Showing posts with label Zee Marathi.. Show all posts
Showing posts with label Zee Marathi.. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ६ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील आठवड्यात "Call back" असल्यामुळे या आठवड्यात कोणीच बाहेर पडणार नाहीये. आज प्रथम फेरी तालावर आधारित होती. सगळ्या स्पर्धकांनी आज तालावर अधातीर गाणी म्हटली. आजचे मान्यवर परीक्षक होते, पं. सुरेश तळवलकर.

कार्यक्रमाला सुरवात केली स्वरदा गोखले हिने. स्वरदाने भजनी तालावरील गाणे सादर केले. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी." हे गाणं सादर केले. ताल भजनी, मुळ गायिका फैयाज, रचना संत गोरा कुंभार, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक गोरा कुंभार. गाणं चांगले झाले. सलीलने प तर अवधूतने ध दिला. पं. सुरेश तळवलकर प्रत्येक गाण्यानंतर तालाबद्दल पण बोलणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम खूपच शैक्षणिक झाला आहे.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, हिने केरवा या तालावर आधारित गाणं सादर केले. "घननिळा लाडीवाळा झुलवू नको हिंदोळा", ताल केरवा, मुळ गायिका माणिक वर्मा, गीत ग.दि. माडगुळकर, संगीत सुधीर फडके. हे गाणं "उमज पडेल तर" या चित्रपटातील आहे. स्वराला स्थिरता नाहीये असे मान्यवर परीक्षकांना वाटले. अतिजास्त हरकती घेतल्या असा एकून सूर होता. दोघांनी "ध" दिला.



मग राहुल सक्सेना आला त्याने अध्ध्या त्रिताल या तालावर आधारित "मी मानपमान", मुळ गायक रामदास कामत, गीत कुसुमाग्रज संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक ययाती आणि देवयानी. ह्याचे उच्चार खूपच हिंदी वाटले. गाणं चांगले म्हटले. याच्याशी पल्लवी आणि मान्यवर परीक्षक हिंदीत बोलत होते. तानबाजी जरा जास्त झाली असा सलीलला वाटले. दोघांनी "ध" दिला.



मृण्मयी तिरोडकरने दादरा तालावर आधारित मालवून टाक दीप हे गाणे म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत सुरेश भट, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. "पेंगते अजून रात" स्वराला चुकले. स्वराला स्थिरता नव्हती या गाण्यात असा मान्यवर परीक्षकांचा शेरा होता. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे मत होते, अवधूतला गाणं आवडला नाही. अवधूतने म तर सलीलने ध दिला.




अपूर्वा गज्जलाने केहरवा तालावर "कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" गे गाणं सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी. सावळाराम, संगीत वसंत प्रभू, ताल केहरवा. गाणं खूपच छान झाले. सलीलने व अवधूतने ध दिले.



त्यानंतर आली अभिलाषा चेल्लाम. हिने आज दादरा तालावर "सखी ग मुरली मोहन मोही मना." मुळ गायिका अशा भोसले, गीत पी सावळाराम संगीत पं हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, ताल दादरा. सुरवातीला "पुन्हा" हा शब्द जरा वेगळा म्हणाला. तसेच अंतऱ्यात शृंगाराची हा शब्द पण बेसूर झाला. पण नाहीतर गाणं खूपच चांगले झाले. अवधूतने ध तर सलील ने नी दिला.





Program started with 6 participants today. Because of last week's call back there is not going to be any elimination this week. Today participant are going to sing the song on "Taal". Swarada Gokhale sung "nirgunacha sang dharila jo avadi". Urmila dhangar sung "ghannila ladiwala zulavu nako hindola". Rahul Saxena sung "mi manapman". Mrunmayi Tirodkar sung "malvun taak deep". Apurva Gajjala sung "kalpavruksha kanyesathi lavuniya baba gela". Abhilasha Chellam sung, "sakhi ga murali mohan mohi mana".



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

आता दुसऱ्या फेरीतील गाणी सुरु झाली. स्वरदा गोखले आली "मम आत्मा गमला " गे गाणं सादर करायला. मुळ गायक बाल गंधर्व, गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत भास्करबुवा बखले, नाटक संगीत स्वयंवर. गाणं चांगले झाले. दोन ध मिळाले.




मग अपूर्वा गज्जलाने "शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत शांता शेळके, संगीत हेमंत भोसले. दोन ध मिळाले.





मग आली मृण्मयी तिरोडकर, हिने नाचू किती कंबर लचकली हे गाणं सादर केले. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा व राहुल होते. मुला गायिका आशा भोसले, गीत जगदीश खेबुडकर, संगीत राम कदम, चित्रपट सुगंधी कट्टा. कोरस खूपच छान झाले. कोरस खूपच छान झाले. दोन ध मिळाले. मृण्मयी जरा दडपणाखाली होती असा वाटत होते.




त्यानंतर अभिलाषा चेल्लामने कशी झोकात चालली कोल्याची पोर हे गाणं म्हटले. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अपूर्वा आणि मृण्मयी होत्या. मुळ गायिका आशा भोसले, गीत पी. सावळाराम संगीत राम कदम, चित्रपट मोलकरीण. गाणं खूपच सुंदर म्हटले. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.





मग उर्मिला धनगर आली हिने हिच्या नेहमीच्या धाटणीतले गाणे म्हटले. वाडीवरल्या वाटा गेल्या आबालाच्या पारी. मुळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना. धो. महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. अवधूतने गोड शब्दात सांगितले कि त्याच त्याच धाटणीची गाणी न गाता जरा वेगळी गाणी गा. हे अवधूतने सांगितले म्हणजे जरा आश्चर्य आहे. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




मग राहुल सक्सेना ने "दाटून कंठ येतो ओठात येई गाणे." मुळ गायक डॉ. वसंतराव देशपांडे, गीत शांता शेळके, संगीत अनिल-अरुण, चित्रपट अष्टविनायक. गाणं खूपच छान म्हटले. आणि या गाण्यात उच्चार देखील चांगले आले. पाडगावकरांची कविता आहे ज्यात ते असे वर्णन करतात कि पाउस कोसळत नाही पण आभाळ भरून येते, तसा मुलीच्या लग्नात बाप दिसतो. तसेच गाणे झाले, असे सलीलने म्हटले. दोन वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून आज राहुल आणि अभिलाषा म्हणण्यात आले. आणि गम्मत अशी आहे कि कार्यक्रम झाल्यावर "आजचा आवाज" मध्ये ज्याचे गाणं दाखवत त्यात. राहुल आणि उर्मिलाला दाखवण्यात आले.







अंतिम फेरीतील शेवटच्या २ उपविजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार, तर १ लाख २५ हजार रुपये, रोख रुपये. सुधीर मांडके डेवलपर्स कडून
क्रोमा कडून विजेत्याला १ लाख ३० हजार रुपयाचे Home Package, २ उपविजेत्यांना चाळीस हजार रुपयांचे home Package. अंतिम फेरीतुन बाहेर पडणाऱ्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी वीस हजारांचे Home Package.
अंतिम फेरीतील विजेत्याला १ लाख रुपयाची Music system, २ उपविजेत्यांना पन्नास हजार रुपयांची Music system. शेवटच्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजारांची Music System.


एकूण बेरीज
विजेता १ : १.२५ + १.३ + १ = ३.५५
उपविजेते २ : ०.५ + ०.४ + ०.२ + ०.५ + ०.२५ = १.८५
उरलेले २ : ०.२ + .२५ = ०.४५



In the second round, Swarada Gokhale sung "mam atma gamala ga". Apurva Gajjala sung, "sharad sundar chanderi rati swapnacha zulat zula". After this Mrunmayi Tirodkar sung "nachu kiti nachu kiti, kambar lachakali". Abhilasha Chellam sung, "kashi zokat chalali kolyachi por". Then came Urmila Dhangar who presented "vadivarlya wata gelya abalachya pari". Rahul Saxesa sung "datun kanth yeto othat yei gane" Best performer was given to Abhilasha and Rahul.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज अंतिम फेरीचा पहिला निकाल आहे. आज १० स्पर्धक आहेत. आज Danger Zone सुरु झाला आहे. सगळ्यात जास्त मार्क ज्याला मिळाले ती स्पर्धक आज प्रथम गाणं म्हणणार आहे. सगळ्यात जास्त मार्क अभिलाषा चेल्लाम. "कुठं तुम्ही गेला व्हता सांगा कारभारी" कोरस मस्त झाले. तसेच अभिलाशाचे गाणं देखील मस्त झाले.




