Showing posts with label Saurabh Kadgaokar. Show all posts
Showing posts with label Saurabh Kadgaokar. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आजपासून Knock Out Round सुरु आहे आज एकूण १० स्पर्धक आहेत आणि त्यातील फक्त २ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आजच्या मान्यवर परीक्षक म्हणून आल्या आहेत श्रुती सलोडीकर. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत एकदम उद्या निकाल.

स्पर्धेची सुरवात आकांक्षा देशमुखच्या "हाची नेम आता न फिरे माघारी" या गाण्याने झाली. गाणं खूप छान झाले नाही. आवाज थरथरत होता. विशेषता स्वर सोडताना थरथर बरीच जाणवत होती.





दुसरे गाणं म्हणायला आला सौरभ काडगावकर , "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".माझ्या मते गाणं चांगलं झालं. पण कुठेतरी खूप आर्तता आली नाही याच्या म्हणण्यात असे जाणवले.





तिसरे गाणं म्हणायला आला सिद्धेश परळीकर, "फुल ते संपले गंध न राहिला". गंध न राहिला म्हणताना कधी कधी आवाज कंप पावला.





"तिन्ही सांजा सखे मिळाल्या" हे गाणं समीक्षा भोबे ने सदर केले. कधी कधी स्वराला पकडून नव्हते. थोडे बेसूर झाले असे वाटत होते. अवधूतच्या मते गाणं सुरु होत, किंवा सोडतो तेव्हा गाणं बेसूर होत. असेच इतर परीक्षकांचे मत होते.





मग आली ऋतुजा लाड. "सावरिया से नैन हो गये चार." गाणं छानच झाले. सगळे परीक्षक खुश. हे गाणं मी प्रथमच ऐकले. मस्तच म्हटले. सगळे सूर नीट लागत होते.






प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का". गाणं चांगले झाले. पण मधेच एक शब्द विसरला. स्वरावर पूर्णत्वाने या असा सल्ला श्रुती सलोडीकरने दिला.





This week it is going to be Knock Out round. Today there are 10 paticipant. Only 2 out of this lot will go to the finals. Todays special judge is Shruti Salodikar. Program starts by Akanksha Deshmukh's "hachi nem ata na phire maghari". Next song is by Saurabh Kadgaokar "Paradhin aahe Jagati Putra manavacha". Third song was by Siddesh Paralikar "phul te sampale gandh na rahila". Forth song was by Samiksha Bhobe, "Tinhi sanja sakhe milalya". Nex comes Rutuja Laad "Savariya se nain ho gaye char". Prasanna Prabhu Tendulkar sings "tya phulanchya gandhkoshi saang tu aahes ka"


Part 1

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २० ऑक्टोबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

काल उपांत्य फेरीचा पहिला भाग होता. कालपासून हिंदी गाण्याचा समावेश होता. एकूण ९ स्पर्धक होते ५ जणांनी मराठी आणि 4 जणांनी हिंदी गाणी म्हटली. आज ४ जण मराठी आणि ५ जन हिंदी गाणी म्हणणार आहेत.

आजच्या कार्यक्रमाची सुरवात अभिजितच्या "तुम ने ना जाना के मै दिवाना" गाण्याने झाली. आज कालचेच ९ स्पर्धक होते. आज काल ज्यांनी हिंदी गाणं म्हटले होते त्यांनी आज मराठी आणि मराठी म्हटले होते ते हिंदी म्हणणार होते.

पहिला स्पर्धक प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. त्याने काल हिंदी गाणे म्हटले होते आज मराठी म्हणणार "माझे जीवन गाणे, गाणे". गाणं खूप छान म्हटले असे सलीलचे मत होते आणि अभिजितने पण तसेच म्हटले. अवधूतला पण त्याचे गाणं आवडला. "ध" मिळाला .




दुसरं गाणं म्हणायला आला सौरभ काडगावकर. आज ह्याने नाट्यगीत सादर केले "मुरलीधर शाम हे नंदलाला". गाणं खूपच छान झाले. अभिजीतला सौरभचे गाणं खूप आवडले. सलीलला पण खूप आवडले. अवधूतचं मत पण तसेच होते. "ध" मिळाला.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. हि पण आज मराठी गाणं सादर करणार आहे. "सजणा का धरिला परदेस". अभिजीतच्या मते त्याला इथे राजस्थानचा रंग दिसला. पण त्याच्या मते आलाप नीट आले नाहीत आणि नोटस फ़्लँट झाले. सलील म्हणाला कि आवाज वर जाताना चोरला नाही आणि अवधूतच्या मते स्वर वर झाले कि गाणं नाकात येते. "ध" मिळाला.




चौथे गाणं गायला ऋतुजा लाड आली "हे शाम सुंदर मन मोहना". अभिजितला खूप आवडलं. सलीलच्या मते काल आणि आजचे गाणं यात खूप जास्त वेगवेगळ्या छटा दाखवल्या. व त्याच्या मते ती वयापेक्षा जास्त मँच्युरिटिने गाते. अवधूतला पण खूप जास्त आवडले. "नी" मिळाला.






Today is the first day of the semi-final. From 36 participants, 18 are selected for semifinal. Today 9 participant are going to sing. They performed yesterday too. today 4 participant will sing Marathi song and 5 will perform Hindi song. Day started with Abhijit's song "tum ne na jana ke mai diwana". Competition started with Prasanna Prabhu Tendulkar's song, "maze jeevan gane, gane". Next came Saurabh Kadgaokar, "Muralidhar sham he nandalala". Third song was by Apurva Gajjalla to sing "Ka dharila parades". Forth song was by Rutuja Laad, "he sham sundar man mohana"



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १९ ऑक्टोबर २००९. - भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1


त्यानंतर आली अपूर्व गज्जला. हिने आहे हिंदी गाणं "वो चूप राहे तो मेरे दिल के दाग जलते है. " म्हटले. या फेरीपासून हिंदी गाण्याची सुरवात झाली. अभिजीतला आवडले, काही काही आलाप मध्येच तोडले पण नाहीतर चांगले होते. अवधूतला आवडले, पण श्वासावर नियंत्रण हवे असे मत होते. सलीलला पण आवडले. "ध" मिळाला.




मग आला सौरभ काडगावकर. "जब दीप जाले आना, जब शाम ढले आना." हिंदीतले उच्चार नीट झाले नाहीत. बरेचदा आना याना सारखे वाटत होते. नंतर तेरी चा उच्चार अगदी बम्बैय्या हिंदीतल्या सारखे झाले. अभिजितने उच्चाराबद्दल सांगितले आणि तसेच अवधूतचे मते सुराला सोडून गाणं होते. सलीलला वाटले कि गाणं इतके मनापासून आले नाही. खूपच कमी मार्क मिळाले."म" मिळाला.





त्यानंतर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. ह्याने "सीने में जलन आखो में तुफ़ान सा क्यो है ?" म्हटले. मला आवडले. अभिजीतच्या मते सुरेश वाडकरांची नक्कल केलीस. पण अवधूत आणि सलीलचे तसे मत नव्हते. अवधूतच्या मते ह्याचे उच्चार खूप छान होते. "ध" मिळाला.



आजच्या स्पर्धेतील शेवटचे गाणं म्हणायला आली ऋतुजा लाड. "अब के सावन बह जाये रंग मेरी चुनर से ", अभिजीतला खूप आवडले नाही त्याच्या मते खूप भाव ठीक आले नाहीत. अवधूतचे पण तसेच मत होते. सलील ला गाणं खूप आवडले. "ध" मिळाला.




आज जे हिंदी गाणी म्हणतील ते उद्या मराठी म्हणतील आणि ज्यांनी मराठी म्हटली ते हिंदी म्हणणार.




Today semifinal starts. Out of 36 participants, 18 participants has reached this this stage. Today's special judge is Abjijit. Today only Salil marks will be seen.

First song was sung by Abhilasha Chellam. "Avachita parimalu zulakala alumalu". Second song was by Tushar Shinde, "viththala mich khara aparadhi" Then came Rahul Saxena, "Dayaghana, tutale chimane gharate, urlo bandi asa mi". Swarada Gokhale sung "shodhu mi kadhi priya tula". Fifth song was by Ashwini Deshpande "Johar maybaap johar, tumachya maharacha mi mahar". Then came round of hindi songs. Apurva Gajjala sung "woh chup rahe to mere dil ke dag jalate hai". Saurabh Kadgaokar sung "jab deep jale aana jab sham dhale aana". Prasanna prabhu Tendulkar sung "seene me jalan aakho me tufan sa kyo hai" Last song in today's program was by Rutuja Laad "ab ke savan jam ke barase, bah haye rang meri chunar se". Today those participant sung hindi song will sing marathi song and vice versa.