आज ६ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील आठवड्यात "Call back" असल्यामुळे या आठवड्यात कोणीच बाहेर पडणार नाहीये. आज प्रथम फेरी तालावर आधारित होती. सगळ्या स्पर्धकांनी आज तालावर अधातीर गाणी म्हटली. आजचे मान्यवर परीक्षक होते, पं. सुरेश तळवलकर.
कार्यक्रमाला सुरवात केली स्वरदा गोखले हिने. स्वरदाने भजनी तालावरील गाणे सादर केले. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी." हे गाणं सादर केले. ताल भजनी, मुळ गायिका फैयाज, रचना संत गोरा कुंभार, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक गोरा कुंभार. गाणं चांगले झाले. सलीलने प तर अवधूतने ध दिला. पं. सुरेश तळवलकर प्रत्येक गाण्यानंतर तालाबद्दल पण बोलणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम खूपच शैक्षणिक झाला आहे.
त्यानंतर आली उर्मिला धनगर, हिने केरवा या तालावर आधारित गाणं सादर केले. "घननिळा लाडीवाळा झुलवू नको हिंदोळा", ताल केरवा, मुळ गायिका माणिक वर्मा, गीत ग.दि. माडगुळकर, संगीत सुधीर फडके. हे गाणं "उमज पडेल तर" या चित्रपटातील आहे. स्वराला स्थिरता नाहीये असे मान्यवर परीक्षकांना वाटले. अतिजास्त हरकती घेतल्या असा एकून सूर होता. दोघांनी "ध" दिला.
मग राहुल सक्सेना आला त्याने अध्ध्या त्रिताल या तालावर आधारित "मी मानपमान", मुळ गायक रामदास कामत, गीत कुसुमाग्रज संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक ययाती आणि देवयानी. ह्याचे उच्चार खूपच हिंदी वाटले. गाणं चांगले म्हटले. याच्याशी पल्लवी आणि मान्यवर परीक्षक हिंदीत बोलत होते. तानबाजी जरा जास्त झाली असा सलीलला वाटले. दोघांनी "ध" दिला.
मृण्मयी तिरोडकरने दादरा तालावर आधारित मालवून टाक दीप हे गाणे म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत सुरेश भट, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. "पेंगते अजून रात" स्वराला चुकले. स्वराला स्थिरता नव्हती या गाण्यात असा मान्यवर परीक्षकांचा शेरा होता. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे मत होते, अवधूतला गाणं आवडला नाही. अवधूतने म तर सलीलने ध दिला.
अपूर्वा गज्जलाने केहरवा तालावर "कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" गे गाणं सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी. सावळाराम, संगीत वसंत प्रभू, ताल केहरवा. गाणं खूपच छान झाले. सलीलने व अवधूतने ध दिले.
त्यानंतर आली अभिलाषा चेल्लाम. हिने आज दादरा तालावर "सखी ग मुरली मोहन मोही मना." मुळ गायिका अशा भोसले, गीत पी सावळाराम संगीत पं हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, ताल दादरा. सुरवातीला "पुन्हा" हा शब्द जरा वेगळा म्हणाला. तसेच अंतऱ्यात शृंगाराची हा शब्द पण बेसूर झाला. पण नाहीतर गाणं खूपच चांगले झाले. अवधूतने ध तर सलील ने नी दिला.
Program started with 6 participants today. Because of last week's call back there is not going to be any elimination this week. Today participant are going to sing the song on "Taal". Swarada Gokhale sung "nirgunacha sang dharila jo avadi". Urmila dhangar sung "ghannila ladiwala zulavu nako hindola". Rahul Saxena sung "mi manapman". Mrunmayi Tirodkar sung "malvun taak deep". Apurva Gajjala sung "kalpavruksha kanyesathi lavuniya baba gela". Abhilasha Chellam sung, "sakhi ga murali mohan mohi mana".
Part 2
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment