आज प्रेमावरील गाणी म्हणणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "साधना सरगम". साधना सरगम कार्यक्रमाची सुरवाती "पहेला नशा पहेला खुमार". सगळ्यात प्रथम आनंदी जोशी सदर करते, "हि गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा" गीत गुरु ठाकूर, संगीत अवधूत गुप्ते, मुळ गायिका वैशाली सामंत, हे गोलमाल चित्रपटातील गाणं आहे. साधना सरगमचे मार्क दिसणार नाहीत. अवधूतने "ध" दिला.
Today's theme for the songs is "Love Songs". Today guest judge is Sadhana Sargam. Sadhana Sargam sings "pahela nasha pahela khumar" to start the program. First Anandi Joshi performs "Hi Gulabi Hava ved laavi jeeva, haay shwasatahi eiku ye maarava"
दुसरे गाणं सादर करायला आला विजय गटलेवार. याने "तुला पाहतो मी, मला पाहताना" गायले. गीत चंद्रशेखर सानेकर, मुळ गायक आणि संगीत अवधूत गुप्ते. हे गाणं हि सांज सुखाने या अल्बम मधील आहे. सूर थोडे घसरले. अवधूतने "ध" दिला.
Second song was performed by Vijay Gatlewar. He performed a song from "hi Saanj sukhane", Tula phato mi, mala pahatana. Original singer and music is Avadhoot Gupte and Lyrics is by "Chandrashekhar Sanekar. Avadhoot gave "pa".
Vijay Gatlewar - Tula Pahato Mi
मग राहुल सक्सेनाने "चंद्र हा आता मावळाया लागला, प्राण माझाही घडाया लागला" हे गाणं सादर केले. मुळ गायक सुरेश वाडकर, गीत सुरेश भट, संगीत रवी दाते, अल्बम रंग मैफिलीचे. अवधूतची सुरेश वाडकरांची नक्कल बघण्यालायक. अवधूतने "ध" दिला.
Rahul Saksena performed "chandra ha ata mavalaya lagala, pran mazahi ghadaya lagala" Original singer is Suresh Wadkar, music by Ravi Daate, Lyrics Suresh Bhat. This song is from "Rang maifiliche". Avadhoot gave "dha"
मग अनिरुध्ध जोशीने "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वर" हे गाणं म्हटले. गीत मंगेश पाडगावकर संगीत श्रीनिवास खळे, मुळ गायक सुरेश वाडकर. गाणं मस्त झाले. अवधूतने "ध" दिला
Anirudhdha Joshi sung "jevha tuzya batanna udhali mujor waara" Original singer Suresh Wadkar, Lyrics is by Mangesh Padgaonkar, and music is by Shriniwas Khale. He received "dha" from avadhoot.
त्यानंतर आली सायली ओंक. हिने एक नवीनच गाणे म्हटले. "जीवघेणा रुसवा कि फसवा अबोला, वाट जुळल्यावारी पळवाटा कशाला" मुळ गायिका मधुर दातार, गीत वैभव जोशी, संगीत कमलेश भडकमकर. हे गाणं स्पर्शगंध या अल्बम मधील आहे. गाणं खूप नाजूक आहे. पण शब्द खूप भरभर म्हणावे लागतात. त्यामुळे जरा पळापळ झाली सायलीची. अवधूतने "प" दिला.
Sayali Oak performed a relatively new song. "jeevghena rusava ki phasava abola, vaat julalyavari palwata kashala", this song was sung by Madhura Datar, lyrics is by Vaibhav Joshi, music is by Kamlesh Bhadkamkar. This song is from "Sparshgandh". Avadhoot gave "pa" for this song.
Sayali Oak - Jeev Ghena Ruswa
मग आला अनिकेत सराफ. ह्याने "पहिले न मी तुला, तू मला न पहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले". मुळ गायक - सुरेश वाडकर, गीत - मधुसूदन कालेलकर, संगीत - अनिल अरुण. चित्रपट गुपचूप गुपचूप. ह्याच्या आवाजात जरा कंप जाणवला. अवधूतने प दिला.
Aniket Saraf, sung "Paahile na mi tula, tu mala na paahile, naa kale kadhi kuthe man vede guntale". Original singer Suresh Wadkar, Lyrics Madhusudan Kalelkar, Music by Anil-Arun. This song is from Gupchup-gupchup. Avadhoot gave "pa"
Part 2
महारथी (Maharathi)
8 years ago
0 comments:
Post a Comment