Part 1
मग आली ऋतुजा लाड "जाहल्या काही चुका". मस्तच झाले. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे म्हणणे आहे.
त्यानंतर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची". याचे पण उच्चार नीट आले नाहीत. कैफात तर कैफा असेच ऐकू आले. केसातल्या जुईचा ..इथे "जुईचा" शब्दावर जास्त थांबला. आणि पुन्हा शेवटची ओळ म्हणताना चूक झाली. एकूण बर्याच चुका झाल्या.
मग आला सिद्धेश परळीकर "दूर नदीच्या पल्याड केव्हा". सुरवातीला याचे खालचे नोटस नीट लागले नाहीत. गाणं चांगले झाले असे सगळे म्हणाले. या वेळेस गाण्याबद्दल जास्त बोलणे झाले. याच्या गाण्याच्या पद्धतीबद्दल फार नाही.
त्यानंतर समीक्षा भोबेचे "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला". चे बरेच उच्चार नाकातून येतात. जसे "फुलला" जेव्हा सोडताना अगदी नाकातून येते. सलीलने पुरणपोळीचे उदाहरण चांगले झाले.
अवधूतने तुझे देख के मेरी मधुबाला या गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या.
सगळ्यात शेवटचे गाणं झाले आकांक्षा देशमुखचे "आला ग बाई आला ग" सुरवातीचा आलाप अगदीच बेसूर झाला. काही जागा खरच बेसूर झाल्या. पण गाण्याचा आत्मा अगदी नीट धरून ठेवला होता. शब्द नीट बघावे असा सल्ला श्रुतीताई म्हणाल्या.
आता निकाल. आज २ स्पर्धक पुढे जाणार. आज स्वरदा गोखले आणि ऋतुजा लाड पुढे गेल्या. आता अंतिम फेरीत आहेत. राहुल सक्सेना, अभिलाषा चेल्लम, उर्मिला धनगर, मृण्मयी तिरोडकर, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे, ऋतुजा लाड, स्वरदा गोखले, संहिता चांदोरकर, सुस्मिरता डवालकर.
Then came Rutuja Laad "Jahlya kahi chuka". Prasanna prabhu tendulkar sung "jevha tichi na mazi chorun bhet zali". Siddesh paralikar sung "dur nadichya palyad kevha". Samiksha Bhobe performed "bai bai man moracha kasa pisara phulala". Last song was by Akanksha Deshmukh, "aala ga bai aala ga".
In the resultm 2 participant were selected, Rutuja Laad and Swarada Gokhale. Now there are 10 participant in the final. They are, Swarada Gokhale, Rahul Saxena, Abhilasha Chellam, Urmila Dhangar, Mrunmayi Tirodkar, Apurva Gajjala, Ashwini Deshpande, Rutuja Laad, Sanhita Chandorkar, Susmirata Dawalkar.
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment