सारेगमप - २६ एप्रिल २०१०, भाग १

आज पासून सारेगमपचा महासंग्राम हा कार्यक्रम सुरु झाला. ४ वर्ष्यात ज्या स्पर्धा झाल्या त्यातील १५ ते ३० वयोगटातील टोप तेन मधील १० स्पर्धक घेऊन हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या स्पर्धेत अवधूत गुप्ते हा परीक्षक राहणार आहे. आणि दर वेळेस मान्यवर परीक्षक वेगवेगळे असणार आहेत.

कार्यक्रमाची सुरवात अवधूतच्या गाण्याने झाली. "परी म्हणू कि सुंदरा हिची तऱ्हा जरा निराळी, हिची अदा करी फिदा हि मेनका कुणी जणू निघाली.". अवधूतनेच म्हटलेले गाणं आहे हे. आजच्या मान्यवर परीक्षक होत्या देवकी पंडित. आज मार्क असणार नाहीत. आज स्पर्धक त्यांची आवडती गाणी म्हणणार आहेत.

सगळ्यात प्रथम आली सायली ओंक. सायली ओंक पनवेलची आहे. हिने "मी मज हरपून बसले ग" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले.




दुसऱ्या क्रमांकावर आला परभणीचा अनिकेत सराफ. ह्याने "हे सुरांनो चंद्र व्हा" म्हटले. मुळ गायिका अर्चना कान्हेरे, गीत वि. वा. शिरवाडकर, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी.. हे गाणं ययाती आणि देवयानी या नाटकातील आहे.

Second was Aniket Saraf. He is from Parbhani. He sung "he surrano chandra vhya". Original singer Archana Kanhere, Lyrics Vi. Va. Shirvadkar (Kusamagraj). Music Pan. Jithendra Abhisheki. This song is from drama, Yayati ani Devyani.






तिसऱ्या क्रमांकावर आला लातूरचा मंगेश बोरगावकर. याने "रंगत रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते" मुळ गायक स्वप्नील बांदोडकर, गीत आणि संगीत अशोक पत्की. हे गाणं "तू माझा किनारा" या अल्बम मधील आहे.

Third participant to enter the stage was Latur's Mangesh Borgaokar. He performed "rangat rang to sham rang pahanya najar bhirabhirate". Original singer Swapnil Bandodkar, music and lyrics Ashok Patki. This song is from "Tu maza kinara"




४ नंबर वर आला अनिरुध्ध जोशी, नागपूरचा, नाट्यसंगीतात प्रभुत्व. याने "या भवनातील गीत पुराणे" गीत पुरुषोत्तम दारव्हेकर, मुळ गायक , संगीत जितेंद्र अभिषेकी , नाटक कट्यार काळजात घुसली. अतिशय परिपक्व गाणं होतं. खूपच सुंदर.

Anirudhdha Joshi, was 4th to enter the stage. He is from Nagpur, very much command on "Natyasangeet". He performed "ya bhavanatil geet purane". Lyrics Purushottam Darvhekar, Original singer, and music Pa. Jitendra Abhisheki, And this song is from "katyar kalajat ghusali"




आनंदी जोशी आली पाचव्या क्रमांकावर. हिने "ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली" हे गाणं म्हटले. मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर , संगीत दत्ता डावजेकर. हे गाणं "पडछाया" या चित्रपटातील आहे.

Anandi Joshi entered in the fifth number. She sung "Ein dupari yamunatiri, khodi ugi kadhali, bai mazi karangali modali". Original singer Asha Bhosale, Lyrics Ga. Di, Madgulkar. This song is from "Padchhaya".



Part 2

सारेगमप - २६ एप्रिल २०१०, भाग २

Part 1

त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. हिने "जाने क्या बात है, निंद नाही आती, बडी लांबी रात है." सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत आर डी बर्मन. हे गाणं सन्नी या चित्रपटातील आहे.

Sixth person to occupy the stage was Apurva Gajjala. She performed "jane kya baat hai, nind nahi ata, badi lambi raat hai". Original singer Lata Mangeshkar, Lyrics Anand Bakshi, Music R.D.Burman. This song is from "Sunny"




सातव्या नंबर आला ज्ञानेश्वर मेश्राम. हा भक्तीसंगीत खूप उत्कृष्ट गातो. याला सारेगमप मध्ये माउली म्हणतात. याने त्याचेच गाणे सादर केले. "राधे चाल, चाल बाई चाल". मुळ गायक आणि संगीत ज्ञानेश्वर मेश्राम, गीत संत गुलाबराव महाराज, अल्बम कान्हया रे जगजेठी. गाणं ठीक होते.

Seventh person to enter the stage was Dnyaneshwar Meshram. He sung his own song, "Radhe chaal, chaal bai chaal". Original singer and music is by Dnyaneshwar Meshram. Lyrics is by Sant Gulabrao Maharaj, This song is from album "Kanhaya re jagjethi".




आठव्या नंबर आला विजय गटलेवार. याची गजल गाण्यावर प्रभुत्व आहे, असा समज आहे. याने "मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान परी गहिवरते" हे सादर केले. मुळ गायक शंकर महादेवन, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाणं "अगबाई अरेच्या" या चित्रपटातील आहे.

Then came Vijay Gatlewar. He sung "Man udhan varyache guj pavasache, ka hote bebhan pari gahivarate". Original singer, Shankar Mahedevan, Lyrics Guru Thakur, Music Ajay-Atul. This song is from marathi film "Agabai arechchya".




नवव्या नंबर आली संहिता चांदोरकर. हिने " मैया मैया गुलाबी तारे चुनले" हे गाणं सादर केले. मुळ गायिका चिन्मयी, किर्थी टोलर, गीत गुलजार, संगीत ए. आर. रेहमान. हे गाणं गुरु या चित्रपटातील आहे.

Then came Sanhita Chandorkar. She sung "Maiya Maiya, Gulabi tare chunale". Original singer Chinmayi, Kirthy Tolar, Lyrics Guljar, Music A.R.Rehman. This song is from movie "Guru".





दहाव्या स्थानावर आला राहुल सक्सेना. याने "तुझ्या पायरीशी सानथोर नाही,.... खेळ मांडला" हे नटरंग सिनेमातील प्रसिध्ध गाणे म्हटले. मुळ गायक अजय गोगावले, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. गाणं चांगले म्हटले.

Last participant was Rahul Saksena. He performed a song from Natrang "khel mandala" Original singer Ajay Gogavale, Lyrics Guru Thakur, Music Ajay-Atul.







आता या स्पर्धेतील बक्षिसं (आता पर्यंतची).
झी मराठी करून महाविजेत्याला २ लाख, तर २ उपविजेत्यांना १ लाख.
क्रोमाकडून महाविजेत्यांना १ लाख ३० हजार रुपयांचे होम पॅकेज, तर २ उपविजेत्यांना ४०००० हजारांचे होम पॅकेज आणि अंतिम फेरीतून बाहेर पडणाऱ्या अंतिम ४ स्पर्धकांना २०००० हजाराचे होम पॅकेज