पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज अंतिम फेरीचा पहिला निकाल आहे. आज १० स्पर्धक आहेत. आज Danger Zone सुरु झाला आहे. सगळ्यात जास्त मार्क ज्याला मिळाले ती स्पर्धक आज प्रथम गाणं म्हणणार आहे. सगळ्यात जास्त मार्क अभिलाषा चेल्लाम. "कुठं तुम्ही गेला व्हता सांगा कारभारी" कोरस मस्त झाले. तसेच अभिलाशाचे गाणं देखील मस्त झाले.




दुसऱ्या स्थानावर आहे उर्मिला धनगर. "नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला शाम". हे गाणं जरी उर्मिलाच्या आवाजाला शोभत नसले तरी तिने गाणं खूपच छान म्हटले.




तिसऱ्या क्रमांकावर आला राहुल सक्सेना. "नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो.". पल्लवी फक्त राहुल बरोबरच हिंदीत का बोलते हे एक कोडेच आहे. कारण अभिलाषा आणि अपूर्वा देखील अमराठी आहेत, पण त्यांच्याशी ती मराठीतच बोलते. या गाण्यात इतके छान भाव आले नाहीत. पण प्रयत्न चांगला होता. या गाण्यात राहुल अमराठी आहे असे जाणवत होते. कारण बरेच शब्द तो अगदी प्रयत्नपूर्वक उच्चारतो आहे असे वाटत होते.



सलीलने पण हे गाणं म्हटले.



चौथ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फूलावीत." लय जरा कमी पडत होती असे अवधूतला वाटले.






पाचव्या क्रमांकावर होती "स्वरदा गोखले". "लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू ". गाणं चांगले झाले. खालचे स्वर स्थिर नव्हते असे मला वाटले.




This week the results for the final round will be announced. Today the order of singers is decided as per the marks plus votes they received last week. As per that, the first participant was Abhilasha Chellam. She sings "Kutha tumhi gela vhata sanga karbhari". Second highest was Urmila Dhangar, performs "Bai mi vikat ghetala sham". Third song was by Rahul Saxena "Nasates ghari tu jevha". Forth in order was Mrunmayi Tirodkar "Malachya malyamandi patache pani jaata". Fifth in the position was Swarada Gokhale "Limblon utaru kashi, asashi dur laamb tu".


Part 2

0 comments: