Part 1
त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.
मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.
त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.
मग कृष्णाने ढोलकी वाजवली.
स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.
कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.
Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment