Showing posts with label Shruti Vishkarma. Show all posts
Showing posts with label Shruti Vishkarma. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.




मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.




त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.





मग कृष्णाने ढोलकी वाजवली.







स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.





कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.





Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २७ ऑक्टोबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

हिंदी गाण्याची सुरवात होण्याची आधी रोहित राउतला बोलावण्यात आले. "ये कौन रापचिक माल है, ये गो ये मैना पिंजडा बनाया सोने का", हे गाणं म्हटले.





सुस्मिरता डवालकर हिने हिंदी गाण्याची सुरवात केली. "बैरी पिया बडा रे बेदर्दी". गाणं मस्तच गायली. सगळ्या परीक्षकांना पण आवडले. सुरात होते एकदम आणि भाव पण होते. "नी" मिळाला.





यानंतर आला सागर जाधव. "तडप तडप इस दिल से, लुट गये हम तेरी मोहबत में ". सुरवातीला याचे उच्चार नीट आले नाहीत. अवधूतचे मत पण तसेच होते. आवाजाचा कंट्रोल नीट यायला हवा असे रोणू मुजुमदारचे मत होते. "प" मिळाला.





मग आली श्रुती विश्वकर्मा. "रोज शाम आती थी मगर ऐसी न थी," गाणं वेगळेच आहे. आणि हिला जमले पण नाही. वरचे स्वर खूपच कमी लागले. परीक्षांकांचे पण तसेच मत होते "प" मिळाला"





मग आली मृण्मयी तिरोडकर "चुपके से लग जा गले रात के चादर तले". हिच्या आवाजात एक थरथर जाणवत होते. आणि शेवटचे सूर नीट लागले नाहीत असेहि पण मत होते. "नी" मिळाला.






शेवटचे गाणं सदर करायला आली उर्मिला धनगर "चार दिनोका प्यार है रब्बा बडी लम्बी जुदाई". हि स्वतःच्या आवाजाला सुट होतील अशीच गाणी निवडते त्यामुळे गाणं मस्तच होते. सगळ्या लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या. अवधूत गुप्ते नामक क्षुद्र श्रोत्याची क्रूर हत्या झाली असे अवधूत म्हणाला. वरचा "सा" मिळाला.





आर्या, प्रथमेश आणि रोहितच्या आवाजात शेवटचे गाणं झाल. "आनंद पोटात माझ्या माईना"





आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे, संहिता चांदोरकर, मृण्मयी तिरोडकर, सुस्मिरता डवालकर आणि उर्मिला धनगर पुढे गेले. उरलेले पाच जण कालच्या ५ स्पर्धकांबरोबर पुढील आठवड्यात Knock Out Round ला येतील.





Now Hindi song round started. Befor participants singing hindi songs, Rohit Raut was called on stage. He sug "ye kaun rapchik maal hai". Then Susmita Davalkar performed "Bairi Piya bada re bedardi". Then Sagar Jadhav came on stage to sing "lut gaye hum teri mohabat me". After Sagar, Shruti Vishwakarma performed "Roj sham aati thi magar eisi na thi". Later Mrunmayi Tirodkar sung "chupke se lag ja gale rat ke chadar tale" Last song in the competition was by Urmila Dhangar "Lambi Judai". Before the result, Prathamesh, Arya and Rohit sung "Anand potat mazya maina". And as per both the days performances, Sanhita Chandorkar, Susmirata Davalkar, Mrunmayi Tirodkar and Urmila Dhangar went in the final round. Rest of the participant will meet in the Knock Out Round, next week.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २६ ऑक्टोबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज उपांत्य फेरीचा दुसरा भाग. आज कार्यक्रमाची सुरवात कार्तिकीच्या गाण्याने झाली. "कृष्णे वेधिली विरहणी बोले" हे गाणं म्हटले. आज मुग्धा आणि कार्तिकी कार्यक्रमाला आल्या होत्या.




आज उरलेले ९ स्पर्धक आहेत. आज पुन्हा हिंदी वर मराठी गाण्याचा समावेश असणार आहे. आजचे मान्यवर परीक्षक आहेत बासरीवादक रोणू मुजुमदार. आज अवधूतचे मार्क दिसणार आहेत.

स्पर्धेची सुरवात सुस्मिरता डवालकर च्या गाण्याने झाली. हिने "भेटी लागी जीवा लागलीसे आस" म्हटले. मधून जरा सुराला सोडून होते. गाणं चांगले झाले असे सलील म्हणाला. रोणू मुजुमदारने काय सांगितले ते नीटसे कळले नाही. अवधूत म्हणाला कि खूप कंट्रोल आवाजात गायलीस. "ध" मिळाला.





दुसरे गाणे झाले मृण्मयी तीरोडकरचे "माझ्या सारंगा राजा सारंगा". श्वास पुरत नव्हता असे वाटत होते. खालचे सूर नीट लागले नाही. गाणं चांगले झाले असे परीक्षकांचे मत होते. "प" मिळाला.





तिसरे गाणं म्हणायला आली श्रुती विश्वकर्मा "नाही कशी म्हणू तुला". श्वास नीट पुरत नव्हता खालचे सूर स्थिर लागत नव्हते. सलीलच्या मते गाणं म्हणत असताना चिंता करत असल्याने काही जागा नीट आल्या नाहीत. रोनुच्या मते relax होऊन गाणं म्हणायला हवे होते. "प" मिळाला.





मध्ये मध्ये कार्तिकीनी पण गाणी म्हटली, कार्तीकीने तिचे प्रसिध्ध "घागर घेऊन निघाली पाण्या गौळण" म्हटले. पण का कोण जाणे मला हिचे वरचे नोटस नेहमीच ओरडल्यासारखे वाटतात. तसे आजही वाटले.






चौथे गाणे सदर करायला सागर जाधवने मराठी गाणं सदर केले. "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी". गाणं खूप छान म्हटले. सगळे भाव अगदी आतून आले. ध मिळाला.




आजच्या भागातील शेवटचे मराठी गाणं म्हणायला आली उर्मिला धनगर. "हुरहूर असते तीच उरी", गाणं चांगले म्हटले. पण उर्मिलाच्या गाण्याला येते तितकी मजा आली नाही. सलीलच्या मते फक्त ९८% गायली. रोणूने पण त्याच प्रकारची comment दिली. सलीलने मुग्धाच्या गाण्याचा उल्लेख केला. सारखे कार्तिकी कार्तिकी ऐकल्यावर मुग्धाचे नाव घेतल्यावर जरा चांगले वाटले. "नी" मिळाला.







Today is the second week of the semifinal round. Rest of the 9 participants are going to sing. Pattern remains the same as last week. Today program started with Kartiki Gayakwad's "Krishne vedhili virahani bole". Today's special judge is famous flute player "Ronu Mujumdar". Actual competition started with Susmirata Dawalkar's "Bheti lagi jeeva lagalise aas". Second song was by Mrunmayi Tirodkar "mazya saranga raja saranga". Third song was by Shruti vishkarma "nahi kashi mhanu tula". In between, Kartiki sung one more song "ghagar gheun nighali panya gaulan". Then Sagar Jadhav performed "Tya kovlya phulancha bajar pahila mi". Last marathi song was by Urmila Dhangar "Hurhur asate tich uri".


Part 2