दुसऱ्या स्थानावर आहे उर्मिला धनगर. "नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला शाम". हे गाणं जरी उर्मिलाच्या आवाजाला शोभत नसले तरी तिने गाणं खूपच छान म्हटले.




तिसऱ्या क्रमांकावर आला राहुल सक्सेना. "नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो.". पल्लवी फक्त राहुल बरोबरच हिंदीत का बोलते हे एक कोडेच आहे. कारण अभिलाषा आणि अपूर्वा देखील अमराठी आहेत, पण त्यांच्याशी ती मराठीतच बोलते. या गाण्यात इतके छान भाव आले नाहीत. पण प्रयत्न चांगला होता. या गाण्यात राहुल अमराठी आहे असे जाणवत होते. कारण बरेच शब्द तो अगदी प्रयत्नपूर्वक उच्चारतो आहे असे वाटत होते.



सलीलने पण हे गाणं म्हटले.



चौथ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फूलावीत." लय जरा कमी पडत होती असे अवधूतला वाटले.






पाचव्या क्रमांकावर होती "स्वरदा गोखले". "लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू ". गाणं चांगले झाले. खालचे स्वर स्थिर नव्हते असे मला वाटले.




This week the results for the final round will be announced. Today the order of singers is decided as per the marks plus votes they received last week. As per that, the first participant was Abhilasha Chellam. She sings "Kutha tumhi gela vhata sanga karbhari". Second highest was Urmila Dhangar, performs "Bai mi vikat ghetala sham". Third song was by Rahul Saxena "Nasates ghari tu jevha". Forth in order was Mrunmayi Tirodkar "Malachya malyamandi patache pani jaata". Fifth in the position was Swarada Gokhale "Limblon utaru kashi, asashi dur laamb tu".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

सहाव्या क्रमांकावर होती ऋतुजा लाड "पैल तो गे काऊ कोकताहे". अवधूतच्या मते professionaly गायला हवे. गाणं मस्तच झाले.




सातव्या क्रमांकावर होती "अपूर्वा गज्जल्ला". "सावलीस का कळे उन्हामधील यातना. " गाणं खूपच चांगले म्हटले आणि भूमिकेत शिरून म्हटले.




Danger Zone मध्ये असलेल्या स्पर्धकांना प्रोहत्सान म्हणून मनाली कुलकर्णी काही वाक्य बोलली.




आता शेवटचे ३ स्पर्धक, सगळ्यात प्रथम आली अश्विनी देशपांडे. "मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना" कलाकाराने कसे असायला हवे हे सांगितले. अवधूतचे नेहमीप्रमाणेच भन्नाट comments होते. "जाता जाता गाईन मी, गाता गाता गाईन मी, गेल्यावरही या गगनातील या गीतांमधुनी राहीन मी."





नवव्या क्रमांकावर होती सुस्मिरता डवाळकर "सख्या चला बागामंदी रंग खेळू चला." कोरस मध्ये अश्विनी, ऋतुजा, उर्मिला आणि मृण्मयी होत्या. हिला सगळ्या जास्त SMS मिळाले. गाणं चांगले झाले. शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहिती नसून देखील, tention न येऊ देता गायला.




त्यानंतर आली संहिता चांदोरकर, "येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अश्या क्षणांना". गाणं चांगले झाले.




आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे सुस्मिरता बाहेर पडली.




Sixth song was by rutuja Laad "Pail to he kau kokatahe", Seventh was Apurva Gajjala "Savalis ka kale unhamadhil yatana". Now Danger zone starts. Out of these 3 one will go out. First comes Ashwini Deshpande "Mala mhanatat ho mhanatat punyachi maina". Then Susmirata Dawalkar sings "Sakhya chala bagamandi rang khelu chala". Last song in todays's competition is sung by Sanhita Chandorkar "Yeu kashi priya, save tuzya ashya kshananna". After all the songs results were announced and Susmirata Dawalkar went out of the competition.


Susmirata - Marks 72.83% - SMS 56.34
Sanhita - Marks 81.67% - SMS 4.74
Ashwini - Marks 80% - SMS 1.93
Apurva - Marks 83.33 - SMS 3.45
Rutuja - Marks 83.33 - SMS 4.06
Swarada - Marks 85.00 - SMS 2.94
Mrunmayi - Marks 85.00 - SMS 8.43
Rahul - Marks 87.17 - SMS 3.52
Urmila - Marks 90% - SMS 11.64
Abhilasha - Marks 95% - SMS 2.96