पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

0 comments: