Showing posts with label Ashwini Deshpande. Show all posts
Showing posts with label Ashwini Deshpande. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज एकूण ८ स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार. या आठवड्यात जो निकाल लागणार आहे त्या मार्कांची विभागणी ३०% SMS व ७०% परीक्षकांची मते अशी आहे. पहिल्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात जास्त मार्क परीक्षकांनी दिले. याने "आम्ही ठाकर ठाकर" सदर केले. मूळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना धो महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, स्वरदा आणि उर्मिला होत्या. कोरस मस्त होते. सलीलच्या comments मस्त होत्या.




दुसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "कृष्णा मजकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून" मूळ गायक आणि संगीत यज्ञेश्वर लिंबेकर, रचना माणिक प्रभू, अल्बम भक्तीचा मळा. गुण आणि मत दोन्ही प्रमाणे हि दुसर्या क्रमांकावर होती. गाणं ठीक झाले. पण नेहमीप्रमाणे परीक्षकांना खूप आवडले. सलील बेस्ट या मधील comments अगदी विनोदी.




तिसर्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर. "झिनी झिनी वाजे बीन". मुळ गायिका आशा भोसले. गीत बा. भ. बोरकर आणि संगीत श्रीधर फडकेचे. ऋतू हिरवा या अल्बम मधील हे गाणं आहे. गाण्यात खूप मजा आली नाही. प्रसन्न वाटले नाही. सलीलने खूप छान बा. भ. बोरकरांच्या ४ ओळी सांगितल्या.

स्वर्ग नको सूरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
मुक्ती नको मज तृप्ती नको मज येथील हर्ष नी शोक हवा

गाणं खूप गंभीर वाटले, असे सलीलला वाटले आणि अवधूतच्या मते गाणं सुराला जरा कमी झालं.


चौथ्या क्रमांकार होती अपूर्वा गज्जला. हिला मत कमी होती पण गुणांच्या जोरावर हे पुढे आली. "या पंढरीचे सुख पाहता डोळा तुझा तो जिव्हाळा योगीयांचा". मूळ गायिका आणि संगीत किशोरी अमोणकर, रचना संत एकनाथ, अल्बम रंगी रंगला श्रीरंग. गाणं खूपच सुंदर झाले. अपूर्वा खूप छान गाणं म्हणायला लागली आहे.



Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

पाचव्या नंबर होती स्वरदा गोखले. हिला सगळ्यात जास्त मत मिळाली आहेत. "मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा" मुळ गायिका कृष्ण कल्ले, गीत ना. घ. देशपांडे, संगीत यशवंत देव. अवधूतवर स्वरदाने फेकलेला गुगली जोरदार होता. गाणं मस्त झाले. सलीलने जरा excitement कमी करून गा असा सल्ला दिला.



आता Danger Xone सुरु झाला. अभिलाषा चेल्लम, ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे या तिघी होत्या. त्यात प्रथम आली अभिलाषा चेल्लम. हिला खूपच कमी गुण मिळाले होते, पण SMS भरपूर आले आहेत. "जंतर मंतर रातीला चंद्राची पिंडली चोरून नेली" हे बेला शेंडे ने म्हटलेले गाणं सादर केले. गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी ह्याचे तर हृदयातील गाणं या अल्बम मधील हे गाणं आहे. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला, मृण्मयी आणि अपूर्वा होत्या. गाणं मस्त झाले. हि गाणं छानच म्हणते. पण हिला Danger Zone चा खूप ताण आला आहे असे वाटत होते.




त्यानंतर आली ऋतुजा लाड "कुण्या गावाचे आलं पाखरू". चित्रपट "सुशीला" मधील हे गाणं, गायलंय "उषा मंगेशकर" ह्यांनी, गीत आहे, जगदीश खेबुडकरांचे तर संगीत आहे राम कदम यांचे. हिला शेवटून दुसर्या नंबर वर मार्क मिळाले होते. कोरसमध्ये मृण्मयी आणि अभिलाषा होत्या. गाणं चांगले झाले. अवधूतच्या comments जोरदार होत्या.



सगळ्यात शेवटी आली अश्विनी देशपांडे. "ऋतुराज आज वनी आला". मुग्धा वैशंपायनची नक्कीच आठवण झाली. अश्विनीचे गाणं परत नाकातून वाटले. मुळ गायिका मधुवंती दांडेकर, गीत विध्याधर गोखले, संगीत प्रभाकर भालेकर, नाटक मदनाची मंजिरी. हे गाणं मस्त म्हटले. हे हिचे ह्या स्पर्धेतील शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहित नसून देखील मस्त म्हटले. सलीलचे सैपाकघरातील कॉम्मेंत्स मस्त होत्या.




आता निकाल. आजच्या स्पर्धेत आज बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळाली.




मार्क या प्रमाणे
अश्विनी देशपांडे - परीक्षक ७३.५ % SMS - ९.०२%
ऋतुजा लाड - परीक्षक ८०.0 % SMS - ५.२४ %
अभिलाषा चेल्लाम - परीक्षक ७७.५% SMS - ११.८५%
स्वरदा गोखले - परीक्षक ८१% SMS - २१.७५ %
अपूर्वा गज्जला - परीक्षक ८८.५ % SMS - ५.५९%
मृण्मयी तिरोडकर - परीक्षक ८७.५ % SMS - १६.५२%
उर्मिला धनगर - परीक्षक ९५% SMS - १९.७६ %
राहुल सक्सेना - परीक्षक १०० % SMS - १०.२७ %


Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Ashwini Deshpande : Marks 73.5% SMS - 9.02%
Rutuja Laad : Marks 80.0% SMS - 5.24 %
Abhilasha Chellam : Marks 77.5% SMS - 11.85 %
Swarada gokhale : Marks 81.0% SMS - 21.75 %
Apurva Gajjala : Marks 88.5% SMS - 5.59 %
Mrunmayi Tirodkar : Marks 87.5% SMS - 16.52 %
Urmila Dhangar : Marks 95.0% SMS - 19.76 %
Rahul Saxena :Marks 100.0% SMS - 10.27 %

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २४ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ८ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील वर्षी झालेल्या हल्ल्याच्या स्मृती प्रीत्यर्थ हा कार्यक्रम पोलिसांना समर्पित केला होता. कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या "जयोस्तुते श्री महन्मंगले" या गाण्याने झाली. मूळ गाणं लता मंगेशकरने म्हटलेले आहे. गीत स्वातंत्रवीर सावरकरांचे आहे तर संगीत मधुकर गोळवलकरांचे आहे. कोरस मध्ये स्वरदा, मृण्मयी, अश्विनी आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. आज मार्क दिसणार नाहीत.

सलील म्हटलेल्या काही ओळी.

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मुठ पोलादी जयांची हि धरा दासी तयांची
पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
हे श्वास येथे घ्यावयाचा.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे. "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधिला पेटली न वात" मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज संगीत वसंत प्रभू. गाणं चांगले झाले. पण खूप मनाला भावले नाही. आर्या आम्बेकारची आठवण आली. सलील ने कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली.

महापुरुष मरतात तेव्हा जागे होतात जागोजागचे संगमरवरी दगड
आणि पुन्हा एकदा त्यांचे आत्मे चिणून मारतात त्यांना दुसऱ्यांदा बहुदा कायमचेच
म्हणून महापुरुष दोनदा मरतात एकदा वैर्यांकडून आणि एकदा भक्तांकडून
असे संगमरवरी मरण तुला न लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना



त्यानंतर आली स्वरदा गोखले "ए मेरे वतन के लोगो". मूळ गाणं लता मंगेशकरचे, गीत कवी प्रदीप, तर संगीत सी. रामचंद्र. ह्या गाण्यात सुरवातीला लाडिक भाव जास्त आले, दुखद येण्याऐवजी असे मला वाटले. पण नंतर चांगले झाले. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, ऋतुजा आणि अपूर्वा होत्या.




राहुल सक्सेनाचे "जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो" गाणं झाले. मूळ गाणं गायलंय सोनू निगम, रुपकुमार राठोड यांनी, गीत आहे इसरार अन्सारी यांचे, तर संगीत आहे जतीन ललित यांचे. हे गाणं सरफरोश या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा मृण्मयी व अमर ओक होते. गाणं खूपच सुंदर झाले. अगदी मनापासून होते.






अपूर्वा गज्जला हिने "सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव शिरी", मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. अमर ओकची बासरी उत्कृष्ट. हिचे गाणे खूपच छान झाले. आता पर्यंत हिने जी गाणी म्हटली त्यातील हेसगळ्यात उत्कृष्ट गाणं होत.




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धक घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आज दाखवणारे मार्क ८०% परीक्षक तर २० टक्के SMS आहे. सलीलने खूपच छान ४ ओळी सांगितल्या.
तसे नसते कोणीच आपले कसले मित्र कसली साथ
फक्त बारा सखे तुझे पाच काळे पंढरी सात.
कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. प्रथम क्रमांकावर होती ऋतुजा लाड. "चंद्रिका हि जणू" ह्या गाण्याचे सादरीकरण केले. मूळ गायक पं हृदयनाथ मंगेशकर. गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत गोविंदराव टेंबे. संगीत मानापमान या नाटकातील हे पद आहे. आजपासून SMS ला ३०% महत्व असणार आहे.




दुसऱ्या नंबर होती मृण्मयी तिरोडकर. "हि सांज सुखाने सजलेली, अन दरवळणारा श्वास तुझा". मूळ गायिका वैशाली सामंत. गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते, अल्बम "हि सांज सुखाने". गाणं छान झाले. अवधूत आणि सलीलच्या आपापसातील गप्पा मजेशीर होत्या.




तिसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. "झाल्या तिन्ही सांजा, करुनी शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा" हे गाणं सदर केले. मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत राम-लक्ष्मण. हे गाणं तुमचे आमचे जमलं या चित्रपटातील आहे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. "पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे" मूळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे यांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचे. खूपच सुंदर म्हटले. हिचे उच्चार खूपच छान आहेत. अवधूतच्या मते अंतरात लय नीट जमली नाही





पाचव्या नंबर वर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात कमी SMS आले असे म्हणणे होते. "राधा हि बावरी". याचे उच्चार नीट आले नाहीत. विशेषता रंग, शामरंग, वाट, हे नीट जमले नाहीत. मूळ गायक स्वप्नील बांदोडकर, संगीत आणि गीत अशोक पत्की, यांचे. हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे. हा नको तिथे हरकती घेतो.





सहाव्या क्रमांकावर होती अश्विनी देशपांडे. "पाखरा जा दूर देशी". मूळ गायिका सुमन कल्याणपूर, गीत अशोकजी परांजपे यांचे आणि संगीत अशोक पत्की यांचे. सलीलच्या मते गाणं दडपण ठेवून म्हटले. अवधूतच्या मते पण जरा पाखरांचा balance जरा हलत होता.



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


उर्मिला धनगरचे "रे नंदलाला तू छेडू नको ". राग मिश्र किरवाणी मधील हे गाणं शोभा गुर्टू यांनी गायले आहे. गीत उमाकांत काणेकर तर संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे. अधीर याद तुझी या अल्बम मधील हे गाणंआहे. गाणं चांगले झाले पण आजचे गाणं इतके छान झाला नाही म्हणजे बेसूर वगैरे कुठेच झाले नाही पण मजा आली नाही. सूर लावताना आवाजात कंप होता असे मान्यवर परीक्षकांचे मत होते. अवधूतने आणि सलीलने ध इतके कमी मार्क कधीच उर्मिलाला मिळाले नव्हते.



उर्मिला नंतर आला राहुल सक्सेना "प्रथम तुज पाहता जीव वेडावला". मुंबईचा जावई या चित्रपटातील, राग कलावती वर आधारित, हे गाणं रामदास कामत यांनी गायले आहे. ग. दि. माडगुळकरांचे गीत असून संगीत सुधीर फडकेंचे आहे. स्पर्श या शब्दामध्ये हिंदीची झाक येत होती सगळ्या ताना एकदम स्वच्छ आल्या काही ठिकाणी बेसूर झाले असे सलीलचे मत होते शुभा मुदगलच्या मते जरा संयमाने गायला हवे कारण उगाच आलाप आणि ताना घेण्याची गरज नाही आहे दोन ध मिळाले.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे " विकल मन आज झुरत असहाय". राग सरस्वती वर आधारित हे गाणं बकुल पंडित यांनी गायले आहे. गीत शांता शेळके यांचे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे. हे गाणं "हे बंध रेशमांचे" या नाटकातील आहे हि शास्त्रीय गाणं जास्त चांगले म्हणते हे परत या गाण्यावरून सिद्ध झाले पण हिचा आवाज नाकातून येतो बरेचदा असे मला जाणवते . गाणं छान झाले असे अवधूत म्हणाला श्वासावर नियंत्रण हवे . हे गाणं राग सरस्वती मधील आहे असे शुभा मुदगल म्हणाली सलीलचे उदाहरण मस्त होते . दोन्ही ध मिळाले .





शेवटचे गाणं सदर करायला आली अभिलाषा चेल्लम ऋतू हिरवा ऋतू बरवा ". राग चारुकेशी वर आधारित हे गाणं आशा भोसले यांनी गायले आहे. संगीत श्रीधर फडके यांचे तर गीत शांता शेळके यांचे आहे. हे गाणं ऋतू हिरवा या अल्बम मधील आहे. गाणं मस्तच झाले हिच्या कुठल्याच उच्चारात हिंदी किंवा तमिळची झाक येत नाही कोरस मध्ये अपूर्वागज्जला ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे होत्या कोरस मस्त झाले गाणं सोडताना जरा नित आले नाही असे अवधूत म्हणत होता आवाज खूप छान आहे असा शुभा मुदगलचा शेरा होता सलीलचे उदाहरण मस्त होते परत दोन ध मिळाले.




आजचा best performer म्हणून ऋतुजा लाड होती.




कार्यक्रमाची सांगता शुभा मुदगलच्या गाण्याने झाली. "तेरे बाके नैनो ने जादू डाला सावरिया."






Urmila Dhangar sings "re nandalala tu chhedu nako". Song based on Mishra Kirwani. Original singer Shobha Gurtu, written by Umakant Kanekar and composed by Shrikant Thakare, is from "adheer yaad tuzi". After this Rahul Saxena performs "pratham tuj pahata". Song is from Mumbaicha Javai, sung by Ramdas Kamat, written by G.D.Madgulkar and composed by Sudheer Phadake. Ashwini Deshpande sung "vikal man aaj zurat asahay", based on raag Sarswati, written by Shanta Shelke, composed by Jitendra Abhisheki, is from "he bandh reshamanche". Last song was by Abhilasha Chellam, "rutu hirva rutu barva". Original singer is Asha Bhosale, composed by Shreedhar Phadake, written by Shanta Shelke and is from album "Rutu Hirva". Todays best performer was "Rutuja Laad". Program ended by Shubha Mudgal's song "Tere baake nainone jadu daala savariya".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

सहाव्या क्रमांकावर होती ऋतुजा लाड "पैल तो गे काऊ कोकताहे". अवधूतच्या मते professionaly गायला हवे. गाणं मस्तच झाले.




सातव्या क्रमांकावर होती "अपूर्वा गज्जल्ला". "सावलीस का कळे उन्हामधील यातना. " गाणं खूपच चांगले म्हटले आणि भूमिकेत शिरून म्हटले.




Danger Zone मध्ये असलेल्या स्पर्धकांना प्रोहत्सान म्हणून मनाली कुलकर्णी काही वाक्य बोलली.




