Showing posts with label Sayali Oak. Show all posts
Showing posts with label Sayali Oak. Show all posts

सारेगमप - ११ मे २०१० - भाग १

आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आणि आज कोणाचेही मार्क दिसणार नाही.
प्रथम आली अपूर्वा गज्जला. हिने "ढग दाटुनी येतात मन वाहुनी नेतात, ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात, झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते माझ्यात." मुळ गायिका साधना सरगम, गीत सौमित्र, संगीत अशोक पत्की, चित्रपट आईशप्पथ. गाणं खूपच सुंदर म्हटले.

Today one participant will go out of the competition. And marks are not going to be displayed. First song was by Apurva Gajjala, She sung "dhag datuni yetat, man vahuni netat". This song is originally sung by Sadhana Sargam, Lyrics is by Soumitra, Music Ashok Patki. This song is from Aaishappath". She sung very well.



मग आला अनिकेत सराफ. ह्याने नसतेस घरी तू जेव्हा हे गाणं म्हटले. मुळ गायक सलील कुलकर्णी, गीत आणि संगीत संदीप खरे. हे गाणं आयुष्यावर बोलू काही या अल्बम मधील आहे.

Second song was by Aniket Saraf. He sung "Nasates ghari tu jevha". Original singer is Salil Kulkarni, Lyrics and music is by Sandeep khare. This song is from "ayushyavar bolu kahi".



मग आला अनिरुध्ध जोशी. ह्याने "आज अचानक गाठ पडे" हे गाणं म्हटले. मुळ गायक आणि संगीत कुमार गंधर्व, गीत कवी अनिल. गाणं चांगलं म्हटले.

Anirudhdha Joshi performed "aaj achanak gaath pade". Original singer and music is by Kumar gandharv. Lyrics is by Kavi Anil.




सायली ओंकने "भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाच उन मला झेपेना". मुळ गायिका अशा भोसले. गीत ना धो. महानोर, संगीत आनंद मोदक. हे गान एक होता विदुषक या चित्रपटातील आहे.
'10 Sayali Oak - Bharla Aabhal




त्यानंतर आला राहुल सक्सेना. याने "वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले, एकमेकावारी उधळले, गेले ते दिन गेले." हे गाणं सादर केले. मुळ गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, गीत भवानीशंकर पंडित, संगीत श्रीनिवास खळे. गाणं खरच खूप छान म्हटले.

Rahul Saxesa performed a song originally sung by Pan. Hrudaynath Mangeshkar, "vegvegli phule umalali rachuni tyanche zele". Lyrics for this song by BhavaniShankar Pandit, Music is by Shriniwas Khale. Very beautiful rendition.
10 Rahul Saxena - Vegvegali Phule Umalali




Part 2

सारेगमप - ११ मे २०१० - भाग २

Part 1

मग विजय गटलेवार आला. याने, "वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, " मुळ गायक आणि संगीत भीमराव पांचाळे, गीत इलाही इनामदार. गाणे नवीनच होते , पूर्वी कधी ऐकले नव्हते. गान ठीक म्हटले. फार वाखाणावे असे वाटले नाही.

Then came Vijay Gatlewar. He sung "andaj aarashyacha". This song is originally sung by Bheemrao Panchale, and music is by Bheemrao Panchale. Lyrics is by Ilahi Inamdar. Looks like this song was not so famous. Not listened before.
Vijay Gatlewar - Andaaz Aarshacha




मंगेश बोरगावकरने "दूर किनारा राहिला, बेभान वारा धावला" हे गाणं सादर केले. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत शांताराम नांदगावकर संगीत अशोक पत्की, हे गाणं सप्तसूर माझे या अल्बम मधील आहे. गाणं ठीक होते.

Mangesh Borgaokar sung "Dur kinara rahila, bebhan wara dhavala". Original singer Suresh Wadkar, Lyrics Shantaram Nandgaokar, Music Ashok Patki. This song is from album "Saptasur Maze".





ज्ञानेश्वर मेश्रामने "विठ्ठल आवडी प्रेमभावो". भक्तिगीते तर माउलीच हातखंडा आहे. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत संत नामदेव, संगीत श्रीधर फडके. हे गाणं "ओमकार स्वरूपा" या अल्बम मधील आहे. गाणं छान झाले असे परीक्षकांचे मत होते.

Dnyaneshwar Mesharam sung "viththal aavadi prembhavo". This song is originally sung by Suresh Wadkar, from album "Omkar Swarupa". Music to this song is by Shreedhar Phadke, while Lyrics is by Sant Naamdeo.




आनंदी जोशीने "जाई जुईचा गंध मातीला हिरव्या झाडाचा छंद गीताला" हे गाणं म्हटले. मुळ गायिका जयश्री शिवराम, गीत ना. धो. महानोर, संगीत आनंद मोडक. हे गाणं मुक्ता या सिनेमातील आहे.

Anandi Joshi sung "jai juicha gandh matila, hirva zadacha chhand geetala". Original singer Jayashri Shivram, Lyrics by Na. Dho. Mahanor, Music is by Anand Modak. This song is from movie "Mukta"




आजच्या कार्यक्रमात डेन्जर झोन मध्ये आज "सायली ओंक, अनिकेत सराफ आणि आनंदी जोशी" होत्या. त्यापैकी सायली ओंक आज बाहेर पडली.

There were 3 participant in Danger zone today. They were "Sayali Oak, Aniket Saraf, Anandi Joshi". Out of these, Sayali Oak was eliminated.

सारेगमप - १० मे २०१०, भाग १

आज प्रेमावरील गाणी म्हणणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "साधना सरगम". साधना सरगम कार्यक्रमाची सुरवाती "पहेला नशा पहेला खुमार". सगळ्यात प्रथम आनंदी जोशी सदर करते, "हि गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा" गीत गुरु ठाकूर, संगीत अवधूत गुप्ते, मुळ गायिका वैशाली सामंत, हे गोलमाल चित्रपटातील गाणं आहे. साधना सरगमचे मार्क दिसणार नाहीत. अवधूतने "ध" दिला.

Today's theme for the songs is "Love Songs". Today guest judge is Sadhana Sargam. Sadhana Sargam sings "pahela nasha pahela khumar" to start the program. First Anandi Joshi performs "Hi Gulabi Hava ved laavi jeeva, haay shwasatahi eiku ye maarava"




दुसरे गाणं सादर करायला आला विजय गटलेवार. याने "तुला पाहतो मी, मला पाहताना" गायले. गीत चंद्रशेखर सानेकर, मुळ गायक आणि संगीत अवधूत गुप्ते. हे गाणं हि सांज सुखाने या अल्बम मधील आहे. सूर थोडे घसरले. अवधूतने "ध" दिला.

Second song was performed by Vijay Gatlewar. He performed a song from "hi Saanj sukhane", Tula phato mi, mala pahatana. Original singer and music is Avadhoot Gupte and Lyrics is by "Chandrashekhar Sanekar. Avadhoot gave "pa".
Vijay Gatlewar - Tula Pahato Mi




मग राहुल सक्सेनाने "चंद्र हा आता मावळाया लागला, प्राण माझाही घडाया लागला" हे गाणं सादर केले. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत सुरेश भट, संगीत रवी दाते, अल्बम रंग मैफिलीचे. अवधूतची सुरेश वाडकरांची नक्कल बघण्यालायक. अवधूतने "ध" दिला.

Rahul Saksena performed "chandra ha ata mavalaya lagala, pran mazahi ghadaya lagala" Original singer is Suresh Wadkar, music by Ravi Daate, Lyrics Suresh Bhat. This song is from "Rang maifiliche". Avadhoot gave "dha"





मग अनिरुध्ध जोशीने "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वर" हे गाणं म्हटले. गीत मंगेश पाडगावकर संगीत श्रीनिवास खळे, मुळ गायक सुरेश वाडकर. गाणं मस्त झाले. अवधूतने "ध" दिला

Anirudhdha Joshi sung "jevha tuzya batanna udhali mujor waara" Original singer Suresh Wadkar, Lyrics is by Mangesh Padgaonkar, and music is by Shriniwas Khale. He received "dha" from avadhoot.





त्यानंतर आली सायली ओंक. हिने एक नवीनच गाणे म्हटले. "जीवघेणा रुसवा कि फसवा अबोला, वाट जुळल्यावारी पळवाटा कशाला" मुळ गायिका मधुर दातार, गीत वैभव जोशी, संगीत कमलेश भडकमकर. हे गाणं स्पर्शगंध या अल्बम मधील आहे. गाणं खूप नाजूक आहे. पण शब्द खूप भरभर म्हणावे लागतात. त्यामुळे जरा पळापळ झाली सायलीची. अवधूतने "प" दिला.

Sayali Oak performed a relatively new song. "jeevghena rusava ki phasava abola, vaat julalyavari palwata kashala", this song was sung by Madhura Datar, lyrics is by Vaibhav Joshi, music is by Kamlesh Bhadkamkar. This song is from "Sparshgandh". Avadhoot gave "pa" for this song.
Sayali Oak - Jeev Ghena Ruswa




मग आला अनिकेत सराफ. ह्याने "पहिले न मी तुला, तू मला न पहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले". मुळ गायक - सुरेश वाडकर, गीत - मधुसूदन कालेलकर, संगीत - अनिल अरुण. चित्रपट गुपचूप गुपचूप. ह्याच्या आवाजात जरा कंप जाणवला. अवधूतने प दिला.

Aniket Saraf, sung "Paahile na mi tula, tu mala na paahile, naa kale kadhi kuthe man vede guntale". Original singer Suresh Wadkar, Lyrics Madhusudan Kalelkar, Music by Anil-Arun. This song is from Gupchup-gupchup. Avadhoot gave "pa"




Part 2

सारेगमप - १० मे २०१०, भाग २

Part 1

मग आला ज्ञानेश्वर मेश्राम. ह्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". मुळ गायक सुधीर फडके, गीत सुधीर मोघे, संगीत राम फाटक. माउली मध्ये मध्ये शब्द विसरला. आणि नंतरची त्याची व परीक्षकांची प्रतिक्रिया मस्त होती. गाणं ठीक झालं. पण अवधूतने "ध" दिला. हे बरोबर वाटले नाही.

Dnyaneshwar Meshram sung "disalis tu phulale rutu". Original singer Sudhir Phadake, Lyrics Sudheer Mothe, Music Raam Phatak. He received "Dha" from Avadhoot, though he forgot some words in between.




मंगेश बोरगावकरने नवीन गाणं म्हटले. "हि अवखळ देखणी माझ्या मनी साजणी फार सुंदर भास हा पानाफुलांच्या वनी". मुळ गायक अजय गोगावले, गीत सौमित्र, संगीत अजय अतुल. हे गाणं "बंध प्रेमाचे" या चित्रपटातील आहे. एकदम आवाज वगैरे मस्त काढला. अवधूतने त्याला "ध" दिला.

Mangesh Borgavkar sung "hi avakhal dekhani, mazya mani sajani, par sundar bhas ha panaphulanchya vani". Original singer Ajay Gogavale, Lyrics Soumitra, Music Ajay-Atul. This song is from "he band premache". He sung very well. He received "dha" from Avadhoot.





मग नंतर आली अपूर्वा गज्जला. हिने "दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगन झुला". मुळ गायिका हम्सिका, गीत अशोक बागवे, संगीत कौशल इनामदार. हे गाणं "गर्द निळा गगनझुला". गाणं खूपच छान म्हटले. अवधूतने "ध" दिला.
Apurva Gajjala - Dena Re Punha Punha



आजच्या भागात गुणानुसार असलेले शेवटचे ३ स्पर्धक "सायली ओंक, अनिकेत सराफ, ज्ञानेश्वर मेश्राम".
So bottom three for today, "Sayali Oak, Aniket Saraf, Dnyaneshwar Meshram"




कार्यक्रमाचा शेवट साधना सरगमने "चुपके से रात के चादर तले, " या गाण्याने झाला. सगळ्या स्पर्धकांनी तिला कोरस दिले.

Program finished with Sadhana Sargam's song "chupake se raat ke chadar tale". All participant sung chorus.

सारेगमप - २६ एप्रिल २०१०, भाग १

आज पासून सारेगमपचा महासंग्राम हा कार्यक्रम सुरु झाला. ४ वर्ष्यात ज्या स्पर्धा झाल्या त्यातील १५ ते ३० वयोगटातील टोप तेन मधील १० स्पर्धक घेऊन हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या स्पर्धेत अवधूत गुप्ते हा परीक्षक राहणार आहे. आणि दर वेळेस मान्यवर परीक्षक वेगवेगळे असणार आहेत.

कार्यक्रमाची सुरवात अवधूतच्या गाण्याने झाली. "परी म्हणू कि सुंदरा हिची तऱ्हा जरा निराळी, हिची अदा करी फिदा हि मेनका कुणी जणू निघाली.". अवधूतनेच म्हटलेले गाणं आहे हे. आजच्या मान्यवर परीक्षक होत्या देवकी पंडित. आज मार्क असणार नाहीत. आज स्पर्धक त्यांची आवडती गाणी म्हणणार आहेत.

सगळ्यात प्रथम आली सायली ओंक. सायली ओंक पनवेलची आहे. हिने "मी मज हरपून बसले ग" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले.




दुसऱ्या क्रमांकावर आला परभणीचा अनिकेत सराफ. ह्याने "हे सुरांनो चंद्र व्हा" म्हटले. मुळ गायिका अर्चना कान्हेरे, गीत वि. वा. शिरवाडकर, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी.. हे गाणं ययाती आणि देवयानी या नाटकातील आहे.

Second was Aniket Saraf. He is from Parbhani. He sung "he surrano chandra vhya". Original singer Archana Kanhere, Lyrics Vi. Va. Shirvadkar (Kusamagraj). Music Pan. Jithendra Abhisheki. This song is from drama, Yayati ani Devyani.






तिसऱ्या क्रमांकावर आला लातूरचा मंगेश बोरगावकर. याने "रंगत रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते" मुळ गायक स्वप्नील बांदोडकर, गीत आणि संगीत अशोक पत्की. हे गाणं "तू माझा किनारा" या अल्बम मधील आहे.

Third participant to enter the stage was Latur's Mangesh Borgaokar. He performed "rangat rang to sham rang pahanya najar bhirabhirate". Original singer Swapnil Bandodkar, music and lyrics Ashok Patki. This song is from "Tu maza kinara"




४ नंबर वर आला अनिरुध्ध जोशी, नागपूरचा, नाट्यसंगीतात प्रभुत्व. याने "या भवनातील गीत पुराणे" गीत पुरुषोत्तम दारव्हेकर, मुळ गायक , संगीत जितेंद्र अभिषेकी , नाटक कट्यार काळजात घुसली. अतिशय परिपक्व गाणं होतं. खूपच सुंदर.

Anirudhdha Joshi, was 4th to enter the stage. He is from Nagpur, very much command on "Natyasangeet". He performed "ya bhavanatil geet purane". Lyrics Purushottam Darvhekar, Original singer, and music Pa. Jitendra Abhisheki, And this song is from "katyar kalajat ghusali"




आनंदी जोशी आली पाचव्या क्रमांकावर. हिने "ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली" हे गाणं म्हटले. मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर , संगीत दत्ता डावजेकर. हे गाणं "पडछाया" या चित्रपटातील आहे.

Anandi Joshi entered in the fifth number. She sung "Ein dupari yamunatiri, khodi ugi kadhali, bai mazi karangali modali". Original singer Asha Bhosale, Lyrics Ga. Di, Madgulkar. This song is from "Padchhaya".



Part 2

सारेगमप - २६ एप्रिल २०१०, भाग २

Part 1

त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. हिने "जाने क्या बात है, निंद नाही आती, बडी लांबी रात है." सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत आर डी बर्मन. हे गाणं सन्नी या चित्रपटातील आहे.

Sixth person to occupy the stage was Apurva Gajjala. She performed "jane kya baat hai, nind nahi ata, badi lambi raat hai". Original singer Lata Mangeshkar, Lyrics Anand Bakshi, Music R.D.Burman. This song is from "Sunny"




सातव्या नंबर आला ज्ञानेश्वर मेश्राम. हा भक्तीसंगीत खूप उत्कृष्ट गातो. याला सारेगमप मध्ये माउली म्हणतात. याने त्याचेच गाणे सादर केले. "राधे चाल, चाल बाई चाल". मुळ गायक आणि संगीत ज्ञानेश्वर मेश्राम, गीत संत गुलाबराव महाराज, अल्बम कान्हया रे जगजेठी. गाणं ठीक होते.

Seventh person to enter the stage was Dnyaneshwar Meshram. He sung his own song, "Radhe chaal, chaal bai chaal". Original singer and music is by Dnyaneshwar Meshram. Lyrics is by Sant Gulabrao Maharaj, This song is from album "Kanhaya re jagjethi".




आठव्या नंबर आला विजय गटलेवार. याची गजल गाण्यावर प्रभुत्व आहे, असा समज आहे. याने "मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान परी गहिवरते" हे सादर केले. मुळ गायक शंकर महादेवन, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाणं "अगबाई अरेच्या" या चित्रपटातील आहे.

Then came Vijay Gatlewar. He sung "Man udhan varyache guj pavasache, ka hote bebhan pari gahivarate". Original singer, Shankar Mahedevan, Lyrics Guru Thakur, Music Ajay-Atul. This song is from marathi film "Agabai arechchya".




नवव्या नंबर आली संहिता चांदोरकर. हिने " मैया मैया गुलाबी तारे चुनले" हे गाणं सादर केले. मुळ गायिका चिन्मयी, किर्थी टोलर, गीत गुलजार, संगीत ए. आर. रेहमान. हे गाणं गुरु या चित्रपटातील आहे.

Then came Sanhita Chandorkar. She sung "Maiya Maiya, Gulabi tare chunale". Original singer Chinmayi, Kirthy Tolar, Lyrics Guljar, Music A.R.Rehman. This song is from movie "Guru".





दहाव्या स्थानावर आला राहुल सक्सेना. याने "तुझ्या पायरीशी सानथोर नाही,.... खेळ मांडला" हे नटरंग सिनेमातील प्रसिध्ध गाणे म्हटले. मुळ गायक अजय गोगावले, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. गाणं चांगले म्हटले.

Last participant was Rahul Saksena. He performed a song from Natrang "khel mandala" Original singer Ajay Gogavale, Lyrics Guru Thakur, Music Ajay-Atul.







आता या स्पर्धेतील बक्षिसं (आता पर्यंतची).
झी मराठी करून महाविजेत्याला २ लाख, तर २ उपविजेत्यांना १ लाख.
क्रोमाकडून महाविजेत्यांना १ लाख ३० हजार रुपयांचे होम पॅकेज, तर २ उपविजेत्यांना ४०००० हजारांचे होम पॅकेज आणि अंतिम फेरीतून बाहेर पडणाऱ्या अंतिम ४ स्पर्धकांना २०००० हजाराचे होम पॅकेज