Showing posts with label Pallavi Joshi. Show all posts
Showing posts with label Pallavi Joshi. Show all posts

सारेगमप - १ जून २०१०, भाग १

आजच्या कार्यक्रमाची सुरवात अजित परब च्या गाण्याने झाली. "बोला जय बजरंग, जय हनुमान ". आजच्या दिवशी एक स्पर्धक बाहेर जाणार आहे.




आजची पहिली स्पर्धक होती आनंदी जोशी. हिने आज "अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, " मुळ गायिका वैशाली सामंत, गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत.

Todays first participant was Anandi Joshi, Original singer Vaishali Samant, Lyrics Chandrashekhar Saanekar, Music is by Avadhoot Gupte. Today's no one marks is shown. 





त्यानंतर आला अनिरुध्ध जोशी. याने आज नाट्यसंगीत सादर केले. "मी मान - अपमान नच मानितो". मुळ गायक रामदास कामात , गीत वि. वा शिरवाडकर,  संगीत पं. जितेंद्र अभिषेकी. हे गाणं ययाती-देवयानी या नाटकातील आहे


Anirudhdha Joshi performed Natya-Sangeet. He performed "mi maana-apaman nach manito, Original singer Raamdas Kamat, Lyrics V. V. Shirvadkar, Music is by Pa. Jitendra Abhisheki. This song is from marathi natak, Yayati-Devyani.



मग आला राहुल सक्सेना याने "अंधार दाटला बेभानाल्या दिशा... घे सावरून मन हे साजणा" मुळ गायक सुखविंदर सिंग, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाना रिंगा-रिंगा या चित्रपटातील आहे.

Rahul Saksena performed "andhar daatala bebhanalya disha... ghe savarun man he saajana ". Original singer Sukhvinder Sing, Lyrics Guru thakur, Music Ajay- Atul



Part 2

सारेगमप - ३१ मे २०१०, भाग १

आज स्पर्धेत ६ स्पर्धक आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत अजित परब. आज स्पर्धेत ६ स्पर्धक आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत अजित परब. आजच्या स्पर्धेची सुरवात झाली अनिरुध्ध जोशीच्या गाण्याने. आज अनिरुध्ध जोशीने "जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो". मुळ गायक सोनू निगम-रुपकुमार राठोड, गीत इसरार अन्सारी, संगीत जतीन-ललित. हे गाणं सरफरोश या हिंदी चित्रपटातील आहे. कोरसला राहुल, मंगेश आणि विजय गटलेवार होते. आज फक्त अवधूतचे मार्क दिसणार आहेत. अवधूतने अनिरुद्धला "ध" दिला.

Today there are 6 participant in the competition. Today's special guest is Ajit Parab. Todays competition started with Anirudhdha Joshi's song. He performed "Jindagi maut na baan jaaye sambhalo yaaro". Original Singer Sonu Nigam-Rupkumar Rathod, Lyrics Israr Ansari, Music Jatin-Lalit. This song is from Hindi movie "Sarfarosh". Vijay Gatlewar, Mangesh Borgaokar, Rahul Saksena was in chorus. Today Only Avadhoot's mark will be shown. Avadhoot gave "dha"




त्यानंतर आला विजय गटलेवार. याने मल्हारवारी "मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून" हे गाणं सादर केले. मुळ गायक शाहीर साबळे, अजय गोगावले, गीत शाहीर साबळे- गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाणं "अगं बाई अरेच्च्या" या मराठी चित्रपटातील आहे. कोरसला अपूर्वा गज्जला आणि आनंदी जोशी होत्या. अवधूतने "म" दिला.

Vijay Gatlewar sung "motiyan dyavi bharun nahitar deva, deva mi jato durun". Original singer Shahir Saable, Ajay Gogavale, Lyrics Shahir Saabale - Guru Thakur, Music is by Ajay-Atul. Chorus is given by Anandi Joshi and Apurva Gajjala. This song is from "aga baai arechcha" Avadhoot gave "ma"





त्यानंतर आली आनंदी जोशी. हिने "दिल खो गया है किसी का, अब रस्ता मिल गया ख़ुशी का" हे गाणं सादर केले. मुळ गायिका श्रेया घोषाल-राहत फतेह अली खान, गीत मयूर पुरी, संगीत प्रीतम. हे गाणं सिंग इज किंग या सिनेमातील आहे. राहुलने आनंदीला साथ दिली. अवधूतने प दिला.

Anandi Joshi peformed "dil kho gaya hai kisi ka, ab rasta mil gaya khushi ka". Original singer is Shreya Ghoshal-Rahat Phateh ali khan, Lyrics Mayur Puri, Music is by Pritam. This song is from Hindi movie "Singh is King". Avadhoot gave "pa".




मंगेश बोरगावकरने "ना है ये पाना ना खोना भी है, तेरा ना होना जाने क्यू होना भी है, तुमसे हि दिन होता है" हे गाणं सादर केले. मुळ गायक मोहित चौहान, गीत इर्शाद कामिल, संगीत प्रीतम.हे गाणं "जब वी मेट" या चित्रपटातील आहे. मंगेशने खरच खूप छान गाणं म्हटले. गाण्याला आनंदी आणि अपूर्वाने साथ दिली. अवधूतने प दिला

Mangesh Borgaokar sung "naa hai ye paana na khona bhee hai, tumase hee din hota hai, tumase hi". Original singer is Mohit Chouhan, Lyrics is by Irshad Kaamil, Music is by Pritam. This song is from "jab we met". Chorus was given by Anandi and Apurva. Avadhoot gave "pa".




अवधूतची पल्लवीने घेतलेली फिरकी. आणि अवधूतने सांगितलेली गम्मत, व अवधूतने म्हटलेले अमिताभचे



Part 2

सारेगमप - २५ मे २०१०, भाग १

आज एकूण ७ स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक आज बाहेर पडणार. आजचे मान्यवर परीक्षक आहेत फैजल कुरेशी.
आजच्या कार्यक्रमाची सुरवात फैजल कुरेशी यांच्या तबला वादनाने झाली.





स्पर्धेची सुरवात आज मंगेश बोरगावकरच्या गाण्याने झाली. मंगेशने "सजल नयन नित धार बरसती" हे गाणं सादर केले. मुळ गायक अजितकुमार कडकडे, गीत शांताराम नांदगावकर, संगीत अशोक पत्की. आज कोणाचेच मार्क दिसणार नाही.

Mangesh Borgaokar performed "Sajal nayan neet dhar barasati", Original singer Ajitkumar kadkade, Lyrics Shantaram Naandgaokar, music is by Ashok Patki.




विजय गटलेवारने "जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली" सादर केले, मुळ गायक अरुण दाते, गीत मंगेश पाडगावकर, संगीत यशवंत देव. गाणं ठीक होते. खूप छान नाही.

Vijay Gatlewar presented "jevha tichi na mazi chorun bhet zali". Original singer Arun Date, Lyrics Mangesh Padgaokar, Music is by Yashwant Dev.




आनंदी जोशीने "जादू है नशा है मदहोशिया तुझको भूलाको अब जाऊ कहा " हे गाणं सदर केले. मुळ गायिका श्रेय घोशाल . गीत निलेश मिश्रा, संगीत एम एम क्रिस, हे गाणं जिस्म या चित्रपटातील आहे.

Anandi Joshi performed "Jadu hai nasha hai madhoshiya tuzko bhulako ab jaau kaha". Original Singer Shreya Ghoshal, Lyrics Nilesh Mishra, Music is by M.M.Chris. This song is from Hindi movie, Jism.




अनिरुध्ध जोशीने "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे ग साजणी ये ना". मुळ गायक जयवंत कुलकर्णी, गीत शांता शेळके, संगीत देवदत्त साबळे. गाणं मस्तच म्हटले.

Anirudhdha Joshi performed "manachya dhundit laharit ye na, sakhe ga sajani ye na". Original singer Jayavant Kulkarni, Lyrics Shanta Shelake, Music Devdatta Sabale.




Part 2

सारेगमप - २५ मे २०१०, भाग २

Part 1

ज्ञानेश्वर मेश्रामने "त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला " हे गाणं सादर केले. मुळ गायिका शोभा जोशी, गीत गुलाबराव महाराज माधनकर , संगीत यशवंत देव.

Dnyaneshwar Meshram performed song by Gulabrao Maharaj Madhankar, "Tyajuni kaam, aaj shyam drushti pahila". Original singer of this song is Shobha Joshi, Music is by Yashwant Dev.




अपूर्वा गज्जलाने "चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, जहर चहा अगर पिना तो पिने ना दिया" मुळ गायिका आशा भोसले, गीत एस. एच. बिहारी, संगीत ओ. पी. नय्यर, हे गाणं "प्राण जाये पर वचन ना जाये" या चित्रपटातील आहे.


Apurva Gajjala sung "chain se humko kabhi aapne jeene naa diya, jahar chaha agar pinaa to pine naa diya". Original singer Asha Bhosale, Lyrics S.H.Bihari, Music O.P. Nayyar, This song is from "pran jaaye par wachan naa jaye".




राहुल सक्सेनाने "दिल के रास्ते में मैने ठोकर कैसे खायी, तनहाई, तनहाई" हे गाणं सादर केले. मुळ गायक सोनू निगम, गीत जावेद अख्तर संगीत शंकर-एहसान-लॉय, हे गाणं "दिल चाहता है" या हिंदी चित्रपटातील आहे.

Rahul Saxena performed "Dil ke raaste mai maine thokar khayi, tanhaai, tanhaai". This song is ffom "Dil Chahata hai" movie. Original singer of this song is Sonu Nigam, Lyrics is by Javeed Akthar, Music is by Shankar-Ehasan-Loy.




आता निकाल. आज सगळ्यात खाली असलेले तीन स्पर्धक, विजय गटलेवार, मंगेश बोरगावकर आणि ज्ञानेश्वर मेश्राम. त्यात, ज्ञानेश्वर मेश्राम आज बाहेर पडले.

Now result, Today's 3 participant in the danger zone are Dnyaneshwar Meshram, Vijay Gatlewar, Mangesh Borgaokar. Finally Dnyaneshwar Meshram is eliminate.

सारेगमप - २४ मे २०१०, भाग १

आजच्या भागात प्रत्येक स्पर्धक एका विशिष्ट वाद्याचा प्रयोग असणारे गाणं म्हणणार आहे. आजचे मान्यवर परीक्षक आहेत प्रसिध्ध तबलावादक फैजल कुरेशी.

प्रथम आला ज्ञानेश्वर मेश्राम. याने "काय हि पंढरी आत्मा हा विठ्ठल". मुळ गायक पं. भीमसेन जोशी, रचना संत एकनाथ, संगीत राम फाटक यांचे आहे. आज फक्त अवधूतचे मार्क दिसणार आहेत. ज्ञानेश्वर मेश्रामला "प" मिळाला.

Today program each participant will sing a song in which there is a use of a special instrument. Todays special judge was Phaisal Kureshi.

First song was by Dnyaneshwar meshram. He performed "kaya hi pandhari atma ha viththal". Original singer pa. Bheemsen Joshi, Lyrics Sant Eknath, Music Raam Pathak. Today only Avadhoot's marks are shown. Avadhoot gave "pa"





नंतर आला मंगेश बोरगावकर. याने ती येते आणिक जाते, येताना ती कळ्या आणते. आणि जाताना फुले मागते." मुळ गायक महेंद्र कपूर, गीत आरती प्रभू, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. अवधूत ने म दिला

Then came Mangesh borgaokar. He performed "ti yete anik jate, yetana ti kalya magate". Original singer – Mahendra Kapur, Lyrics Aarati Prabhu, Music is by Pa. Hrudaynaath Mangeshkar. Avadhoot gave "pa"




अपूर्वा गज्जलाने "जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी". कोरस ला अनिरुध्ध, राहुल, विजय अनिरुध्ध होते. कोरस खूप छान झाले असे वाटले नाही. मुळ गायिका आह्सा भोसले, गीत ना. धो. महानोर, संगीत हृदयनाथ मंगेशकर, हे गाणं मराठी चित्रपट "जैत रे जैत" या सिनेमातील आहे. अवधूतने ध दिला.

Apurva Gajjala presented "Jambhul pikalya zadakhali dhol wajaji", Original Singer Asha Bhosale, Lyrics Na. Dho. Mahanor, music is by Hrudaynath Mangeshkar. This song is from marathi movie Jait Re Jait. Avadhoot gave dh for this song.




त्यानंतर आला अनिरुध्ध जोशी.. याने "देवाघरचे ज्ञात कुणाला" हे गाणं सदर केले. मुळ गायक रामदास कामत, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, गीत वसंत कानेटकर. हे गाणं मत्स्यगंधा या संगीत नाटकातील आहे. अवधूतने सा दिला.

Anirudhdha Joshi sung "Devagharache dnyat kunala". Original singer Ramdas Kamat, music is by Pa. Jitendra Abhisheki, Lyrics of this song is written by Vasant Kanetkar. This song is from musical drama "Matsyagandha". Avadhoot gave "saa"





Part 2

सारेगमप - २४ मे २०१०, भाग २

Part 1

राहुल सक्सेनाने "चांगभल रं चांगभल रं ज्योतिबाच्या नावाने चांगभल रं" गाण्यात कोरस मंगेश, विजय, अनिरुध्ध आणि ज्ञानेश्वरने दिले. मुळ गायक आणि संगीत अजय-अतुल, गीत गुरु ठाकूर. हे गाणं मराठी चित्रपट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील आहे. अवधूतने ध दिला

Rahul Saksena performed a song from marathi movie "tuzya mazya sansarala aani kaay hava", "changabhala ra, jyotibachya navana changabhal ra". Original singer and Music is by Ajay-Atul. Lyrics is by Guru Thakur. Avadhoot gave "dha"



विजय गटलेवारने "ग साजणी, आली ठुमकत, लचकत, मान मुरडत हिरव्या रानी" हे पिंजरा या चित्रपटातील गाणं सदर केले. मुळ गायक विष्णू वाघमारे, गीत जगदीश खेबुडकर, संगीत राम कदम. कोरस मध्ये राहुल, अनिरुध्ध, मंगेश आणि ज्ञानेश्वर होते. अवधूतने ध दिला

Vijay Gatlewar sung "Aali thumkat, lachkat, maan murdat hirvya rani". This song is from marathi movie "pinjara". Original singer, Vishnu Waghmare, Lyrics Jagdish Khebudkar, Music is by Raam Kadam. Avadhoot gave "dha"



आनंदी जोशीने "हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत वि. दा. सावरकर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. कोरस मध्ये, अनिरुध्ध, विजय, मंगेश आणि अपूर्वा होते. अवधूतने प दिला.

Anandi Joshi performed "e hindu nrusinha prabho shivaji raja". Original singer Lata Mangeshkar, lyrics is by Vi. Da. Savarkar, Music is by Hrudayanath Mangeshkar. Avadhoot gave "pa". Anirudhdha, Vijay, Mangesh and Apurva.




सगळ्यात कमी मार्क मिळालेले खालील ३ स्पर्धक होते, ज्ञानेश्वर मेश्राम, मंगेश बोरगावकर आणि आनंदी जोशी.
In todays program bottom three patricipants were, Dnyaneshwar Meshram, Mangesh Borgaokar, and Anandi Joshi.



सारेगमप - १८ मे २०१०, भाग १

आजच्या कार्यक्रमाची सुरवात अवधूत आणि स्वप्नीलच्या "सावधान सावधान वणवा पेट घेत आहे." आजच्या भागात एक स्पर्धक बाहेर जाणार. आज कोणाचेही मार्क दिसणार नाहीत. स्पर्धेची सुरवात आनंदी जोशीच्या गाण्याने झाली.

हिने "घन राणी साजणा" हे गाणं म्हटले. मुळ गायक आशा भोसले. गीत शांता शेळके, संगीत श्रीधर फडके, हे गाणं ऋतू हिरवा.

Today program started with Avadhoot and Swapnil's "savdhan savdhan vanva pet ghet aahe". Competition first song was by Anandi Joshi. she sung "ghan rani sajana". Original singer Asha Bhosale, Lyrics Shanta Shelke, Music Shreedhar Phadke, This song is from "Rutu hirva" album



विजय गटलेवारने "आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे भिजवून रात्र गेली." मुळ गायक सुरेश वाडकर, गीत सुरेश भट, संगीत रवी दाते, हे गाणं "हे रंग मैफलीचे" या अल्बम मधील आहे.

Vijay Gatlewar sung "Atach amrutachi barsun raat geli, atach aang maze bhijavun raat geli". Original singer Suresh Wadkar, Lyrics Suresh Bhat, Music Ravi Date. This song is from "He rang maifiliche".




अनिकेत सराफ ह्याने "कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी, पैश्यात भावनेचा व्यापार पहिला मी. " मुळ गायक आणि संगीत श्रीधर फडके, गीत अनिल कांबळे. गाणं चांगले म्हटले.

Aniket Saraf sung "kovalya phulancha bajar pahila mi, paishyat bhavanecha vyapar pahila mi". Original singer and music is by Shreedhar Phadake, Lyrics is by Anil Kambale.



मग आला ज्ञानेश्वर मेश्राम "माय मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलांना भेटाया.", मुळ गायक रवींद्र साठे, गीत जगदीश खेबुडकर, संगीत अच्युत ठाकूर. हे गाणं चिमणी पाखरं या चित्रपटातील आहे.

Dnyaneshwar Meshram sung "Maay mandir halale, lage kalas phutaya, aaj ghayal pakshini jaai pilanna bhetaya". Original singer is Ravindra Sathe, Lyrics is written by Jagdish Khebudkar, Music is Achyut Thakur. This song is from a marathi movie Chimani Pakhara.



अपूर्वा गज्जला हिने "चंद्राने टाकलीय ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी, वेडापिसा वारा कसा बेभान होऊन फिरला, देही वणवा पिसाटला", हे गाणं सादर केले. मुळ गायिका सुनिधी चौहान, गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी. हे गाणं "हाय काय नाय काय" या चित्रपटातील होते. गाणं मस्तच म्हटले. अवधूतच्या कोट्या जोरदार होत्या.

Apurva Gajjala sung "Dehi vanava pisatala". This song is sung by Sunidhi Chouhan, Lyrics is by Sandeep Khare, Music is by Salil kulkarni. This song is from movie "haay kaay naay kaay".



Part 2

सारेगमप - १८ मे २०१०, भाग २

Part 1

मग मंगेश बोरगावकर आला. त्याने "ये ये ये ना प्रिये, तुजवीण राहू कसे" हे गाणं सादर केले. मुळ गायक स्वप्नील बांदोडकर, गीत मिलिंद जोशी, संगीत अशोक पत्की, हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे.

Mangesh Borgaokar presented "ye ye ye naa priye, tujvin rahu kase". Original singer Swapnil Bandodkar, Lyrics Milind Joshi, Music is by Ashok Patki. This song is from album "Tu maza kinara".



राहुल सक्सेना आला आणि त्याने "जिया धडक धडक जाये " हे गाणं सादर केले. मुळ गायक फतेह अली खान, गीत असीम रझा, संगीत फैजल रफी, रोहेल कयात. हे गाणं हिंदी चित्रपट "कलियुग" मधील आहे.

Rahul Saksena sung "Jiya dhadak dhadak jaaye". Original singer Fateh Ali Khan, Lyrics Aseem RRaza, Music Phaisal Rafi, Rohel Kayat. This song is from hindi movie "Kaliyug".



अनिरुध्ध जोशीने "हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने" हे गाणं म्हटले. मुळ गायक सोनू निगम, गीत जगदीश खेबुडकर, संगीत जितेंद्र कुलकर्णी. हे गाणं नवरा माझा नवसाचा या चीत्रापातील आहे. अवधूतने ध दिला.

Anirudhdha Joshi sung "Hirva Nisarg ha bhavatine, jeevan safar kara mastine". Original singer Sonu Nigam, Lyrics Jagdish Khebudkar, Music Jitendra Kulkarni. This song is from "Navra maza navsacha" movie.




आता निकाल. ८ स्पर्धकांपैकी, ३ स्पर्धक डेंजर झोन मध्ये होते, ते असे, अनिकेत सराफ, मंगेश बोरगावकर आणि विजय गटलेवार. विजय गटलेवार आणि अनिकेत सराफ या दोघांना सारखेच मार्क होते. त्यामुळे पुन्हा एक एक गाणे दोघांनी म्हटले आणि त्याप्रमाणे अनिकेत सराफ बाहेर गेला.

Among 8 participants, 3 were in danger zone today. They were, Aniket Saraf, Mangesh Borgaokar and Vijay Gatlewar. There was a tie break between Aniket Saraf and Vijay Gatlewar. Both of them sung one song again and then judges decided to eliminate Aniket Saraf.

सारेगमप - १७ मे २०१०, भाग १

आज "आपली आवड" अशी गाणी स्पर्धक म्हणणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक "स्वप्नील बांदोडकर ". कार्यक्रमाची सुरवात आज ज्ञानेश्वर मेश्रामने केली. ह्याने "आई भवानी तुझ्या कृपेने तारिशी भक्ताला" म्हटले. मुळ गायक अजय गोगावले, गीत आणि संगीत अजय- अतुल. हे गाणं सावरखेड एक गाव या चित्रपटातील आहे. स्वप्नीलचे मार्क आज दिसणार नाहीत. अवधूतचे मार्क "प".

Todays special judge is Swapnil Bandodkar. Today's program started with Dnyaneshwar Meshram. He sung "aai bhavani tuzya krupene tarishi bhaktala". Original singer Ajay Gogavale. Lyrics and Music Ajay-Atul. This song is from "Savarkhed ek gaav". Avadhoot gave "pa". Swapnil's marks are not shown.




आनंदी जोशीने "हसरा लाजरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. " मुळ गायक पद्मजा फेणाणी जोगळेकर, गीत कुसुमाग्रज, संगीत गिरीश जोशी. हे गाणं "रंग बावरा श्रावण" या अल्बम मधील आहे. अवधूतने प दिला.

Anandi Joshi performed "Hasra lajra jarasa lajra, sundar sajira shravan aala". Original singer Padmaja Phenani-Joglekar, Lyrics Kusumagraj, Music Girish Joshi. This song is from "Rang bavra shravan". Avadhoot gave "pa".



विजय गटलेवारने "चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है.". मुळ गायक आणि संगीत गुलाम अली, गीत हसरत मोहनी. अवधूतने "प" दिला.

Vijay Gatlewar sung "chupake chupake raat din aasu bahana yaad hai". Original singer and music Gulam Ali. Lyrics Hasrat Mohni. Avadhoot gave "pa"




अनिकेत सराफ ने "भेट माझी तुझी सांजवेळी घडे, आता उरी या अंबरी चांदण्याचे सडे" म्हटले. मुळ गायक आणि संगीत मिलिंद इंगळे, गीत सौमित्र. हे गाणं "सांजगारवा" या अल्बम मधील आहे. मध्ये शब्द विसरला. आवाजात एक वेगळाच कंप जाणवत होता. अवधूतने "प" दिला.

Aniket Saraf sung "Bhet tuzi mazi sanjveli ghade, ata uri ya ambari chandnyache sade". Original singer and music Milind Ingale. Lyrics Soumitra. This song is from "Sanj Garva"



अनिरुध्ध जोशी "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात" हे गाणं स्टेजवर घेऊन आला. मुळ गायक वसंतराव देशपांडे, गीत वा. रा. कांत, संगीत श्रीनिवास खळे. अवधूतने "नी" दिला.

Anirudhdha Joshi sung "Bagalyanchi maal phule ajuni ambarat". Original singer Vasantrao Deshpande, Lyrics Va. Ra. Kant. Music Shriniwas Khale. Avadhoot gave "Ni"for his song



Part 2

सारेगमप - १७ मे २०१०, भाग २

Part 1

त्यानंतर आला मंगेश बोरगावकर. याने "आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाये है". मुळ गायक के. के. गीत जावेद अख्तर संगीत विशाल शेखर. हे गाणं ओम शांती ओम मधील आहे. गाणं ठीक होते. अवधूतने "प" दिला.

Mangesh Borgaokar sung "akho me teri ajab si ajab si adaye hai". Original singer K.K. Lyrics Javed Akhtar, Music Vishal Shekhar. This song is from movie "Om shanti om".



अपूर्वा गज्जलाने एक हिंदी गाणं म्हटले "गुंज सा है कोई एक तारा". मुळ गायिका कविता सेठ, गीत जावेद अख्तर संगीत अमित त्रिवेदी. हे गाणं वेक अप सिद या सिनेमातील आहे. या गाण्यात हिला अनिकेतने साथ दिली. अवधूतने "ध" दिला.

Apurva Gajjala sung "gunj sa hai koi ek tara". Original singer Kavita Seth, Lyrics Javed Akthar, Music Amit Trivedi. This song is from "wake up sidh".



राहुल सक्सेनाने मी शिवाजी राजे बोलतोय या सिनेमातील " हे राजे जी रं जी रं ". मुळ गायक सुखविंदर सिंग, गीत अजित परब, गुरु ठाकूर, प्रकाश चव्हाण, संगीत अजय - अतुल - समीर. हे गाणं राहुलने या पूर्वीही याच मंचावर म्हटले आहे. अवधूतने "ध" दिला.

Rahul Saksena sung "he raje jee ra jee ra jee raje re ji ji" from movie "mi shiwaji raje bhosale bolatoy". Original singer Sukhvindar Singh, Lyrics Ajit Parab-Guru thakur- Prakash Chavhan, Music Ajay-Atul-Sameer.




आज ८ स्पर्धकांपैकी कमी मार्क असलेल्या शेवटचे ३ स्पर्धक, विजय गटलेवार, आनंदी जोशी, अनिकेत सराफ.

Bottom three participant among the 8 remaining pariticipants are Vijay Gatlewar, Anandi Joshi, Aniket Saraf.




कार्यक्रमाची सांगता स्वप्नील बांदोडकरच्या गाण्याने झाली.

सारेगमप - ११ मे २०१० - भाग १

आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आणि आज कोणाचेही मार्क दिसणार नाही.
प्रथम आली अपूर्वा गज्जला. हिने "ढग दाटुनी येतात मन वाहुनी नेतात, ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात, झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते माझ्यात." मुळ गायिका साधना सरगम, गीत सौमित्र, संगीत अशोक पत्की, चित्रपट आईशप्पथ. गाणं खूपच सुंदर म्हटले.

Today one participant will go out of the competition. And marks are not going to be displayed. First song was by Apurva Gajjala, She sung "dhag datuni yetat, man vahuni netat". This song is originally sung by Sadhana Sargam, Lyrics is by Soumitra, Music Ashok Patki. This song is from Aaishappath". She sung very well.



मग आला अनिकेत सराफ. ह्याने नसतेस घरी तू जेव्हा हे गाणं म्हटले. मुळ गायक सलील कुलकर्णी, गीत आणि संगीत संदीप खरे. हे गाणं आयुष्यावर बोलू काही या अल्बम मधील आहे.

Second song was by Aniket Saraf. He sung "Nasates ghari tu jevha". Original singer is Salil Kulkarni, Lyrics and music is by Sandeep khare. This song is from "ayushyavar bolu kahi".



मग आला अनिरुध्ध जोशी. ह्याने "आज अचानक गाठ पडे" हे गाणं म्हटले. मुळ गायक आणि संगीत कुमार गंधर्व, गीत कवी अनिल. गाणं चांगलं म्हटले.

Anirudhdha Joshi performed "aaj achanak gaath pade". Original singer and music is by Kumar gandharv. Lyrics is by Kavi Anil.




सायली ओंकने "भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाच उन मला झेपेना". मुळ गायिका अशा भोसले. गीत ना धो. महानोर, संगीत आनंद मोदक. हे गान एक होता विदुषक या चित्रपटातील आहे.
'10 Sayali Oak - Bharla Aabhal




त्यानंतर आला राहुल सक्सेना. याने "वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले, एकमेकावारी उधळले, गेले ते दिन गेले." हे गाणं सादर केले. मुळ गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, गीत भवानीशंकर पंडित, संगीत श्रीनिवास खळे. गाणं खरच खूप छान म्हटले.

Rahul Saxesa performed a song originally sung by Pan. Hrudaynath Mangeshkar, "vegvegli phule umalali rachuni tyanche zele". Lyrics for this song by BhavaniShankar Pandit, Music is by Shriniwas Khale. Very beautiful rendition.
10 Rahul Saxena - Vegvegali Phule Umalali




Part 2

सारेगमप - ११ मे २०१० - भाग २

Part 1

मग विजय गटलेवार आला. याने, "वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, " मुळ गायक आणि संगीत भीमराव पांचाळे, गीत इलाही इनामदार. गाणे नवीनच होते , पूर्वी कधी ऐकले नव्हते. गान ठीक म्हटले. फार वाखाणावे असे वाटले नाही.

Then came Vijay Gatlewar. He sung "andaj aarashyacha". This song is originally sung by Bheemrao Panchale, and music is by Bheemrao Panchale. Lyrics is by Ilahi Inamdar. Looks like this song was not so famous. Not listened before.
Vijay Gatlewar - Andaaz Aarshacha




मंगेश बोरगावकरने "दूर किनारा राहिला, बेभान वारा धावला" हे गाणं सादर केले. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत शांताराम नांदगावकर संगीत अशोक पत्की, हे गाणं सप्तसूर माझे या अल्बम मधील आहे. गाणं ठीक होते.

Mangesh Borgaokar sung "Dur kinara rahila, bebhan wara dhavala". Original singer Suresh Wadkar, Lyrics Shantaram Nandgaokar, Music Ashok Patki. This song is from album "Saptasur Maze".





ज्ञानेश्वर मेश्रामने "विठ्ठल आवडी प्रेमभावो". भक्तिगीते तर माउलीच हातखंडा आहे. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत संत नामदेव, संगीत श्रीधर फडके. हे गाणं "ओमकार स्वरूपा" या अल्बम मधील आहे. गाणं छान झाले असे परीक्षकांचे मत होते.

Dnyaneshwar Mesharam sung "viththal aavadi prembhavo". This song is originally sung by Suresh Wadkar, from album "Omkar Swarupa". Music to this song is by Shreedhar Phadke, while Lyrics is by Sant Naamdeo.




आनंदी जोशीने "जाई जुईचा गंध मातीला हिरव्या झाडाचा छंद गीताला" हे गाणं म्हटले. मुळ गायिका जयश्री शिवराम, गीत ना. धो. महानोर, संगीत आनंद मोडक. हे गाणं मुक्ता या सिनेमातील आहे.

Anandi Joshi sung "jai juicha gandh matila, hirva zadacha chhand geetala". Original singer Jayashri Shivram, Lyrics by Na. Dho. Mahanor, Music is by Anand Modak. This song is from movie "Mukta"




आजच्या कार्यक्रमात डेन्जर झोन मध्ये आज "सायली ओंक, अनिकेत सराफ आणि आनंदी जोशी" होत्या. त्यापैकी सायली ओंक आज बाहेर पडली.

There were 3 participant in Danger zone today. They were "Sayali Oak, Aniket Saraf, Anandi Joshi". Out of these, Sayali Oak was eliminated.

सारेगमप - १० मे २०१०, भाग १

आज प्रेमावरील गाणी म्हणणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "साधना सरगम". साधना सरगम कार्यक्रमाची सुरवाती "पहेला नशा पहेला खुमार". सगळ्यात प्रथम आनंदी जोशी सदर करते, "हि गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा" गीत गुरु ठाकूर, संगीत अवधूत गुप्ते, मुळ गायिका वैशाली सामंत, हे गोलमाल चित्रपटातील गाणं आहे. साधना सरगमचे मार्क दिसणार नाहीत. अवधूतने "ध" दिला.

Today's theme for the songs is "Love Songs". Today guest judge is Sadhana Sargam. Sadhana Sargam sings "pahela nasha pahela khumar" to start the program. First Anandi Joshi performs "Hi Gulabi Hava ved laavi jeeva, haay shwasatahi eiku ye maarava"




दुसरे गाणं सादर करायला आला विजय गटलेवार. याने "तुला पाहतो मी, मला पाहताना" गायले. गीत चंद्रशेखर सानेकर, मुळ गायक आणि संगीत अवधूत गुप्ते. हे गाणं हि सांज सुखाने या अल्बम मधील आहे. सूर थोडे घसरले. अवधूतने "ध" दिला.

Second song was performed by Vijay Gatlewar. He performed a song from "hi Saanj sukhane", Tula phato mi, mala pahatana. Original singer and music is Avadhoot Gupte and Lyrics is by "Chandrashekhar Sanekar. Avadhoot gave "pa".
Vijay Gatlewar - Tula Pahato Mi




मग राहुल सक्सेनाने "चंद्र हा आता मावळाया लागला, प्राण माझाही घडाया लागला" हे गाणं सादर केले. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत सुरेश भट, संगीत रवी दाते, अल्बम रंग मैफिलीचे. अवधूतची सुरेश वाडकरांची नक्कल बघण्यालायक. अवधूतने "ध" दिला.

Rahul Saksena performed "chandra ha ata mavalaya lagala, pran mazahi ghadaya lagala" Original singer is Suresh Wadkar, music by Ravi Daate, Lyrics Suresh Bhat. This song is from "Rang maifiliche". Avadhoot gave "dha"





मग अनिरुध्ध जोशीने "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वर" हे गाणं म्हटले. गीत मंगेश पाडगावकर संगीत श्रीनिवास खळे, मुळ गायक सुरेश वाडकर. गाणं मस्त झाले. अवधूतने "ध" दिला

Anirudhdha Joshi sung "jevha tuzya batanna udhali mujor waara" Original singer Suresh Wadkar, Lyrics is by Mangesh Padgaonkar, and music is by Shriniwas Khale. He received "dha" from avadhoot.





त्यानंतर आली सायली ओंक. हिने एक नवीनच गाणे म्हटले. "जीवघेणा रुसवा कि फसवा अबोला, वाट जुळल्यावारी पळवाटा कशाला" मुळ गायिका मधुर दातार, गीत वैभव जोशी, संगीत कमलेश भडकमकर. हे गाणं स्पर्शगंध या अल्बम मधील आहे. गाणं खूप नाजूक आहे. पण शब्द खूप भरभर म्हणावे लागतात. त्यामुळे जरा पळापळ झाली सायलीची. अवधूतने "प" दिला.

Sayali Oak performed a relatively new song. "jeevghena rusava ki phasava abola, vaat julalyavari palwata kashala", this song was sung by Madhura Datar, lyrics is by Vaibhav Joshi, music is by Kamlesh Bhadkamkar. This song is from "Sparshgandh". Avadhoot gave "pa" for this song.
Sayali Oak - Jeev Ghena Ruswa




मग आला अनिकेत सराफ. ह्याने "पहिले न मी तुला, तू मला न पहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले". मुळ गायक - सुरेश वाडकर, गीत - मधुसूदन कालेलकर, संगीत - अनिल अरुण. चित्रपट गुपचूप गुपचूप. ह्याच्या आवाजात जरा कंप जाणवला. अवधूतने प दिला.

Aniket Saraf, sung "Paahile na mi tula, tu mala na paahile, naa kale kadhi kuthe man vede guntale". Original singer Suresh Wadkar, Lyrics Madhusudan Kalelkar, Music by Anil-Arun. This song is from Gupchup-gupchup. Avadhoot gave "pa"




Part 2

सारेगमप - १० मे २०१०, भाग २

Part 1

मग आला ज्ञानेश्वर मेश्राम. ह्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". मुळ गायक सुधीर फडके, गीत सुधीर मोघे, संगीत राम फाटक. माउली मध्ये मध्ये शब्द विसरला. आणि नंतरची त्याची व परीक्षकांची प्रतिक्रिया मस्त होती. गाणं ठीक झालं. पण अवधूतने "ध" दिला. हे बरोबर वाटले नाही.

Dnyaneshwar Meshram sung "disalis tu phulale rutu". Original singer Sudhir Phadake, Lyrics Sudheer Mothe, Music Raam Phatak. He received "Dha" from Avadhoot, though he forgot some words in between.




मंगेश बोरगावकरने नवीन गाणं म्हटले. "हि अवखळ देखणी माझ्या मनी साजणी फार सुंदर भास हा पानाफुलांच्या वनी". मुळ गायक अजय गोगावले, गीत सौमित्र, संगीत अजय अतुल. हे गाणं "बंध प्रेमाचे" या चित्रपटातील आहे. एकदम आवाज वगैरे मस्त काढला. अवधूतने त्याला "ध" दिला.

Mangesh Borgavkar sung "hi avakhal dekhani, mazya mani sajani, par sundar bhas ha panaphulanchya vani". Original singer Ajay Gogavale, Lyrics Soumitra, Music Ajay-Atul. This song is from "he band premache". He sung very well. He received "dha" from Avadhoot.





मग नंतर आली अपूर्वा गज्जला. हिने "दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगन झुला". मुळ गायिका हम्सिका, गीत अशोक बागवे, संगीत कौशल इनामदार. हे गाणं "गर्द निळा गगनझुला". गाणं खूपच छान म्हटले. अवधूतने "ध" दिला.
Apurva Gajjala - Dena Re Punha Punha



आजच्या भागात गुणानुसार असलेले शेवटचे ३ स्पर्धक "सायली ओंक, अनिकेत सराफ, ज्ञानेश्वर मेश्राम".
So bottom three for today, "Sayali Oak, Aniket Saraf, Dnyaneshwar Meshram"




कार्यक्रमाचा शेवट साधना सरगमने "चुपके से रात के चादर तले, " या गाण्याने झाला. सगळ्या स्पर्धकांनी तिला कोरस दिले.

Program finished with Sadhana Sargam's song "chupake se raat ke chadar tale". All participant sung chorus.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत आणि ३ स्पर्धक गेले कि महाअंतिम फेरी सुरु होणार आहे. सुरवातीला मार्काप्रमाणे गायक गाणं सादर करतील. आज एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार आहे.

सलील आणि अवधूतच्या मते प्रथम तिघे अभिलाषा, उर्मिला आणि राहुल असावेत. प्रथम क्रमांकावर होती, अभिलाषा चेल्लम. अभिलाषाने "रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते". मुळ गायिका परवीन सुलताना गीत गंगाधर महाम्बरे, संगीत राम फाटक. या गाण्यात अभिलाषाचे उच्चार मराठी वाटले नाहीत. विशेषता "एक" "दाटलेले" हे शब्द नीट आले नाहीत. गाणं सुराला हलले असे अवधूतचे मत होते.



दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. त्याने "स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे" मुळ गायक शंकर महादेवन, गीत मंगेश कुलकर्णी, संगीत केदार पंडित, अल्बम श्रावणधारा. गाणं ठीक झाले. मुळ गाण्याचे बोल इतके खूप छान आहेत असे मला वाटले नाही. राहुल कडव्यातील काही शब्द विसरला. गाणं खूप गंभीर झाले असे सलीलचे मत होते. अवधूतची उपमा छान होती.




तिसऱ्या क्रमांकावर होती अपूर्वा गज्जाला होती. हिने "प्रतिमा उरी धरुनी मी प्रीती गीत गाते" मुळ गायिका लता मंगेशकर, गीत डी व्ही केसकर, संगीत वसंत प्रभू. सुरवातीच्या आलापात स्वर स्थिर लागले नाहीत. गाणं चांगले झाले.



चौथ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "तू माझी माउली कल्पवृक्षाची सावली" मुळ गायक व संगीत छोटा गंधर्व, रचना संत तुकाराम. गाणं खूपच भावपूर्ण म्हटले. चांगले झाले. गाणी स्पर्धक निवडत नाहीत, तर झीची रिसर्च टीम त्यांना गाणी शोधून देते हे आज या गाण्यानंतर कळले.



स्वरदा गोखले आणि मृण्मयी तिरोडकर या दोघींना सगळ्यात कमी मार्क मिळाले. त्यात प्रथम स्वरदाला बोलावण्यात आले. "नयन तुजसाठी आतुरले" मुळ गायिका जोत्स्ना हर्डीकर, गीत वंदना विटणकर, संगीत अनिल मोहिले. काही ठिकाणी सूर गेले असे अवधूतचे मत होते. पण तरीही गाणं खूप छान झाले असे मत होते. पण स्वरदाच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत होती परीक्षकांचे मत ऐकताना असे वाटले.




शेवटचे गाणं सादर करायला आली मृण्मयी तिरोडकर. "माझ्या मना रे ऐक रे जरा हळवेपणा हा नाही खरा", मुळ गायिका बेला शेंडे, गीत शांता शेळके, संगीत सलील कुलकर्णी, अल्बम "माझ्या मना"




Today there are 6 participants. Mega final will start when only 3 participants remains. As per the marks, participants came and presented song. First was Abhilasha Chellam she sung, Rasika tuzyachsathi mi ek geet gate. Second was by Rahul Saksena "swapnat pahilelya nagarit dur kothe". Third song was by Apurva Gajjala. She presented "pratima uti dharuni mi priti geet gate". Forth song was Urmila Dhangar sung "tu mahi mauli kalpavrukshachi savali". Bottom 2 were Mrunmayi Tirodkar and Swarada Gokhale. Swarada Gokhale sung "nayan tuj sathi aturale". Mrunmayi Tirodkar sung "mazya mana re eik jara, halavepana ha nahi khara".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

दुसऱ्या रौऊड साठी लोकगीत म्हणणार आहेत. मताप्रमाणे प्रथम क्रमांकावर होती स्वरदा गोखले. हिने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हावारी" मुळ गायिका शैला चिखले, गीत काशीराम चिंचय, विश्वनाथ चिंचय, संगीत विजय कठीण. हे एक कोळीगीत आहे. पारू ग पारू वेसावची पारू या अल्बममधील हे गाणं आहे. कोरस मध्ये अभिलाषा, अपूर्वा, उर्मिला, मृण्मयी होत्या.




मतांच्या प्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर, हिने "चल रे शिरपा देवाची क्रीपाची औंदा छान" मुळ गायक जयवंत कुलकर्णी, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत प्रभाकर जोग चित्रपट आंधळा मारतो डोळा. आवाज थरथरत होता असा वाटत होते. गाणं ठीक झाला. खूप छान झाले असे वाटले नाही.




तिसऱ्या क्रमांकावर उर्मिला धनगर होती. हिने "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसाव शालू नवा" हे गाणं सदर केले. लावणी आहे. सुलोचना चव्हाण मुळ गायिका, गीत ग. दि. माडगुळकर, संगीत वसंत पवार, चित्रपट मल्हारी मार्तंड. गाणं मस्त झाले. अवधूतच्या काय कॉमेंटस होत्या त्याला तरी कळल्या कि नाही देव जाणे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. हिने पारंपारिक जोगवा सादर केला, "अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मोहू महिषासुर मर्दना लागली" रचना संत एकनाथ. कोरस मध्ये होत्या मृण्मयी, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा. गाणं एकदमबेस्ट.




पाचव्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. ह्याने करूया उदो उदो उदो अंबाबाईचा. हा एक गोंधळ आहे. मुळ गायक प्रल्हाद शिंदे, गीत मधुकर ठाकूर संगीत मधुकर पाठक. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अभिलाषा आणि मृण्मयी होत्या. गाणं चांगले म्हटले.हा मधूनच काही शब्द विसरला. पण तरीही गाणं पुढे म्हटले.



सहाव्या क्रमांकावर आली अपूर्वा गज्जला. हिने एक भजन सादर केले "एक तत्व नाम दृढ धरी मना" मुळ गायक यशवंत निकम गीत शांताराम आठवले संगीत केशवरावभोळे चित्रपट संत ज्ञानेश्वर. गाणं खूपच छान झाले.







आता एलिमिनेशन. आज एक जण बाहेर जाणार आहे. आजच्या निकालाप्रमाणे मृण्मयी बाहेर पडली. सगळ्या स्पर्धकांचे मार्क खालीलप्रमाणे.
स्वरदा गोखले मार्क ८७.३३ मत ४५.६५
अभिलाषा चेल्लम, मार्क ९४.१७ मत १०.७७
उर्मिला धनगर मार्क ९१.२५ मत ११.२८
अपूर्वा गज्जला मार्क ९२.३३ मत ८.८८
राहुल सक्सेना मार्क ९३.५८ मत ५.८६
मृण्मयी तिरोडकर मार्क ८१.५० मत १७.५६





Second round was of folk song. In this round, participant came as per the SMS they received. First was Swarada Gokhale. She sung "ekavira aai tu dongaravari najar hay tuzi kolhavari". This is koligeet. Second was Mrunmayi Tirodkar. She presented "chal re shirpa devachi kirpa". Third song was by Urmila Dhangar. She sung "padaravarati jartaricha mor nachara hava". This is Lavani. Forth song was by Abhilasha Chellam. She sung "Anadi nirgun pragatali bhavani". This is Paramparik jogva. Fifth song was by Rahul Saksena. "karu ya udo udo udo ambabaicha". This is Gonghal. "Sixth song was Apruva Gajjala. She sung bhajan. "ek tatva naam dhrudh dhari mana". Last was eliminations. Today Mrunmayi Tirodkar was eliminated. Marks are as Below

Swarada Gokhale, mark 87.33 SMS 45.65
Abhilasha Chellam, mark 94.17 SMS 10.77
Urmila Dhangar, mark 91.25 SMS 11.28
Apurva Gajjala, mark 92.33 SMS 8.88
Rahul Saksena, mark 93.58 SMS 5.86
Mrunmayi Tirodkar, mark 81.50 SMS 17.56

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत. परीक्षकांचे मार्क ५०% तर SMS ५०% असे प्रमाण आहे. शंतनू मोहित्रा हे आजचे मान्यवर परीक्षक आहेत. प्रथम अभिलाषा चेल्लाम सादर करायला आली कैसी पहेली है ये जिन्दगानी. मुळ गायिका सुनिधी चौहान, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शंतनू मोहित्रा चित्रपट परिणीता. अभिलाषाला काल सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते. अभिलाषाला दोन वरचे "सा" मिळाले. अर्थात शांतनू मोहित्राचे मार्क दाखवण्यात आले नाहीत.




त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याने "लागा चुनरी में डाग छुपाऊ कैसे" हे गाणं सादर केले. मुळ गायक मन्ना डे, गीत साहीर लुधियानवी, संगीत रोशन चित्रपट "दिल हि तो है". गाणं चांगल झाले. भाव जरा कमी आले असा मोहित्राचे मत होते. अवधूतने वरचा सा तर सलीलने नी दिला. आजकाल पल्लवी राहुलशी मराठीत बोलते.




तिसरा क्रमांक होता उर्मिला धनगरचा. "बाबूजी धीरे चलना". मुळ गायिका गीता दत्त. गीत मजरूह सुलतानपुरी. संगीत ओ.पी. नय्यर, चित्रपट आर पार. गाणं ठीक होते. अवधूतला आता उर्मिलाच्या त्याच त्याच धाटणीच्या गाण्याचा कंटाळा आला आहे असा दिसतंय. तो पुन्हा म्हणाला कि जरा वेगळे गाणं म्हण. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




चवथा क्रमांक होता अपूर्वा गज्जलाचा. हिने "रैना बीती जाये, शाम न आये". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत आर. डी. बर्मन. चित्रपट अमर प्रेम. दोन वरचे सा.




पाचवा क्रमांक होता मृण्मयी तीरोडकरचा. "पियू बोले पिया बोले", मुळ गायिका श्रेया घोषाल, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शांतनू मोहित्रा, चित्रपट परिणीता. गाणं खूप छान झाले नाही. सुरवात तर खूपच घसरली. दोन नी मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले. "रात अकेली है, बुझ गये दिये". मुळ गायिका आशा भोसले, गीत मजरूह सुलतानपुरी, संगीत एस. डी. बर्मन. चित्रपट ज्वेल थीफ. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. खूपच लाडिक झाले. दोन ध मिळाले.




Today 6 participants are remaining in the competition. Now percentage of SMS is 50% and marks is 50%. Todays special guest is Shaantanu Mohitra. First round was of hindi songs. Abhilasha chellam presented "kaisi Paheli hai ye jindagani". Then came Rahul Saksena, who performed Laga chunari me daag chhupau kaise". Third was Urmila Dhangar, who sung "babuji dheere chalana". Then Apurva Gajjala sung "raina beeti jaaye sham na aaye" Bottom tow were Mrunmayi and Swarada. Mrunmayi Tirodkar presented "piyu bole piya bole". Last song in the first round was presented by Swarada Gokhale "raat akeli hai buz gaye diye".




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


"कंठातच रुतल्या कान्हा कुठे ग बाई कान्हा" हे गाणं अभिलाषा चेल्लामने सदर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे, संगीत श्रीनिवास खळे यांचे. गाणं खूपच छान म्हटले. हिचे उच्चार इतके सुंदर आहेत कि हि तमिळ आहे असे वाटतच नाही. ह्या गाण्यात अजिबातच श्वास घ्यायला जागा नाहीये म्हणजे खूप कठीण आहे म्हणायला.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का", मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी सावळाराम संगीत वसंत प्रभू यांचे. ही कशी काय eliminate झाली असा प्रश्न पडला शांतनूला.




"आज कुणीतरी यावे" हे गाण सादर करायला आली स्वरदा गोखले. मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर संगीत सुधीर फडके. चित्रपट मुंबईचा जावई. गाणं चांगला झालं. सूर खूपच छान लागले होते. अवधूत आणि सलीलची जुगलबंदी मस्तहोती.




मग आली मृण्मयी तिरोडकर, "वादल वार सुटलं ग". मुळ गायिका लता मंगेशकर गीत शांत शेळके संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर., गीत शिल्प या अल्बम मधील हे गाणं आहे. रेडीओ वर गाणं म्हटलंय असा वाटले असे सलीलचे म्हणणे होते. शंतनुने दिलेल्या सूचना खूपच चांगल्या होत्या.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, "कस काय पाटील बर हाय का काल काय ऐकले ते खरं हाय काय". मुळ गायिका सुलोचना चव्हाण, गीत जगदीश खेबुडकर, संगीत वसंत पवार चित्रपट सवाल माझा ऐका. कोरसला अपूर्वा, स्वरदा, अभिलाषा, राहुल आणि मृण्मयी होते. उर्मिलाच्या आवाजाला कुकरची उपमा फक्त अवधूतच देऊ शकतो.




मग आला राहुल सक्सेना "ये गो ये मैना ". मुळ गायक अजय गोगावले गीत व संगीत अजय- अतुल चित्रपट जत्रा. सत्तुने सुरवातीला साथ दिली मस्त होती. त्यावर अवधूतची कॉमेंट पण मस्त.




आता बेस्ट पेर्फोर्मेर सांगण्याची वेळ आली आहे. शांतनू मोहित्राच्या मते सगळ्यात छान गाणं अपूर्वा गज्जलाचे झाले.





Then marathi song round started. This round was based on SMS. Abhilasha Chellam sung "kanthatch rutalya tana". Then Apurva Gajjala, "hrudayi jaga tu anuraga pritila ya deshil ka ". Swarada Gokhale sung "aaj kunitari yaave". Mrunmayi Tirodkar presented "vadal wara sutala ga" Urmila Dhangar sung "kasa kaay patil bar hay ka kaal kaay eikale te khara hay kay". Rahul Saxena presented "ye go ye ye maina". Today there is no elimination, so Best Performer was announced. Shaantanu Mohitra felt best performer was APurva Gajjala.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ६ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील आठवड्यात "Call back" असल्यामुळे या आठवड्यात कोणीच बाहेर पडणार नाहीये. आज प्रथम फेरी तालावर आधारित होती. सगळ्या स्पर्धकांनी आज तालावर अधातीर गाणी म्हटली. आजचे मान्यवर परीक्षक होते, पं. सुरेश तळवलकर.

कार्यक्रमाला सुरवात केली स्वरदा गोखले हिने. स्वरदाने भजनी तालावरील गाणे सादर केले. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी." हे गाणं सादर केले. ताल भजनी, मुळ गायिका फैयाज, रचना संत गोरा कुंभार, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक गोरा कुंभार. गाणं चांगले झाले. सलीलने प तर अवधूतने ध दिला. पं. सुरेश तळवलकर प्रत्येक गाण्यानंतर तालाबद्दल पण बोलणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम खूपच शैक्षणिक झाला आहे.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, हिने केरवा या तालावर आधारित गाणं सादर केले. "घननिळा लाडीवाळा झुलवू नको हिंदोळा", ताल केरवा, मुळ गायिका माणिक वर्मा, गीत ग.दि. माडगुळकर, संगीत सुधीर फडके. हे गाणं "उमज पडेल तर" या चित्रपटातील आहे. स्वराला स्थिरता नाहीये असे मान्यवर परीक्षकांना वाटले. अतिजास्त हरकती घेतल्या असा एकून सूर होता. दोघांनी "ध" दिला.



मग राहुल सक्सेना आला त्याने अध्ध्या त्रिताल या तालावर आधारित "मी मानपमान", मुळ गायक रामदास कामत, गीत कुसुमाग्रज संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक ययाती आणि देवयानी. ह्याचे उच्चार खूपच हिंदी वाटले. गाणं चांगले म्हटले. याच्याशी पल्लवी आणि मान्यवर परीक्षक हिंदीत बोलत होते. तानबाजी जरा जास्त झाली असा सलीलला वाटले. दोघांनी "ध" दिला.



मृण्मयी तिरोडकरने दादरा तालावर आधारित मालवून टाक दीप हे गाणे म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत सुरेश भट, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. "पेंगते अजून रात" स्वराला चुकले. स्वराला स्थिरता नव्हती या गाण्यात असा मान्यवर परीक्षकांचा शेरा होता. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे मत होते, अवधूतला गाणं आवडला नाही. अवधूतने म तर सलीलने ध दिला.




अपूर्वा गज्जलाने केहरवा तालावर "कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" गे गाणं सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी. सावळाराम, संगीत वसंत प्रभू, ताल केहरवा. गाणं खूपच छान झाले. सलीलने व अवधूतने ध दिले.



त्यानंतर आली अभिलाषा चेल्लाम. हिने आज दादरा तालावर "सखी ग मुरली मोहन मोही मना." मुळ गायिका अशा भोसले, गीत पी सावळाराम संगीत पं हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, ताल दादरा. सुरवातीला "पुन्हा" हा शब्द जरा वेगळा म्हणाला. तसेच अंतऱ्यात शृंगाराची हा शब्द पण बेसूर झाला. पण नाहीतर गाणं खूपच चांगले झाले. अवधूतने ध तर सलील ने नी दिला.





Program started with 6 participants today. Because of last week's call back there is not going to be any elimination this week. Today participant are going to sing the song on "Taal". Swarada Gokhale sung "nirgunacha sang dharila jo avadi". Urmila dhangar sung "ghannila ladiwala zulavu nako hindola". Rahul Saxena sung "mi manapman". Mrunmayi Tirodkar sung "malvun taak deep". Apurva Gajjala sung "kalpavruksha kanyesathi lavuniya baba gela". Abhilasha Chellam sung, "sakhi ga murali mohan mohi mana".



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

आता दुसऱ्या फेरीतील गाणी सुरु झाली. स्वरदा गोखले आली "मम आत्मा गमला " गे गाणं सादर करायला. मुळ गायक बाल गंधर्व, गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत भास्करबुवा बखले, नाटक संगीत स्वयंवर. गाणं चांगले झाले. दोन ध मिळाले.




मग अपूर्वा गज्जलाने "शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत शांता शेळके, संगीत हेमंत भोसले. दोन ध मिळाले.





मग आली मृण्मयी तिरोडकर, हिने नाचू किती कंबर लचकली हे गाणं सादर केले. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा व राहुल होते. मुला गायिका आशा भोसले, गीत जगदीश खेबुडकर, संगीत राम कदम, चित्रपट सुगंधी कट्टा. कोरस खूपच छान झाले. कोरस खूपच छान झाले. दोन ध मिळाले. मृण्मयी जरा दडपणाखाली होती असा वाटत होते.




त्यानंतर अभिलाषा चेल्लामने कशी झोकात चालली कोल्याची पोर हे गाणं म्हटले. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अपूर्वा आणि मृण्मयी होत्या. मुळ गायिका आशा भोसले, गीत पी. सावळाराम संगीत राम कदम, चित्रपट मोलकरीण. गाणं खूपच सुंदर म्हटले. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.





मग उर्मिला धनगर आली हिने हिच्या नेहमीच्या धाटणीतले गाणे म्हटले. वाडीवरल्या वाटा गेल्या आबालाच्या पारी. मुळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना. धो. महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. अवधूतने गोड शब्दात सांगितले कि त्याच त्याच धाटणीची गाणी न गाता जरा वेगळी गाणी गा. हे अवधूतने सांगितले म्हणजे जरा आश्चर्य आहे. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




मग राहुल सक्सेना ने "दाटून कंठ येतो ओठात येई गाणे." मुळ गायक डॉ. वसंतराव देशपांडे, गीत शांता शेळके, संगीत अनिल-अरुण, चित्रपट अष्टविनायक. गाणं खूपच छान म्हटले. आणि या गाण्यात उच्चार देखील चांगले आले. पाडगावकरांची कविता आहे ज्यात ते असे वर्णन करतात कि पाउस कोसळत नाही पण आभाळ भरून येते, तसा मुलीच्या लग्नात बाप दिसतो. तसेच गाणे झाले, असे सलीलने म्हटले. दोन वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून आज राहुल आणि अभिलाषा म्हणण्यात आले. आणि गम्मत अशी आहे कि कार्यक्रम झाल्यावर "आजचा आवाज" मध्ये ज्याचे गाणं दाखवत त्यात. राहुल आणि उर्मिलाला दाखवण्यात आले.







अंतिम फेरीतील शेवटच्या २ उपविजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार, तर १ लाख २५ हजार रुपये, रोख रुपये. सुधीर मांडके डेवलपर्स कडून
क्रोमा कडून विजेत्याला १ लाख ३० हजार रुपयाचे Home Package, २ उपविजेत्यांना चाळीस हजार रुपयांचे home Package. अंतिम फेरीतुन बाहेर पडणाऱ्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी वीस हजारांचे Home Package.
अंतिम फेरीतील विजेत्याला १ लाख रुपयाची Music system, २ उपविजेत्यांना पन्नास हजार रुपयांची Music system. शेवटच्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजारांची Music System.


एकूण बेरीज
विजेता १ : १.२५ + १.३ + १ = ३.५५
उपविजेते २ : ०.५ + ०.४ + ०.२ + ०.५ + ०.२५ = १.८५
उरलेले २ : ०.२ + .२५ = ०.४५



In the second round, Swarada Gokhale sung "mam atma gamala ga". Apurva Gajjala sung, "sharad sundar chanderi rati swapnacha zulat zula". After this Mrunmayi Tirodkar sung "nachu kiti nachu kiti, kambar lachakali". Abhilasha Chellam sung, "kashi zokat chalali kolyachi por". Then came Urmila Dhangar who presented "vadivarlya wata gelya abalachya pari". Rahul Saxesa sung "datun kanth yeto othat yei gane" Best performer was given to Abhilasha and Rahul.