आता शेवटचे ३ स्पर्धक, सगळ्यात प्रथम आली अश्विनी देशपांडे. "मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना" कलाकाराने कसे असायला हवे हे सांगितले. अवधूतचे नेहमीप्रमाणेच भन्नाट comments होते. "जाता जाता गाईन मी, गाता गाता गाईन मी, गेल्यावरही या गगनातील या गीतांमधुनी राहीन मी."





नवव्या क्रमांकावर होती सुस्मिरता डवाळकर "सख्या चला बागामंदी रंग खेळू चला." कोरस मध्ये अश्विनी, ऋतुजा, उर्मिला आणि मृण्मयी होत्या. हिला सगळ्या जास्त SMS मिळाले. गाणं चांगले झाले. शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहिती नसून देखील, tention न येऊ देता गायला.




त्यानंतर आली संहिता चांदोरकर, "येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अश्या क्षणांना". गाणं चांगले झाले.




आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे सुस्मिरता बाहेर पडली.




Sixth song was by rutuja Laad "Pail to he kau kokatahe", Seventh was Apurva Gajjala "Savalis ka kale unhamadhil yatana". Now Danger zone starts. Out of these 3 one will go out. First comes Ashwini Deshpande "Mala mhanatat ho mhanatat punyachi maina". Then Susmirata Dawalkar sings "Sakhya chala bagamandi rang khelu chala". Last song in todays's competition is sung by Sanhita Chandorkar "Yeu kashi priya, save tuzya ashya kshananna". After all the songs results were announced and Susmirata Dawalkar went out of the competition.


Susmirata - Marks 72.83% - SMS 56.34
Sanhita - Marks 81.67% - SMS 4.74
Ashwini - Marks 80% - SMS 1.93
Apurva - Marks 83.33 - SMS 3.45
Rutuja - Marks 83.33 - SMS 4.06
Swarada - Marks 85.00 - SMS 2.94
Mrunmayi - Marks 85.00 - SMS 8.43
Rahul - Marks 87.17 - SMS 3.52
Urmila - Marks 90% - SMS 11.64
Abhilasha - Marks 95% - SMS 2.96

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २० ऑक्टोबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


पाचवं गाणं म्हणायला आला तुषार शिंदे. याने आज हिंदी गाणं सादर केले. "झनक झनक तोरी बाजे पायलिया". उच्चार तितकेसे ठीक वाटले नाहीत. शेवटचे जास्त लयीतील गाणं तितकेसे नीट जमले नाही. अभिजीतच्या मते भाव इतके नीट आले नाहीत. सलीलच्या मते तालासुरात गायला, पण भाव नीट आले नाहीत. अवधूतचे पण तेच मत होते. "प" मिळाला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले ती पण आज हिंदी गाणं म्हणणार "पान खाये सैया हमारो" सुरवातीला आवाज जरा कापला असे वाटले आणि गाणं जरा लाडिक झाले असे वाटले. पण नंतर गाणं छान झाले. गाणं सुरु झाल्यावर मात्र आर्या आम्बेकारची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. अभिजीतच्या मते गाणं खूप छान झाले नाही. सलीलच्या मते गाणं technically गायली नाहीस तर performance साठी गायली. अवधूतच्या मते भाव आणायला गेली तिथे बेसूर झाली. "ध" मिळाला.



सातवे गाणं गायला आली अभिलाषा चेल्लाम. हिने "नदिया किनारे हरायी आए कंगना,". गाणं खूपच छान म्हटले. Once More मिळाला. अभिजीतला खूप आवडले. सलीलला पण खूप जास्त आवडले. सलीलच्या अवधूतवरील कोट्या मजेशीर होत्या. सर्वोत्कृष्ट असे सलील म्हणाला. अवधूतला पण खूप आवडलं. अप्रतिम गायली असे अवधूत म्हणाला. वरचा "सा" मिळाला.




आठवे गाणं म्हणायला आली अश्विनी देशपांडे "हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते".परवीन सुलताना च्या पद्धतीने चांगली गायलीस असे सलील म्हणाला. अभिजीतला पण आवडले. अवधूतला आवडले, पण उच्चार नीट आले नाहीत असे त्याचे मत होते. "प" मिळाला. "



आता राहुल सक्सेना आला शेवटचे गाणं म्हणायला. याने म्हटले "तुमसे मेरी लगन लगी" हिंदी गाणे असल्याने तसा उच्चाराचा काही प्रश्न नव्हता याला. अभिजीतच्या मते गाणं एकदम बरोबर होते अजिबात चूक झाली नाही. सलीलला पण आवडले. अवधूतला आवडले "ध" मिळाला.




आता निकाल. आज यातील ४ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आज पुढे गेले अभिलाषा चेल्लाम, राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे.





हा निकाल अगदीच धक्कादायक होता. राहुल सक्सेनाला होता ध+ध, अश्विनीला ध+प, अपूर्वा गज्जलाला ध+ध, आणि ऋतुजा लाडला "ध + नी" पण ती पुढे गेली नाही. आणि सगळ्यात जास्त चांगला Permormance होता राहुलचा असे अभिजित म्हणाला पण नंतर लगेच बदलला, कारण खर तर अभिलाषाला ध + सा होता. यात एकाच परीक्षकाचे मार्क दाखवतात आणि इतर परीक्षकांचे नाही. त्यामुळे या मधून बरेचदा, मार्कांचा फेरबदल आणि कोणाला आत आणायचे आणि कोणाला बाहेर टाकायचे हे ठरवतात असे पुन्हा लक्षात आले आहे.



Fifth song was by Tushar Shinde, "zanak zank mori baje payaliya". Sixth song was by Swarada Gokhale, "Paan khaye saiya hamaro". Seventh song was by Abhilasha Chellam, "Nadiya kinare harayee aayee kangana". After this Ashwini Deshpande sung "Hume tumase pyar kitna" . Last song was by Rahul Saxena "tumase meri lagan lagi".

And the result was very surprising and partial. Abhilasha Chellam, Rahul Saxena, Ashwini Deshpande and Apurva Gajjala went ahead. The mystery is Rutuja laad better marks than Ashwini and Apurva, but still she was nominated for the knock out round.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १९ ऑक्टोबर २००९. - भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दिवाळीच्या मुहुर्तावर उपान्त्य फेरीचा श्रीगणेशा होतो आहे. एकून ३६ स्पर्धकांना घेउन सुरु झालेली स्पर्धा आता १८ स्पर्धकांना घेउन उपान्त्य फेरीपर्यंत पोचली आहे. आज ९ स्पर्धक आले आहेत. आजचे मान्यवर परीक्षक होते अभिजित.

स्पर्धेची सुरवात अभिलाषा चेल्लामच्या गाण्याने झाली. हिने "अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू " हे गाणं म्हटले. खूपच छान म्हटले. अभिजितने गाण्याची खूपच स्तुती केली. सलीलला पण खूप आवडले. अवधूतला पण आवडले. आज फक्त सलीलचे मार्क दिसणार आहेत. सलीलने "ध" दिला.




दुसरे गाणं सादर करायला आला तुषार शिंदे, "भक्तीवाचून मुक्तीची मला जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी" सुरवातीचे आलाप तितकेसे छान आले नाही. पण नंतर गाणं चांगले रंगले. भाव खूप छान आले नाहीत असे अभिजीतचे म्हणणे होते. तसेच सलील आणि अवधूतचे पण म्हणणे होते. "प" मिळाला.




त्यानंतर आला राहुल सक्सेना, ह्याने "दयाघना तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी ". गाणं चांगले म्हटले. अभिजितने अतिशयच स्तुती केली. अवधूतला आवडले, तो म्हणाला कि त्याच्या आवाजात कंप आहे आणि त्याचा चांगला वापर झाला. पण सलीलच्या मते सुरवात इतकी छान झाली नाही पण नंतर चांगले झाले. "ध" मिळाला.





चौथे गाणं गायला स्वरदा गोखले आली हिने "शोधू मी कुठे कशी प्रिया". गाणं चांगलंच म्हटले. अभिजीतच्या मते गाणं खूप छान झाले नाही. अवधूत म्हणाला कि आवाजात कंप होता. सलीलचे अजून वेगळेच मत होते. "प" मिळाला.





