Showing posts with label Swapnil Bandodkar. Show all posts
Showing posts with label Swapnil Bandodkar. Show all posts

सारेगमप - १८ मे २०१०, भाग १

आजच्या कार्यक्रमाची सुरवात अवधूत आणि स्वप्नीलच्या "सावधान सावधान वणवा पेट घेत आहे." आजच्या भागात एक स्पर्धक बाहेर जाणार. आज कोणाचेही मार्क दिसणार नाहीत. स्पर्धेची सुरवात आनंदी जोशीच्या गाण्याने झाली.

हिने "घन राणी साजणा" हे गाणं म्हटले. मुळ गायक आशा भोसले. गीत शांता शेळके, संगीत श्रीधर फडके, हे गाणं ऋतू हिरवा.

Today program started with Avadhoot and Swapnil's "savdhan savdhan vanva pet ghet aahe". Competition first song was by Anandi Joshi. she sung "ghan rani sajana". Original singer Asha Bhosale, Lyrics Shanta Shelke, Music Shreedhar Phadke, This song is from "Rutu hirva" album



विजय गटलेवारने "आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे भिजवून रात्र गेली." मुळ गायक सुरेश वाडकर, गीत सुरेश भट, संगीत रवी दाते, हे गाणं "हे रंग मैफलीचे" या अल्बम मधील आहे.

Vijay Gatlewar sung "Atach amrutachi barsun raat geli, atach aang maze bhijavun raat geli". Original singer Suresh Wadkar, Lyrics Suresh Bhat, Music Ravi Date. This song is from "He rang maifiliche".




अनिकेत सराफ ह्याने "कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी, पैश्यात भावनेचा व्यापार पहिला मी. " मुळ गायक आणि संगीत श्रीधर फडके, गीत अनिल कांबळे. गाणं चांगले म्हटले.

Aniket Saraf sung "kovalya phulancha bajar pahila mi, paishyat bhavanecha vyapar pahila mi". Original singer and music is by Shreedhar Phadake, Lyrics is by Anil Kambale.



मग आला ज्ञानेश्वर मेश्राम "माय मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलांना भेटाया.", मुळ गायक रवींद्र साठे, गीत जगदीश खेबुडकर, संगीत अच्युत ठाकूर. हे गाणं चिमणी पाखरं या चित्रपटातील आहे.

Dnyaneshwar Meshram sung "Maay mandir halale, lage kalas phutaya, aaj ghayal pakshini jaai pilanna bhetaya". Original singer is Ravindra Sathe, Lyrics is written by Jagdish Khebudkar, Music is Achyut Thakur. This song is from a marathi movie Chimani Pakhara.



अपूर्वा गज्जला हिने "चंद्राने टाकलीय ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी, वेडापिसा वारा कसा बेभान होऊन फिरला, देही वणवा पिसाटला", हे गाणं सादर केले. मुळ गायिका सुनिधी चौहान, गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी. हे गाणं "हाय काय नाय काय" या चित्रपटातील होते. गाणं मस्तच म्हटले. अवधूतच्या कोट्या जोरदार होत्या.

Apurva Gajjala sung "Dehi vanava pisatala". This song is sung by Sunidhi Chouhan, Lyrics is by Sandeep Khare, Music is by Salil kulkarni. This song is from movie "haay kaay naay kaay".



Part 2

सारेगमप - १८ मे २०१०, भाग २

Part 1

मग मंगेश बोरगावकर आला. त्याने "ये ये ये ना प्रिये, तुजवीण राहू कसे" हे गाणं सादर केले. मुळ गायक स्वप्नील बांदोडकर, गीत मिलिंद जोशी, संगीत अशोक पत्की, हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे.

Mangesh Borgaokar presented "ye ye ye naa priye, tujvin rahu kase". Original singer Swapnil Bandodkar, Lyrics Milind Joshi, Music is by Ashok Patki. This song is from album "Tu maza kinara".



राहुल सक्सेना आला आणि त्याने "जिया धडक धडक जाये " हे गाणं सादर केले. मुळ गायक फतेह अली खान, गीत असीम रझा, संगीत फैजल रफी, रोहेल कयात. हे गाणं हिंदी चित्रपट "कलियुग" मधील आहे.

Rahul Saksena sung "Jiya dhadak dhadak jaaye". Original singer Fateh Ali Khan, Lyrics Aseem RRaza, Music Phaisal Rafi, Rohel Kayat. This song is from hindi movie "Kaliyug".



अनिरुध्ध जोशीने "हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने" हे गाणं म्हटले. मुळ गायक सोनू निगम, गीत जगदीश खेबुडकर, संगीत जितेंद्र कुलकर्णी. हे गाणं नवरा माझा नवसाचा या चीत्रापातील आहे. अवधूतने ध दिला.

Anirudhdha Joshi sung "Hirva Nisarg ha bhavatine, jeevan safar kara mastine". Original singer Sonu Nigam, Lyrics Jagdish Khebudkar, Music Jitendra Kulkarni. This song is from "Navra maza navsacha" movie.




आता निकाल. ८ स्पर्धकांपैकी, ३ स्पर्धक डेंजर झोन मध्ये होते, ते असे, अनिकेत सराफ, मंगेश बोरगावकर आणि विजय गटलेवार. विजय गटलेवार आणि अनिकेत सराफ या दोघांना सारखेच मार्क होते. त्यामुळे पुन्हा एक एक गाणे दोघांनी म्हटले आणि त्याप्रमाणे अनिकेत सराफ बाहेर गेला.

Among 8 participants, 3 were in danger zone today. They were, Aniket Saraf, Mangesh Borgaokar and Vijay Gatlewar. There was a tie break between Aniket Saraf and Vijay Gatlewar. Both of them sung one song again and then judges decided to eliminate Aniket Saraf.

सारेगमप - १७ मे २०१०, भाग १

आज "आपली आवड" अशी गाणी स्पर्धक म्हणणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक "स्वप्नील बांदोडकर ". कार्यक्रमाची सुरवात आज ज्ञानेश्वर मेश्रामने केली. ह्याने "आई भवानी तुझ्या कृपेने तारिशी भक्ताला" म्हटले. मुळ गायक अजय गोगावले, गीत आणि संगीत अजय- अतुल. हे गाणं सावरखेड एक गाव या चित्रपटातील आहे. स्वप्नीलचे मार्क आज दिसणार नाहीत. अवधूतचे मार्क "प".

Todays special judge is Swapnil Bandodkar. Today's program started with Dnyaneshwar Meshram. He sung "aai bhavani tuzya krupene tarishi bhaktala". Original singer Ajay Gogavale. Lyrics and Music Ajay-Atul. This song is from "Savarkhed ek gaav". Avadhoot gave "pa". Swapnil's marks are not shown.




आनंदी जोशीने "हसरा लाजरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. " मुळ गायक पद्मजा फेणाणी जोगळेकर, गीत कुसुमाग्रज, संगीत गिरीश जोशी. हे गाणं "रंग बावरा श्रावण" या अल्बम मधील आहे. अवधूतने प दिला.

Anandi Joshi performed "Hasra lajra jarasa lajra, sundar sajira shravan aala". Original singer Padmaja Phenani-Joglekar, Lyrics Kusumagraj, Music Girish Joshi. This song is from "Rang bavra shravan". Avadhoot gave "pa".



विजय गटलेवारने "चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है.". मुळ गायक आणि संगीत गुलाम अली, गीत हसरत मोहनी. अवधूतने "प" दिला.

Vijay Gatlewar sung "chupake chupake raat din aasu bahana yaad hai". Original singer and music Gulam Ali. Lyrics Hasrat Mohni. Avadhoot gave "pa"




अनिकेत सराफ ने "भेट माझी तुझी सांजवेळी घडे, आता उरी या अंबरी चांदण्याचे सडे" म्हटले. मुळ गायक आणि संगीत मिलिंद इंगळे, गीत सौमित्र. हे गाणं "सांजगारवा" या अल्बम मधील आहे. मध्ये शब्द विसरला. आवाजात एक वेगळाच कंप जाणवत होता. अवधूतने "प" दिला.

Aniket Saraf sung "Bhet tuzi mazi sanjveli ghade, ata uri ya ambari chandnyache sade". Original singer and music Milind Ingale. Lyrics Soumitra. This song is from "Sanj Garva"



अनिरुध्ध जोशी "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात" हे गाणं स्टेजवर घेऊन आला. मुळ गायक वसंतराव देशपांडे, गीत वा. रा. कांत, संगीत श्रीनिवास खळे. अवधूतने "नी" दिला.

Anirudhdha Joshi sung "Bagalyanchi maal phule ajuni ambarat". Original singer Vasantrao Deshpande, Lyrics Va. Ra. Kant. Music Shriniwas Khale. Avadhoot gave "Ni"for his song



Part 2

सारेगमप - १७ मे २०१०, भाग २

Part 1

त्यानंतर आला मंगेश बोरगावकर. याने "आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाये है". मुळ गायक के. के. गीत जावेद अख्तर संगीत विशाल शेखर. हे गाणं ओम शांती ओम मधील आहे. गाणं ठीक होते. अवधूतने "प" दिला.

Mangesh Borgaokar sung "akho me teri ajab si ajab si adaye hai". Original singer K.K. Lyrics Javed Akhtar, Music Vishal Shekhar. This song is from movie "Om shanti om".



अपूर्वा गज्जलाने एक हिंदी गाणं म्हटले "गुंज सा है कोई एक तारा". मुळ गायिका कविता सेठ, गीत जावेद अख्तर संगीत अमित त्रिवेदी. हे गाणं वेक अप सिद या सिनेमातील आहे. या गाण्यात हिला अनिकेतने साथ दिली. अवधूतने "ध" दिला.

Apurva Gajjala sung "gunj sa hai koi ek tara". Original singer Kavita Seth, Lyrics Javed Akthar, Music Amit Trivedi. This song is from "wake up sidh".



राहुल सक्सेनाने मी शिवाजी राजे बोलतोय या सिनेमातील " हे राजे जी रं जी रं ". मुळ गायक सुखविंदर सिंग, गीत अजित परब, गुरु ठाकूर, प्रकाश चव्हाण, संगीत अजय - अतुल - समीर. हे गाणं राहुलने या पूर्वीही याच मंचावर म्हटले आहे. अवधूतने "ध" दिला.

Rahul Saksena sung "he raje jee ra jee ra jee raje re ji ji" from movie "mi shiwaji raje bhosale bolatoy". Original singer Sukhvindar Singh, Lyrics Ajit Parab-Guru thakur- Prakash Chavhan, Music Ajay-Atul-Sameer.




आज ८ स्पर्धकांपैकी कमी मार्क असलेल्या शेवटचे ३ स्पर्धक, विजय गटलेवार, आनंदी जोशी, अनिकेत सराफ.

Bottom three participant among the 8 remaining pariticipants are Vijay Gatlewar, Anandi Joshi, Aniket Saraf.




कार्यक्रमाची सांगता स्वप्नील बांदोडकरच्या गाण्याने झाली.