"कोकिळेचे मंद गाणे, धुंद हे वेडे धुके, या क्षणी बोलू नको तू, प्रेम राहू दे मुके" हे गाणं मिलिंद इंगळेने सदर केले आणि कार्यक्रमाची सुरवात झाली. आज मिलिंद इंगळे परीक्षक म्हणून आला आहे. आज मिलिंद इंगळे बरोबर, मिलिंद जोशी देखील आले होते.
Milind Ingale started the program by singing a song from yet to release film Prarambh, "Kokileche mand gane, dhund he vede dhuke, ya kshani bolu nako tu, prem rahu de muke." Today Milind Ingale and Milind Joshi are judges, but both of them will not give any marks.
स्पर्धेची सुरवात झाली राहुल सक्सेनाच्या गाण्याने. ह्याने आज "लाजून हासणे, अन हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे". मुळ गायक पं. हृदयनाथ मंगेशकर , गीत मंगेश पाडगावकर, संगीत श्रीनिवास खळे. या आठवड्यात कोणीही बाहेर जाणार नाहीत. पुढील आठवड्यापासून पुन्हा एलिमिनेशन सुरु होईल.
Competition started by Rahul Saksena song "laajun haasane an haasun lajane, mi olakhun aahe saare tuze bahane". Original singer pa. Hrudaynath Mangeshkar, Lyrics Mangesh Padgaokar, Music Shriniwas Khale. This week there is no elimination and no marks.
त्यानंतर आली आनंदी जोशी. हिने ऋतूहिरवा या मराठी अल्बममधील "फुलले रे क्षण माझे फुलले रे " हे गाणं म्हटले. मुळ गायिका आशा भोसले, गीत नितीन आखवे, संगीत श्रीधर फडके. गाणं ठीक होते.
Anandi Joshi sung "phulale re kshan maze phulale re". This song is originally sung by Asha Bhosale. Lyrics is by Nitin Aakhave, Music is by Shreedhar Phadake, This song is from RutuHirva album.
मग आली अपूर्वा गज्जला. हिने "छम छम करता है ये नशीला बदन". कोरसला अनिरुध्ध, राहुल आणि विजय होते. मुळ गायिका वैशाली सामंत,गीत शाम अनुरागी,संगीत अजय-अतुल. हे गाणं अगं बाई अरेच्चा या सिनेमातील आहे
Apurva Gajjala performed "chham karata hai ye nasheela badan" This song is from marathi movie "Aga bai arechcha". Original singer is Vaishali Samant, Lyrics Sham Anuragi, Music Ajay-Atul. Vijay, Anirudhdha and Rahul were with her chorus.
त्यानंतर आला अनिरुध्ध जोशी. याने आज "काटा रुते कुणाला, मज फुल हि रुतावे हा दैवयोग आहे." हे नाट्यसंगीत सादर केले. मुळ गायक आणि संगीत पं जितेंद्र अभिषेकी, गीत शांता शेळके. हे गाणं "हे बंध रेशमाचे " या नाटकातील आहे.
Anirudhdha Joshi performed "kata rute kunala, maj phul hi rutave ha daivayog aahe". Original singer and music to this song is by Pa. Jitendra Abhisheki, Lyrics is by Shanta Shelake. This song is from a dram "he bandh reshamache".
त्यानंतर आला विजय गटलेवार. याने "परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते" हे गाणं सदर केले. मुळ गायक आणि संगीत मिलिंद इंगळे, गीत अशोक बागवे. हे गाणं गोजिरी या मराठी चित्रपटातील आहे.
Vijay Gatlewar performed a song from a marathi movie "Gojiri". "paratichya ya watevarati asech kahi ghadate". Original singer and music is by Milind Ingale, Lyrics is by Ashok Baagve.
कुसुमाग्राजाची कविता स्वधर्म सादर केली मिलिंद जोशीने. "दिवसच गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता". मिलिंद जोशीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
Milind Joshi performed a poem by Kusumagraj, "swadharma". Divasacha gun prakash aahe, ratricha gun shamalata, gun gaganacha nirakarta, meghanch gun vyakulata". Program ended with this song.
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment