Showing posts with label Tushar Shinde. Show all posts
Showing posts with label Tushar Shinde. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.




मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.




त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.





मग कृष्णाने ढोलकी वाजवली.







स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.





कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.





Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २० ऑक्टोबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


पाचवं गाणं म्हणायला आला तुषार शिंदे. याने आज हिंदी गाणं सादर केले. "झनक झनक तोरी बाजे पायलिया". उच्चार तितकेसे ठीक वाटले नाहीत. शेवटचे जास्त लयीतील गाणं तितकेसे नीट जमले नाही. अभिजीतच्या मते भाव इतके नीट आले नाहीत. सलीलच्या मते तालासुरात गायला, पण भाव नीट आले नाहीत. अवधूतचे पण तेच मत होते. "प" मिळाला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले ती पण आज हिंदी गाणं म्हणणार "पान खाये सैया हमारो" सुरवातीला आवाज जरा कापला असे वाटले आणि गाणं जरा लाडिक झाले असे वाटले. पण नंतर गाणं छान झाले. गाणं सुरु झाल्यावर मात्र आर्या आम्बेकारची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. अभिजीतच्या मते गाणं खूप छान झाले नाही. सलीलच्या मते गाणं technically गायली नाहीस तर performance साठी गायली. अवधूतच्या मते भाव आणायला गेली तिथे बेसूर झाली. "ध" मिळाला.



सातवे गाणं गायला आली अभिलाषा चेल्लाम. हिने "नदिया किनारे हरायी आए कंगना,". गाणं खूपच छान म्हटले. Once More मिळाला. अभिजीतला खूप आवडले. सलीलला पण खूप जास्त आवडले. सलीलच्या अवधूतवरील कोट्या मजेशीर होत्या. सर्वोत्कृष्ट असे सलील म्हणाला. अवधूतला पण खूप आवडलं. अप्रतिम गायली असे अवधूत म्हणाला. वरचा "सा" मिळाला.




आठवे गाणं म्हणायला आली अश्विनी देशपांडे "हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते".परवीन सुलताना च्या पद्धतीने चांगली गायलीस असे सलील म्हणाला. अभिजीतला पण आवडले. अवधूतला आवडले, पण उच्चार नीट आले नाहीत असे त्याचे मत होते. "प" मिळाला. "



आता राहुल सक्सेना आला शेवटचे गाणं म्हणायला. याने म्हटले "तुमसे मेरी लगन लगी" हिंदी गाणे असल्याने तसा उच्चाराचा काही प्रश्न नव्हता याला. अभिजीतच्या मते गाणं एकदम बरोबर होते अजिबात चूक झाली नाही. सलीलला पण आवडले. अवधूतला आवडले "ध" मिळाला.




आता निकाल. आज यातील ४ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आज पुढे गेले अभिलाषा चेल्लाम, राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे.





हा निकाल अगदीच धक्कादायक होता. राहुल सक्सेनाला होता ध+ध, अश्विनीला ध+प, अपूर्वा गज्जलाला ध+ध, आणि ऋतुजा लाडला "ध + नी" पण ती पुढे गेली नाही. आणि सगळ्यात जास्त चांगला Permormance होता राहुलचा असे अभिजित म्हणाला पण नंतर लगेच बदलला, कारण खर तर अभिलाषाला ध + सा होता. यात एकाच परीक्षकाचे मार्क दाखवतात आणि इतर परीक्षकांचे नाही. त्यामुळे या मधून बरेचदा, मार्कांचा फेरबदल आणि कोणाला आत आणायचे आणि कोणाला बाहेर टाकायचे हे ठरवतात असे पुन्हा लक्षात आले आहे.



Fifth song was by Tushar Shinde, "zanak zank mori baje payaliya". Sixth song was by Swarada Gokhale, "Paan khaye saiya hamaro". Seventh song was by Abhilasha Chellam, "Nadiya kinare harayee aayee kangana". After this Ashwini Deshpande sung "Hume tumase pyar kitna" . Last song was by Rahul Saxena "tumase meri lagan lagi".

