पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आजपासून Knock Out Round सुरु आहे आज एकूण १० स्पर्धक आहेत आणि त्यातील फक्त २ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आजच्या मान्यवर परीक्षक म्हणून आल्या आहेत श्रुती सलोडीकर. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत एकदम उद्या निकाल.

स्पर्धेची सुरवात आकांक्षा देशमुखच्या "हाची नेम आता न फिरे माघारी" या गाण्याने झाली. गाणं खूप छान झाले नाही. आवाज थरथरत होता. विशेषता स्वर सोडताना थरथर बरीच जाणवत होती.





दुसरे गाणं म्हणायला आला सौरभ काडगावकर , "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".माझ्या मते गाणं चांगलं झालं. पण कुठेतरी खूप आर्तता आली नाही याच्या म्हणण्यात असे जाणवले.





तिसरे गाणं म्हणायला आला सिद्धेश परळीकर, "फुल ते संपले गंध न राहिला". गंध न राहिला म्हणताना कधी कधी आवाज कंप पावला.





"तिन्ही सांजा सखे मिळाल्या" हे गाणं समीक्षा भोबे ने सदर केले. कधी कधी स्वराला पकडून नव्हते. थोडे बेसूर झाले असे वाटत होते. अवधूतच्या मते गाणं सुरु होत, किंवा सोडतो तेव्हा गाणं बेसूर होत. असेच इतर परीक्षकांचे मत होते.





मग आली ऋतुजा लाड. "सावरिया से नैन हो गये चार." गाणं छानच झाले. सगळे परीक्षक खुश. हे गाणं मी प्रथमच ऐकले. मस्तच म्हटले. सगळे सूर नीट लागत होते.






प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का". गाणं चांगले झाले. पण मधेच एक शब्द विसरला. स्वरावर पूर्णत्वाने या असा सल्ला श्रुती सलोडीकरने दिला.





This week it is going to be Knock Out round. Today there are 10 paticipant. Only 2 out of this lot will go to the finals. Todays special judge is Shruti Salodikar. Program starts by Akanksha Deshmukh's "hachi nem ata na phire maghari". Next song is by Saurabh Kadgaokar "Paradhin aahe Jagati Putra manavacha". Third song was by Siddesh Paralikar "phul te sampale gandh na rahila". Forth song was by Samiksha Bhobe, "Tinhi sanja sakhe milalya". Nex comes Rutuja Laad "Savariya se nain ho gaye char". Prasanna Prabhu Tendulkar sings "tya phulanchya gandhkoshi saang tu aahes ka"


Part 1

0 comments: