Showing posts with label Sidhdhesh Paralikar. Show all posts
Showing posts with label Sidhdhesh Paralikar. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ६ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

उपांत्य पूर्व फेरीचा शेवटचा भाग आज होता. आजचे मान्यवर परीक्षक म्हणून रघुनंदन पणशीकर होते "जाऊ देवाचिया गाव देव देईल विसावा" या रघुनंदन पणशीकरांच्या गाण्याने सुरवात झाली. आजच्या कार्यक्रमाचे अजून एक विशेष म्हणजे आज सलीलचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्यासाठी एक केक आणला होता.





आजच्या स्पर्धेत ६ स्पर्धक होते. त्यातील २ अवधूतच्या गटातील तर ४ सलीलच्या गटातील. सलीलला वाढदिवसाची भेट म्हणून अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे अवधूत म्हणाला. आज सगळे स्पर्धक २ गाणी म्हणणार होती.

स्पर्धेची सुरवात "अवघे गर्जे पंढरपूर" या ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. हि मुलगी सगळ्यात बिनधास्त आहे आणि ती खूपच आत्मविश्वासाने गाणं म्हणते. अवधूत आणि सलील च्या एकमेकांवरील कोट्या मजेशीर होत्या.





स्पर्धेतील दुसरे गाणं "सजल नयन नितधार बरसती" हे सिद्धेश परळीकरने म्हटले. मस्त म्हटले. काही काही जागा खूप छान घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले गेले. पण मार्क मात्र जास्त मिळाले नाहीत कारण सुराला चिकटून गाणं झालं आहे असे परीक्षकांना वाटले नाही.





तिसरे गाणं श्रीरंग जोशीचे "काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल". गाणं चांगलं म्हटले. अवधूतच्या कॉमेन्टस मजेशीर होत्या.





चौथे गाणं सौरभ दफ्तरदारचे "लाजून हसणे अन हसून हे पाहणे".सौरभने गाणं छान म्हटले, पण सलिलचे मत असे होते की त्याने खुप जास्त भाव न आणता गाणं म्हटले. या कार्यक्रमामधे सलिल आणि अवधूतच्या एकामेकंवारिल कमेंट्स मुळे खुप जीवंतपणा येतो.





पाचवे गाणं आकांक्षा देशमुखचे "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात" गाणं खूपच छान म्हटले. या गाण्यावर आकांक्षाला "नी" मिळाला. खूपच अप्रतिम गाणं झालं.





सहावे गाणं, राहुल सक्सेनाचे "बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात". गाणं चांगले म्हटले पण शब्दाचे उच्चार नीट झाले नाहीत. बरेचदा "माळ" चा उच्चार "माड" असा झालं. पण तरीही त्याचे कौतुक करण्यात आले याचे जरा आश्चर्य वाटले. यासाठी त्याला "नी" मिळाला.






Today was the last day of the second round. Today's Judge was "Raghunandan Panashikar". Program started by his song, "Jau devachiya gava, dev deil visava". Today's special thing was, it was Salil's birthday. As a birthday gift, there were 2 participant from Avadhoot's group and 4 from Salil's group.

First song of the competition was sung by Rutuja Laad, "Avaghe garje pandharpur". It was sung very well. Second song was by Sidhdhesh Paralikar "Sajal nayan nitdhar barasati". Did not get much marks. Third song was by Shrirang Joshi, "Kaya hi pandhari atma ha viththal". It was sung very well. Forth song was by Saurabh Daftardar "Lajun hasane an hasun he pahane". He did not get much marks as judges felt it was not with full emotion. Fifth song was by Akanksha Deshmukh "Chandanyat phiratana maza dharalas haat". Very good song and she sung very well. She got highest marks for the first time. Sixth song was by Rahul Saxena, "Bagalyachi maal phule ajuni ambarat". He sung very well, but he did not pronounce "La" very well, many times it sounded like "Da". Still he got highest marks.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ६ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

आता या भागातील दुसरा राउंड सुरु झालं. यात परत सगळ्या स्पर्धकांनी दुसरे गाणं म्हटले. पुन्हा ऋतुजा लाडच्या "युवती मना दारूण रण रुचिर प्रेम से". गाणं चांगले म्हटले पण सलीलच्या कॉम्मेंत्स मध्ये तिने अजून सुधारायला हवे असे म्हणणे होते.





दुसरे गाणं सिद्धेश परळीकरचे "वृन्दावनी सारंग हा का लावी घोर जीवाला". खूप छान म्हटले. सगळ्यांच्या मते सूर आणि भाव एकत्र आणणे कठीण होते. त्यामुळे भाव जास्त आले नाहीत.





तिसरे गाणं सौरभ दफ्तरदारचे, "मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून नाहीतर देवा...." खूप छान म्हटले. सगळ्यांना आवडले. या गाण्यासाठी "ध" मिळाला.





चौथे गाणं श्रीरंग जोशीचे "अलबेला आला, आला जयराम आला" . गाणं चांगले म्हटले. बऱ्याच दिवसाने हे गाणं ऐकायला मिळाले.





पाचवे गाणं आकांक्षा देशमुखचे "राती अर्ध्या राती असे सोडून जायचे नाय". खूपच सुरेल आणि भावपूर्ण म्हटले. पुन्हा दुसरा "नी" मिळाला




सहावे गाणं राहुल सक्सेनाचे "हे राजे जी रं जी रं " हे शिवाजीराव भोसले बोलतोय मधले गाणं झालं. गाणं मस्तच म्हटले, यात मात्र त्याचे उच्चार चांगले झाले. आणि कोरस पण खूप छान म्हटले. यासाठी त्याला वरचा "सां" मिळाला.




आता निकाल. आज एकूण ३ स्पर्धक पुढे जाणार आहेत. त्यात आहेत "राहुल सक्सेना, ऋतुजा लाड आणि आकांक्षा देशमुख". उरलेले तिघे पुन्हा "knock - out round " मध्ये जाणार. आणि आजचा "Best Performer " म्हणून राहुल सक्सेनाला मिळाले.





कार्यक्रमाची सांगता सलील कुलकर्णीच्या गाण्याने झाले "कोमेजून निजलेली एक परी राणी" या गाण्याने झाली. जणू काही सलील त्याच्या वाढदिवसाची "Return Gift " देतो आहे. संदीप खरेनी गाणं खूपच मस्त लिहिले आहे. सलीलचे संगीत पण अतिशय श्रवणीय.





Now the second songs by all participant. First song was by Rutuja Laad, "Yuvati mana darun ran ruchir prem se". Second song was by Sidhdhesh Paralikar "Vrundavani sarang ha ka laavi jeev jeevala". Third song was by Saurabh Daftardar "Malharwari motiyan dyavi". Forth song was by Shrirang Joshi, "Albela aala, aala jayaram aala". Fifth song was by Akaksha deshmukh "raati ardhya raati". Sixth song was by Rahul Saxena from "shiwajiraje bhosale bolatoy", "he raaje jee ra jee ra". Now the result, 3 participant will go in the next round and the rest 3 will go in the Knock-Out round. These 3 participant were "Rahul Saxena, Rutuja Laad and Akanksha Deshmukh". And the best performer of this day was "Rahul Saxena". End of the program was by Salil's song "Damalelya bapachi he kahani "