काल जसे जूनियर लिटिल चँम्पसला बोलावले होते असे आजे सीनियर लिटिल चँम्पस येणार होते. प्रथमेश, आर्या आणि रोहित आज येणार होते. आजचा दिवसाची सुरवात प्रथमेशच्या गाण्याने झाली "गर्जे अवघे पंढरपूर"
आज पुन्हा सगळ्या ९ स्पर्धकांनी एक गाणं सादर करायचे आहे. ज्यांनी काल हिंदी गाणी म्हटली होती ते आज मराठी म्हणणार आणि मराठी म्हटली त्यांनी हिंदी.
स्पर्धेची सुरवात संहिता चांदोरकरच्या "विष्णुमय जग". गाणं खूपच छान झाले. आवाज एकदम छान लागला होता आणि अगदी भावमय गाणं झालं. रोणू मुजुमदारच्या मते सुरवात जरा सुराला चिकटून झाली नाही. पण नंतर चांगले झाले. "ध" मिळाला.
त्यानंतरचे गाणं गायला आली समीक्षा भोबे "मधु मागसी माझ्या सख्या परी" गाणं खूप जास्त टेन्शन मध्ये म्हटले, असे अवधूतचे मत होते. गाणं जास्त भूमिकेत शिरून म्हणायला हवे होते. सलीलला खूप आवडले. "ध" मिळाला.
तिसरे गाणं सादर करायला आली आकांक्षा देशमुख "अरे कान्हा दे रे चोळी अन् लुगडी". गाणं मस्तच झाले. कालच्या गाण्यापेक्षा खूप जास्त चांगले झाले. थोडे जास्त भाव यायला हवे होते. सलीलला पण आवडले. "ध" मिळाला.
आकांक्षाचे गाणं झाल्यावर आर्याला बोलावण्यात आले. आर्या आता १०वित आहे. आर्याने आल्यावर गाणं म्हटले "नरवर कृष्णासमान, " आर्याचे गाणं ऐकून खूपच छान वाटले. हिच्या ताना आणि आलाप किती साफ व स्वच्छ येतात याचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे.
मग आला सिद्धेश परळीकर "वृन्दावनी वेणू वाजे". कालच्या गाण्यापेक्षा खूप जास्त सफाईदार आले. अवधूतच्या मते सुराला चिकटून नव्हते. रोणू मुजूमदारला कालच्या पेक्षा खूप चांगले झाले. पण सलीलला तसे वाटले नाही. "ध" मिळाला.
Like yesterday, today Senior little champs are invited to the show. Program started with Prathamesh's song "Avaghe garje pandharpur". First song in the competition was by Sanhita Chandorkar "Vishnumay Jag". Second song was by Samiksha Bhobe, "Madhu magasi mazya sakhya pari". Then Akanksha Deshmukh sung "are kanha de re choli an lugadi". Then Arya Ambekar was invited on stage, she sung "narvar krishnasaman". Later Siddesh Paralikar performed "vrundavani venu vaaje". After this next round is of Hindi songs.
Part 2
महारथी (Maharathi)
8 years ago
0 comments:
Post a Comment