Showing posts with label Samiksha Bhobe. Show all posts
Showing posts with label Samiksha Bhobe. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

मग आली ऋतुजा लाड "जाहल्या काही चुका". मस्तच झाले. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे म्हणणे आहे.



त्यानंतर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची". याचे पण उच्चार नीट आले नाहीत. कैफात तर कैफा असेच ऐकू आले. केसातल्या जुईचा ..इथे "जुईचा" शब्दावर जास्त थांबला. आणि पुन्हा शेवटची ओळ म्हणताना चूक झाली. एकूण बर्याच चुका झाल्या.



मग आला सिद्धेश परळीकर "दूर नदीच्या पल्याड केव्हा". सुरवातीला याचे खालचे नोटस नीट लागले नाहीत. गाणं चांगले झाले असे सगळे म्हणाले. या वेळेस गाण्याबद्दल जास्त बोलणे झाले. याच्या गाण्याच्या पद्धतीबद्दल फार नाही.




त्यानंतर समीक्षा भोबेचे "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला". चे बरेच उच्चार नाकातून येतात. जसे "फुलला" जेव्हा सोडताना अगदी नाकातून येते. सलीलने पुरणपोळीचे उदाहरण चांगले झाले.




अवधूतने तुझे देख के मेरी मधुबाला या गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या.




सगळ्यात शेवटचे गाणं झाले आकांक्षा देशमुखचे "आला ग बाई आला ग" सुरवातीचा आलाप अगदीच बेसूर झाला. काही जागा खरच बेसूर झाल्या. पण गाण्याचा आत्मा अगदी नीट धरून ठेवला होता. शब्द नीट बघावे असा सल्ला श्रुतीताई म्हणाल्या.





आता निकाल. आज २ स्पर्धक पुढे जाणार. आज स्वरदा गोखले आणि ऋतुजा लाड पुढे गेल्या. आता अंतिम फेरीत आहेत. राहुल सक्सेना, अभिलाषा चेल्लम, उर्मिला धनगर, मृण्मयी तिरोडकर, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे, ऋतुजा लाड, स्वरदा गोखले, संहिता चांदोरकर, सुस्मिरता डवालकर.




Then came Rutuja Laad "Jahlya kahi chuka". Prasanna prabhu tendulkar sung "jevha tichi na mazi chorun bhet zali". Siddesh paralikar sung "dur nadichya palyad kevha". Samiksha Bhobe performed "bai bai man moracha kasa pisara phulala". Last song was by Akanksha Deshmukh, "aala ga bai aala ga".

In the resultm 2 participant were selected, Rutuja Laad and Swarada Gokhale. Now there are 10 participant in the final. They are, Swarada Gokhale, Rahul Saxena, Abhilasha Chellam, Urmila Dhangar, Mrunmayi Tirodkar, Apurva Gajjala, Ashwini Deshpande, Rutuja Laad, Sanhita Chandorkar, Susmirata Dawalkar.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २७ ऑक्टोबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

काल जसे जूनियर लिटिल चँम्पसला बोलावले होते असे आजे सीनियर लिटिल चँम्पस येणार होते. प्रथमेश, आर्या आणि रोहित आज येणार होते. आजचा दिवसाची सुरवात प्रथमेशच्या गाण्याने झाली "गर्जे अवघे पंढरपूर"




आज पुन्हा सगळ्या ९ स्पर्धकांनी एक गाणं सादर करायचे आहे. ज्यांनी काल हिंदी गाणी म्हटली होती ते आज मराठी म्हणणार आणि मराठी म्हटली त्यांनी हिंदी.

स्पर्धेची सुरवात संहिता चांदोरकरच्या "विष्णुमय जग". गाणं खूपच छान झाले. आवाज एकदम छान लागला होता आणि अगदी भावमय गाणं झालं. रोणू मुजुमदारच्या मते सुरवात जरा सुराला चिकटून झाली नाही. पण नंतर चांगले झाले. "ध" मिळाला.





त्यानंतरचे गाणं गायला आली समीक्षा भोबे "मधु मागसी माझ्या सख्या परी" गाणं खूप जास्त टेन्शन मध्ये म्हटले, असे अवधूतचे मत होते. गाणं जास्त भूमिकेत शिरून म्हणायला हवे होते. सलीलला खूप आवडले. "ध" मिळाला.





तिसरे गाणं सादर करायला आली आकांक्षा देशमुख "अरे कान्हा दे रे चोळी अन् लुगडी". गाणं मस्तच झाले. कालच्या गाण्यापेक्षा खूप जास्त चांगले झाले. थोडे जास्त भाव यायला हवे होते. सलीलला पण आवडले. "ध" मिळाला.




आकांक्षाचे गाणं झाल्यावर आर्याला बोलावण्यात आले. आर्या आता १०वित आहे. आर्याने आल्यावर गाणं म्हटले "नरवर कृष्णासमान, " आर्याचे गाणं ऐकून खूपच छान वाटले. हिच्या ताना आणि आलाप किती साफ व स्वच्छ येतात याचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे.





मग आला सिद्धेश परळीकर "वृन्दावनी वेणू वाजे". कालच्या गाण्यापेक्षा खूप जास्त सफाईदार आले. अवधूतच्या मते सुराला चिकटून नव्हते. रोणू मुजूमदारला कालच्या पेक्षा खूप चांगले झाले. पण सलीलला तसे वाटले नाही. "ध" मिळाला.





Like yesterday, today Senior little champs are invited to the show. Program started with Prathamesh's song "Avaghe garje pandharpur". First song in the competition was by Sanhita Chandorkar "Vishnumay Jag". Second song was by Samiksha Bhobe, "Madhu magasi mazya sakhya pari". Then Akanksha Deshmukh sung "are kanha de re choli an lugadi". Then Arya Ambekar was invited on stage, she sung "narvar krishnasaman". Later Siddesh Paralikar performed "vrundavani venu vaaje". After this next round is of Hindi songs.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ सप्टेम्बर २००९. (SRGMP marathi season 7) Part 1

आज २२ सप्टेम्बर २००९. आजचा झी सा रे ग म प च्या भागात प्राथमिक फेरीत ज्यांना पुढे जाता आले नाही ते स्पर्धक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक म्हणुन आल्या आहेत देवकी पंडित.


कार्यक्रमाची सुरवात अनुष्का चढ्ढाच्या श्रावणात घननिळा या गाण्याने झाली. सुरवातीला थोडी बेसुर झाली पण नंतरचे गाणे चांगले झाले. अवधूतचे देवकीवरील काँमेन्टस मजेशीर होत्या.





दुसरे गाणे प्रियंका बर्वेचे "कुणीही पाय नका वाजवू". हिचा आवाज खुपच मधुर आहे. पण सुर खुप हलल्यासारखे वाटत होते.





त्यानंतर समीक्षा भोबे. हिने "जीवलगा राहिले रे दूर घर माझे", चांगले म्हटले.





चौथे गाणं मोनिका देशमुख़चे जीवलगा कधी रे येशील तू





पाचवे गाणं सयाली आचार्यचे प्रेमा स्वरुप आई. हिचा आवाज खुपच लहान मुलीसारखा वाटतो. यावर रामदास स्वामीच्या आईवरिल ओली सलिलने सांगितल्या. वीट नाही कंटाळा नाही आळस नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेही नाही मातेवेगळी.





सहावे गाणे , स्वाती नाकील हिचे "भावभोळ्या भक्तीची ही एकतारी" हे झाले. हिचा हा पहिलाच सहभाग होता.






Participant those who could not pass the first round were given a more chance on 22nd September 2009, in Zee Marathi's program SRGMP. Guest Judge was Devaki Pandit along with Avadhoot and Salil.

First song was by Anushka Chadhdha. She sung "Shravanat Ghannila" .

Second song was by Priyanka Barve, "Kunihi Paay naka vajavu". Originally sung by her grand mother, Malati Pande-Barve.

Third song was by Samiksha Bhobe, "jeevalaga rahile re dur ghar maze". It was sung very well.

Forth song by Monica Deshmukh "Jeevalaga kadhi re yeshil tu".

Fifth song was "prema swarup aai" by Sayali Acharya. She is very young, it felt like as if she Little champ's program was going on. Ramdas Swamy's quote on Mother was told by Salil. He knows so many different things.

Sixth song was "Bhavbholya bhaktichi he ektari" by Swati Nakil. It was her first performance. She was in the "Stand by" category in the first round. She was given a chance in this round.


Part 2