे वाटतच नाही. ह्या गाण्यात अजिबातच श्वास घ्यायला जागा नाहीये म्हणजे खूप कठीण आहे म्हणायला.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का", मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी सावळाराम संगीत वसंत प्रभू यांचे. ही कशी काय eliminate झाली असा प्रश्न पडला शांतनूला.




"आज कुणीतरी यावे" हे गाण सादर करायला आली स्वरदा गोखले. मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर संगीत सुधीर फडके. चित्रपट मुंबईचा जावई. गाणं चांगला झालं. सूर खूपच छान लागले होते. अवधूत आणि सलीलची जुगलबंदी मस्तहोती.




मग आली मृण्मयी तिरोडकर, "वादल वार सुटलं ग". मुळ गायिका लता मंगेशकर गीत शांत शेळके संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर., गीत शिल्प या अल्बम मधील हे गाणं आहे. रेडीओ वर गाणं म्हटलंय असा वाटले असे सलीलचे म्हणणे होते. शंतनुने दिलेल्या सूचना खूपच चांगल्या होत्या.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, "कस काय पाटील बर हाय का काल काय ऐकले ते खरं हाय काय". मुळ गायिका सुलोचना चव्हाण, गीत जगदीश खेबुडकर, संगीत वसंत पवार चित्रपट सवाल माझा ऐका. कोरसला अपूर्वा, स्वरदा, अभिलाषा, राहुल आणि मृण्मयी होते. उर्मिलाच्या आवाजाला कुकरची उपमा फक्त अवधूतच देऊ शकतो.




मग आला राहुल सक्सेना "ये गो ये मैना ". मुळ गायक अजय गोगावले गीत व संगीत अजय- अतुल चित्रपट जत्रा. सत्तुने सुरवातीला साथ दिली मस्त होती. त्यावर अवधूतची कॉमेंट पण मस्त.




आता बेस्ट पेर्फोर्मेर सांगण्याची वेळ आली आहे. शांतनू मोहित्राच्या मते सगळ्यात छान गाणं अपूर्वा गज्जलाचे झाले.





Then marathi song round started. This round was based on SMS. Abhilasha Chellam sung "kanthatch rutalya tana". Then Apurva Gajjala, "hrudayi jaga tu anuraga pritila ya deshil ka ". Swarada Gokhale sung "aaj kunitari yaave". Mrunmayi Tirodkar presented "vadal wara sutala ga" Urmila Dhangar sung "kasa kaay patil bar hay ka kaal kaay eikale te khara hay kay". Rahul Saxena presented "ye go ye ye maina". Today there is no elimination, so Best Performer was announced. Shaantanu Mohitra felt best performer was APurva Gajjala.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ६ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील आठवड्यात "Call back" असल्यामुळे या आठवड्यात कोणीच बाहेर पडणार नाहीये. आज प्रथम फेरी तालावर आधारित होती. सगळ्या स्पर्धकांनी आज तालावर अधातीर गाणी म्हटली. आजचे मान्यवर परीक्षक होते, पं. सुरेश तळवलकर.

कार्यक्रमाला सुरवात केली स्वरदा गोखले हिने. स्वरदाने भजनी तालावरील गाणे सादर केले. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी." हे गाणं सादर केले. ताल भजनी, मुळ गायिका फैयाज, रचना संत गोरा कुंभार, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक गोरा कुंभार. गाणं चांगले झाले. सलीलने प तर अवधूतने ध दिला. पं. सुरेश तळवलकर प्रत्येक गाण्यानंतर तालाबद्दल पण बोलणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम खूपच शैक्षणिक झाला आहे.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, हिने केरवा या तालावर आधारित गाणं सादर केले. "घननिळा लाडीवाळा झुलवू नको हिंदोळा", ताल केरवा, मुळ गायिका माणिक वर्मा, गीत ग.दि. माडगुळकर, संगीत सुधीर फडके. हे गाणं "उमज पडेल तर" या चित्रपटातील आहे. स्वराला स्थिरता नाहीये असे मान्यवर परीक्षकांना वाटले. अतिजास्त हरकती घेतल्या असा एकून सूर होता. दोघांनी "ध" दिला.



मग राहुल सक्सेना आला त्याने अध्ध्या त्रिताल या तालावर आधारित "मी मानपमान", मुळ गायक रामदास कामत, गीत कुसुमाग्रज संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक ययाती आणि देवयानी. ह्याचे उच्चार खूपच हिंदी वाटले. गाणं चांगले म्हटले. याच्याशी पल्लवी आणि मान्यवर परीक्षक हिंदीत बोलत होते. तानबाजी जरा जास्त झाली असा सलीलला वाटले. दोघांनी "ध" दिला.



मृण्मयी तिरोडकरने दादरा तालावर आधारित मालवून टाक दीप हे गाणे म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत सुरेश भट, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. "पेंगते अजून रात" स्वराला चुकले. स्वराला स्थिरता नव्हती या गाण्यात असा मान्यवर परीक्षकांचा शेरा होता. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे मत होते, अवधूतला गाणं आवडला नाही. अवधूतने म तर सलीलने ध दिला.




अपूर्वा गज्जलाने केहरवा तालावर "कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" गे गाणं सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी. सावळाराम, संगीत वसंत प्रभू, ताल केहरवा. गाणं खूपच छान झाले. सलीलने व अवधूतने ध दिले.



त्यानंतर आली अभिलाषा चेल्लाम. हिने आज दादरा तालावर "सखी ग मुरली मोहन मोही मना." मुळ गायिका अशा भोसले, गीत पी सावळाराम संगीत पं हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, ताल दादरा. सुरवातीला "पुन्हा" हा शब्द जरा वेगळा म्हणाला. तसेच अंतऱ्यात शृंगाराची हा शब्द पण बेसूर झाला. पण नाहीतर गाणं खूपच चांगले झाले. अवधूतने ध तर सलील ने नी दिला.





Program started with 6 participants today. Because of last week's call back there is not going to be any elimination this week. Today participant are going to sing the song on "Taal". Swarada Gokhale sung "nirgunacha sang dharila jo avadi". Urmila dhangar sung "ghannila ladiwala zulavu nako hindola". Rahul Saxena sung "mi manapman". Mrunmayi Tirodkar sung "malvun taak deep". Apurva Gajjala sung "kalpavruksha kanyesathi lavuniya baba gela". Abhilasha Chellam sung, "sakhi ga murali mohan mohi mana".



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

आता दुसऱ्या फेरीतील गाणी सुरु झाली. स्वरदा गोखले आली "मम आत्मा गमला " गे गाणं सादर करायला. मुळ गायक बाल गंधर्व, गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत भास्करबुवा बखले, नाटक संगीत स्वयंवर. गाणं चांगले झाले. दोन ध मिळाले.




मग अपूर्वा गज्जलाने "शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत शांता शेळके, संगीत हेमंत भोसले. दोन ध मिळाले.





मग आली मृण्मयी तिरोडकर, हिने नाचू किती कंबर लचकली हे गाणं सादर केले. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा व राहुल होते. मुला गायिका आशा भोसले, गीत जगदीश खेबुडकर, संगीत राम कदम, चित्रपट सुगंधी कट्टा. कोरस खूपच छान झाले. कोरस खूपच छान झाले. दोन ध मिळाले. मृण्मयी जरा दडपणाखाली होती असा वाटत होते.




त्यानंतर अभिलाषा चेल्लामने कशी झोकात चालली कोल्याची पोर हे गाणं म्हटले. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अपूर्वा आणि मृण्मयी होत्या. मुळ गायिका आशा भोसले, गीत पी. सावळाराम संगीत राम कदम, चित्रपट मोलकरीण. गाणं खूपच सुंदर म्हटले. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.





मग उर्मिला धनगर आली हिने हिच्या नेहमीच्या धाटणीतले गाणे म्हटले. वाडीवरल्या वाटा गेल्या आबालाच्या पारी. मुळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना. धो. महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. अवधूतने गोड शब्दात सांगितले कि त्याच त्याच धाटणीची गाणी न गाता जरा वेगळी गाणी गा. हे अवधूतने सांगितले म्हणजे जरा आश्चर्य आहे. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




मग राहुल सक्सेना ने "दाटून कंठ येतो ओठात येई गाणे." मुळ गायक डॉ. वसंतराव देशपांडे, गीत शांता शेळके, संगीत अनिल-अरुण, चित्रपट अष्टविनायक. गाणं खूपच छान म्हटले. आणि या गाण्यात उच्चार देखील चांगले आले. पाडगावकरांची कविता आहे ज्यात ते असे वर्णन करतात कि पाउस कोसळत नाही पण आभाळ भरून येते, तसा मुलीच्या लग्नात बाप दिसतो. तसेच गाणे झाले, असे सलीलने म्हटले. दोन वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून आज राहुल आणि अभिलाषा म्हणण्यात आले. आणि गम्मत अशी आहे कि कार्यक्रम झाल्यावर "आजचा आवाज" मध्ये ज्याचे गाणं दाखवत त्यात. राहुल आणि उर्मिलाला दाखवण्यात आले.







अंतिम फेरीतील शेवटच्या २ उपविजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार, तर १ लाख २५ हजार रुपये, रोख रुपये. सुधीर मांडके डेवलपर्स कडून
क्रोमा कडून विजेत्याला १ लाख ३० हजार रुपयाचे Home Package, २ उपविजेत्यांना चाळीस हजार रुपयांचे home Package. अंतिम फेरीतुन बाहेर पडणाऱ्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी वीस हजारांचे Home Package.
अंतिम फेरीतील विजेत्याला १ लाख रुपयाची Music system, २ उपविजेत्यांना पन्नास हजार रुपयांची Music system. शेवटच्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजारांची Music System.


एकूण बेरीज
विजेता १ : १.२५ + १.३ + १ = ३.५५
उपविजेते २ : ०.५ + ०.४ + ०.२ + ०.५ + ०.२५ = १.८५
उरलेले २ : ०.२ + .२५ = ०.४५



In the second round, Swarada Gokhale sung "mam atma gamala ga". Apurva Gajjala sung, "sharad sundar chanderi rati swapnacha zulat zula". After this Mrunmayi Tirodkar sung "nachu kiti nachu kiti, kambar lachakali". Abhilasha Chellam sung, "kashi zokat chalali kolyachi por". Then came Urmila Dhangar who presented "vadivarlya wata gelya abalachya pari". Rahul Saxesa sung "datun kanth yeto othat yei gane" Best performer was given to Abhilasha and Rahul.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ७ स्पर्धकांना घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आजचे मान्यवर परीक्षक होते "जतीन पंडित".

कार्यक्रमाची सुरवात मृण्मयी तिरोडकरने "ये दिल सून रहा हैं तेरी दिल कि जुबान". मुळ गायिका कविता कृष्णमुर्ती, गीत मजरूह सुलतानपुरी, तर संगीत जतीन-ललित यांचे. चित्रपटाचे नाव आहे "खामोशी द म्युझिकल". गाणं जरा ठीक ठीक झाले. मस्त झाले नाही. सलीलने ध तर अवधूतने प दिला




अपूर्वा गज्जलाच्या हिंदी गाण्याने झाली. "जरा सी आहट होती हैं". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत कैफी आजमी यांचे तर संगीत मदनमोहन यांचे. गाणं हकीकत या चित्रपटातील. जतीन पंडितने या गाण्याची गोष्ट सांगितली. ऐकण्यासारखी आहे. दोन नी मिळाले.




स्वरदा गोखलेने "सुनो सजना पपिहेने" म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि हे आये दिन बहार के या चित्रपटातील गाणं आहे. गाणं ठीक झालं. दोघांनी ध दिले.



जतीनजीने "रुठके हमसे कही जब कही जायोगे तुम" हि ओळ अवधूतच्या आग्रहाखातर म्हटली.




ऋतुजा लाडने "सुनियो जी अरज म्हारी ओ बाबूलाल" म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत गुलजार, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, "लेकीन" या चित्रपटातील गाणं आहे. गाणं म्हणावे तितके रंगले नाही. अवधूतने प तर सलीलने ध दिला.



उर्मिला धनगरने "हवा में उडता जाये मोरा लाल दुपट्टा मलमल का". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत रमेश शास्त्री, संगीत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे "बरसात". हिच्या आवाजात लताची गाणी अगदीच शोभत नाहीत. आणि या गाण्यात उगाचच काही हरकती घेतल्या. अवधूतने म तर सलीलने ध दिला.



अभिलाषा चेल्लामचे "चाहे तुम कुछ ना कहो मैने सून लिया ये साथी प्यार का मैने चून लिया". मुळ गायक साधना सरगम आणि उदित नारायण. गीत मजरूह सुलतानपुरी, संगीत जतीन-ललित यांचे. हे गाणं "जो जिता वो सिकंदर" या चित्रपटातील आहे. गाणं अप्रतिम झाले. त्यानंतर सलील आणि अवधूतने देखील हेच गाणं म्हटले. जतीनजींनी सांगितलेली गोष्ट छान होती. अवधूतने नी तर सलीलने सादिला.




राहुल सक्सेना ने "साजण साजण मै करू, केसरीया बालम", राजस्थानी लोकगीत आहे. गाणं ठीक झाले. मला फार आवडले नाही. सलीलने व अवधूत दोघांनी "नी" दिला.




Today program started with 7 participant. Today's special judge was Jatin Pandit. Program started with Mrunmayi tirodkar's "ye dil sun raha hai teri dil ki juban". Then came Apurva Gajjala who sung "jara see ahat hoti hai". Third performance was by Swarada Gokhale who sing "Suno sajana pahihene". After that Rutuja Laad sung "suniyo ji araj mhari o babulal". Urmila Dhangar sung "Hava me udata jaye mora laal dupatta malmal ka". Abhilasha Chellam sung "Chahe tum kuch na kaho maine sun liye ye sathi pyar ka maine chun liya", Rahul Saxena sung "Sajan sajan mai karu, kesariya balam".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

स्वरदा गोखलेनी "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती" मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर व संगीत दत्ता डावजेकर. हे गाणं पाठलाग या चित्रपटातील आहे. गाणं ठीक झाले. दोन ध मिळाले.




अपूर्वा गज्जलाने "नभ उतरू आलं चिंब थरथरवल." मुळ गायिका आशा भोसले, गीत ना. धो. महानोर यांचे तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत. गाणं जैत रे जैत या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. पण दोन ध मिळाले.



मृण्मयी तिरोडकरने चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा पेटला त्याला कशी सावरू". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत वसंत बापट यांचे तर संगीत पं हृदयनाथ मंगेशकरांचे. हे गाणं उंबरठा या चित्रपटातील आहे. गाणं मध्ये मध्ये थोडे कणसूर झाला. दोन ध मिळाले.




ऋतुजा लाड हिने पं. जितेंद्र अभिषेकी यांचे "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, गीत शंकर रामाणी यांचे आहे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे. स्वराभिषेक या अल्बम मधील हे गाणं आहे. दोन ध मिळाले.



राहुल सक्सेना ने "अबीर गुलाल उधळीत रंग." म्हटले. मुळ गायक पं. जितेंद्र अभिषेकी, संत चोखामेळा यांची हि रचना आहे. संगीत राम फाटक यांचे आहे. मध्ये मध्ये सुरात काहीतरी चूक झाली. कानाला बरोबर वाटले नाही. सलीलने प व अवधूतने ध दिला.




अभिलाषा चेल्लाम ने "गुलजार गुलछडी ... बाई माझ्या पायाला बांधला आहे भोवरा". मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर. संगीत वसंत देसाई. चित्रपट " धन्य ते संताजी धनाजी" मधील हे गाणं आहे. गाणं मस्तच झाले. दोन सा मिळाले.





उर्मिला धनगरने "राया अशी जवळ मला घ्याल का? " मुळ गायिका क्षमा बाजीकर, गीत शांता शेळके संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे. हे गाणं हे बंध रेशमांचे मधील आहे. परत उर्मिलाने तिला जमेल अश्या पठडीतले गाणं म्हटले. त्यामुळे गाणं उत्तमच झाले. दोन्ही वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून अभिलाषा चेल्लाम चे नाव घोषित झाले.




After Hindi round, Marathi round started, Swarada Gokhale sung ya dolyanchi don pakhare phiratil tumachya bhovati". Apurva Gajjala sung "Nabh utari aala chimb tharatharaval", Mrunmayi Tirodkar sung "chand matala matala". rutuja laad sung "randhrat perili mi ashadh dard gani". Rahul Saxena performed "abeer laal udhalit rang", Abhilasha Chellam sung "guljar gulchhadi, bai mazya payala bandhalay bhovara". Urmila Dhangar sung "raya ashi javal mala ghyal ka ?". Best performer of the day was "Abhilasha Chellam"