And the result was very surprising and partial. Abhilasha Chellam, Rahul Saxena, Ashwini Deshpande and Apurva Gajjala went ahead. The mystery is Rutuja laad better marks than Ashwini and Apurva, but still she was nominated for the knock out round.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १९ ऑक्टोबर २००९. - भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दिवाळीच्या मुहुर्तावर उपान्त्य फेरीचा श्रीगणेशा होतो आहे. एकून ३६ स्पर्धकांना घेउन सुरु झालेली स्पर्धा आता १८ स्पर्धकांना घेउन उपान्त्य फेरीपर्यंत पोचली आहे. आज ९ स्पर्धक आले आहेत. आजचे मान्यवर परीक्षक होते अभिजित.

स्पर्धेची सुरवात अभिलाषा चेल्लामच्या गाण्याने झाली. हिने "अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू " हे गाणं म्हटले. खूपच छान म्हटले. अभिजितने गाण्याची खूपच स्तुती केली. सलीलला पण खूप आवडले. अवधूतला पण आवडले. आज फक्त सलीलचे मार्क दिसणार आहेत. सलीलने "ध" दिला.




दुसरे गाणं सादर करायला आला तुषार शिंदे, "भक्तीवाचून मुक्तीची मला जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी" सुरवातीचे आलाप तितकेसे छान आले नाही. पण नंतर गाणं चांगले रंगले. भाव खूप छान आले नाहीत असे अभिजीतचे म्हणणे होते. तसेच सलील आणि अवधूतचे पण म्हणणे होते. "प" मिळाला.




त्यानंतर आला राहुल सक्सेना, ह्याने "दयाघना तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी ". गाणं चांगले म्हटले. अभिजितने अतिशयच स्तुती केली. अवधूतला आवडले, तो म्हणाला कि त्याच्या आवाजात कंप आहे आणि त्याचा चांगला वापर झाला. पण सलीलच्या मते सुरवात इतकी छान झाली नाही पण नंतर चांगले झाले. "ध" मिळाला.





चौथे गाणं गायला स्वरदा गोखले आली हिने "शोधू मी कुठे कशी प्रिया". गाणं चांगलंच म्हटले. अभिजीतच्या मते गाणं खूप छान झाले नाही. अवधूत म्हणाला कि आवाजात कंप होता. सलीलचे अजून वेगळेच मत होते. "प" मिळाला.





पाचवे गाणं म्हणायला आली अश्विनी देशपांडे. आज हिने "जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार". गाणं छान म्हटले पण परत नाकात म्हणते आहे असं वाटत होते. अभिजितने खूप वाखणंल. अवधूतच्या मते पण आवाज नाकातून येत होते. सलीलला देखील आवडले, "ध" मिळाला.




Today semifinal starts. Out of 36 participants, 18 participants has reached this this stage. Today's special judge is Abjijit. Today only Salil marks will be seen.

First song was sung by Abhilasha Chellam. "Avachita parimalu zulakala alumalu". Second song was by Tushar Shinde, "viththala mich khara aparadhi" Then came Rahul Saxena, "Dayaghana, tutale chimane gharate, urlo bandi asa mi". Swarada Gokhale sung "shodhu mi kadhi priya tula". Fifth song was by Ashwini Deshpande "Johar maybaap johar, tumachya maharacha mi mahar". Then came round of hindi songs. Apurva Gajjala sung "woh chup rahe to mere dil ke dag jalate hai". Saurabh Kadgaokar sung "jab deep jale aana jab sham dhale aana". Prasanna prabhu Tendulkar sung "seene me jalan aakho me tufan sa kyo hai" Last song in today's program was by Rutuja Laad "ab ke savan jam ke barase, bah haye rang meri chunar se". Today those participant sung hindi song will sing marathi song and vice versa.



Part 2