पाचवे गाणं म्हणायला आली अश्विनी देशपांडे. आज हिने "जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार". गाणं छान म्हटले पण परत नाकात म्हणते आहे असं वाटत होते. अभिजितने खूप वाखणंल. अवधूतच्या मते पण आवाज नाकातून येत होते. सलीलला देखील आवडले, "ध" मिळाला.




Today semifinal starts. Out of 36 participants, 18 participants has reached this this stage. Today's special judge is Abjijit. Today only Salil marks will be seen.

First song was sung by Abhilasha Chellam. "Avachita parimalu zulakala alumalu". Second song was by Tushar Shinde, "viththala mich khara aparadhi" Then came Rahul Saxena, "Dayaghana, tutale chimane gharate, urlo bandi asa mi". Swarada Gokhale sung "shodhu mi kadhi priya tula". Fifth song was by Ashwini Deshpande "Johar maybaap johar, tumachya maharacha mi mahar". Then came round of hindi songs. Apurva Gajjala sung "woh chup rahe to mere dil ke dag jalate hai". Saurabh Kadgaokar sung "jab deep jale aana jab sham dhale aana". Prasanna prabhu Tendulkar sung "seene me jalan aakho me tufan sa kyo hai" Last song in today's program was by Rutuja Laad "ab ke savan jam ke barase, bah haye rang meri chunar se". Today those participant sung hindi song will sing marathi song and vice versa.



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

पुढील फेरीमध्ये २४ स्पर्धक आले आहेत. त्यातील १२ स्पर्धक मागील आठवड्यात गायले आणि आज पुढील १२ गाणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "सावनी शेंडे". हि शास्त्रीय संगीतात खूपच प्रसिध्ध आहे. आज एकूण ६ स्पर्धक आहेत प्रत्येक स्पर्धक २ गाणी सदर करणार आहेत.

आजच्या स्पर्धेची सुरवात सागर जाधवच्या "गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" या गाण्याने झाली. गाणं त्याच्या आवाजात खूप छान वाटत होते. सगळ्या परीक्षकांनी त्याची वाहवा केली पण मार्क "प" मिळाले.





दुसरं गाणं अश्विनी देशपांडेचे होते. तिने "अगा करुणाकरा" हे गाणं म्हटले. गाणं चांगले म्हटले. अवधूतच्या मुंगीच्या शेपटीवरील ढेकुण म्हणजे अतीच झाले. गाणं अप्रतिम होतं असा सलीलचा शेरा होतं. "ध" मिळाला.





तिसरं गाणं सुस्मिरता दवाळकरचे झाले. "बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव". जीव आणि भाव ओतून म्हटले. खूप छान म्हटले. अवधूत प्रथमच अध्यात्मावर बोलला. मला नीटसे कळलं नाही. पण त्यावर सलीलचे मत पटणारे होते. "ध" मिळाला. एका ठिकाणी उच्चार चुकले होते.





चौथे गाणं होते मृण्मयी तिरोडकरचे. हि अपक्ष उमेदवार होती मागील भागात. हिने "डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली" हे गाणं म्हटले. सावनीच्या मते पहिली ओळ खूप सुरात येते आणि तीच ओळ परत म्हटली कि कुठेतरी बेसूर होते. आणि अवधूतच्या मते ती घाबरली होती. पण तरीही तिला "ध" मिळाला.





पाचवे गाणं स्वरदा गोखले चे "नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला". सुरवातीला स्वर हलले असे सलीलचे मत होते. सगळ्या परीक्षकांनी कौतुक केले. "ध" मिळाला.





सहावे गाणे "चांदण्या रात्रीतली ती स्वप्ना तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा" हे मोना कामतने म्हटले. माझ्या मते खालचे स्वर जरा कापत होते. पण गाणं चांगले होते. सलीलला खूप आवडले नाही. कारण त्याच्या मते भाव नीट आले नाही. "प" मिळाला.



Today was the second week of the second round. Last week 12 participant had performed and this week next 12 will perform. Today, out of this 12, 6 will present 2 songs each. Today's special judge was Savani Shende. She is one of the blooming Hindustani classical singer in today's era. The episode started with the song "Gaon jagavit aali vasudevachi swari". Song was performed by Sagar Jadhav. Sagar got "pa". The second was by Ashwini Deshpande, Aga Karuna Kara. She got "dha" for this performance. Third song was by Susmirata Davalkar, "Bolava Viththal, pahava viththal", She got "dha" for this. Forth song was by Mrunmayi Tirodkar, "Dolyavarun mazya utarun ratra geli". Performed very well and received "dha". Fifth song was by Swarada Gokhale, "Thakale re nandalala". Very well sung, received "dha". The last song was by Mona Kamat, "Chandanya ratritali ti swapna tu visarun ja". As per the judges she was little tensed and that is why performance was not upto the mark. She received "pa". So in the first round of today, Sagar Jadhav and Mona Kamat was trailing. Now let us see what happens in the next performance.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

आता आजच्या भागातील गाणं म्हणण्याची दुसरी संधी. पुन्हा सागर जाधव गाणं गायला येतो. "या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे". मंगेश पाडगावकरांचे अजरामर गाणं. सागरने खूपच छान म्हटले. "ध" मिळाला.





नंतरचे गाणं मृण्मयी तिरोडकर "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती गं" सलीलच्या मते गाणं घाबरल्यासारखे झाले. सावनीचे मत तसेच होते, कि सुराला कमी जास्त होतं. अवधूतच्या मते हिच्या आवाजाला हे गाणं योग्य होतं. तिला "प" मिळाला.






नववे गाणं, "शंभो शंकरा, करुणाकरा " स्वरदा गोखलेच्या आवाजात. अवधूतच्या मते हिचा आवाज खूप गोड आहे. अवधूतच्या उपमा काहीही असतात असे आता जाणवले. सावनीच्या मते सुरवातीला जास्त छान झाले नंतर, कुठेतरी गाणं निसटले. सलीलला पण तसेच वाटले. तिला "प" मिळाला.





दहावे गाणं सुस्मारिता दवाळकारच्या आवाजात "नको रे नंदलाला ". सगळ्या परीक्षकांच्या मते हिने खूप छान म्हटले आणि गाण्यातले फरक चांगले दाखवून दिले. एक नोट वर चालले असते असा सगळ्यांचा सूर होता. "ध" मिळाला.





११ वे गाणं मोना कामातचे "अंगणी माझ्या मनाच्या मोर दाटू लागले". सलीलच्या मते जागा घेताना कष्ट पडत होते. पण एकूण गाणं चांगल झाले. पुन्हा "प" मिळाला.





शेवटचे गाणे "गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी" हे अश्विनी देशपांडेचे झाले. मला धृवपद जरा नाकातून वाटले. सलीलच्या मते श्वास पूरत नव्हता. सावनी म्हणाली कि हे गाणं कठीणच आहे पण तरीही तिला ते आवडले. खालचे स्वर नीट लागले नाहीत असा अवधूतचा शेरा होता. "प" मिळाला.





आता निकाल. दोन्ही गाणी ज्यांची चांगली झाली तेच पुढे जाणार असं ठरले होते त्यानुसार सुस्मिरता दवाळकर आणि स्वरदा गोखले पुढे गेल्या. आणि आजचा "बेस्ट पेर्फोर्मेर" म्हणून स्वरदा गोखलेला निवडले गेले. सावनीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.






Now the second song performance by all the participants. Sagar Jadhav sung "ya janmavar ya jaganyavar". Next song was by Mrunmayi Tirodkar "balagu kashala vyartha kunachi bhiti ga". After that Swarada Gokhale performed "Shambho shankara". Susmita Davalkar's "nako re nandalala" was the next song. and then Ashwini Deshpande sung "tu tar chaphekali". And then in the result, only 2 people went ahead, Swarada Gokhale and Susmirata Davalkar. Swarada Gokhale received the best performer award.