पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ६ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

उपांत्य पूर्व फेरीचा शेवटचा भाग आज होता. आजचे मान्यवर परीक्षक म्हणून रघुनंदन पणशीकर होते "जाऊ देवाचिया गाव देव देईल विसावा" या रघुनंदन पणशीकरांच्या गाण्याने सुरवात झाली. आजच्या कार्यक्रमाचे अजून एक विशेष म्हणजे आज सलीलचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्यासाठी एक केक आणला होता.





आजच्या स्पर्धेत ६ स्पर्धक होते. त्यातील २ अवधूतच्या गटातील तर ४ सलीलच्या गटातील. सलीलला वाढदिवसाची भेट म्हणून अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे अवधूत म्हणाला. आज सगळे स्पर्धक २ गाणी म्हणणार होती.

स्पर्धेची सुरवात "अवघे गर्जे पंढरपूर" या ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. हि मुलगी सगळ्यात बिनधास्त आहे आणि ती खूपच आत्मविश्वासाने गाणं म्हणते. अवधूत आणि सलील च्या एकमेकांवरील कोट्या मजेशीर होत्या.





स्पर्धेतील दुसरे गाणं "सजल नयन नितधार बरसती" हे सिद्धेश परळीकरने म्हटले. मस्त म्हटले. काही काही जागा खूप छान घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले गेले. पण मार्क मात्र जास्त मिळाले नाहीत कारण सुराला चिकटून गाणं झालं आहे असे परीक्षकांना वाटले नाही.





तिसरे गाणं श्रीरंग जोशीचे "काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल". गाणं चांगलं म्हटले. अवधूतच्या कॉमेन्टस मजेशीर होत्या.





चौथे गाणं सौरभ दफ्तरदारचे "लाजून हसणे अन हसून हे पाहणे".सौरभने गाणं छान म्हटले, पण सलिलचे मत असे होते की त्याने खुप जास्त भाव न आणता गाणं म्हटले. या कार्यक्रमामधे सलिल आणि अवधूतच्या एकामेकंवारिल कमेंट्स मुळे खुप जीवंतपणा येतो.





पाचवे गाणं आकांक्षा देशमुखचे "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात" गाणं खूपच छान म्हटले. या गाण्यावर आकांक्षाला "नी" मिळाला. खूपच अप्रतिम गाणं झालं.





सहावे गाणं, राहुल सक्सेनाचे "बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात". गाणं चांगले म्हटले पण शब्दाचे उच्चार नीट झाले नाहीत. बरेचदा "माळ" चा उच्चार "माड" असा झालं. पण तरीही त्याचे कौतुक करण्यात आले याचे जरा आश्चर्य वाटले. यासाठी त्याला "नी" मिळाला.






Today was the last day of the second round. Today's Judge was "Raghunandan Panashikar". Program started by his song, "Jau devachiya gava, dev deil visava". Today's special thing was, it was Salil's birthday. As a birthday gift, there were 2 participant from Avadhoot's group and 4 from Salil's group.

First song of the competition was sung by Rutuja Laad, "Avaghe garje pandharpur". It was sung very well. Second song was by Sidhdhesh Paralikar "Sajal nayan nitdhar barasati". Did not get much marks. Third song was by Shrirang Joshi, "Kaya hi pandhari atma ha viththal". It was sung very well. Forth song was by Saurabh Daftardar "Lajun hasane an hasun he pahane". He did not get much marks as judges felt it was not with full emotion. Fifth song was by Akanksha Deshmukh "Chandanyat phiratana maza dharalas haat". Very good song and she sung very well. She got highest marks for the first time. Sixth song was by Rahul Saxena, "Bagalyachi maal phule ajuni ambarat". He sung very well, but he did not pronounce "La" very well, many times it sounded like "Da". Still he got highest marks.


Part 2

0 comments: