Part 1
पाचवं गाणं म्हणायला आला तुषार शिंदे. याने आज हिंदी गाणं सादर केले. "झनक झनक तोरी बाजे पायलिया". उच्चार तितकेसे ठीक वाटले नाहीत. शेवटचे जास्त लयीतील गाणं तितकेसे नीट जमले नाही. अभिजीतच्या मते भाव इतके नीट आले नाहीत. सलीलच्या मते तालासुरात गायला, पण भाव नीट आले नाहीत. अवधूतचे पण तेच मत होते. "प" मिळाला.
त्यानंतर आली स्वरदा गोखले ती पण आज हिंदी गाणं म्हणणार "पान खाये सैया हमारो" सुरवातीला आवाज जरा कापला असे वाटले आणि गाणं जरा लाडिक झाले असे वाटले. पण नंतर गाणं छान झाले. गाणं सुरु झाल्यावर मात्र आर्या आम्बेकारची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. अभिजीतच्या मते गाणं खूप छान झाले नाही. सलीलच्या मते गाणं technically गायली नाहीस तर performance साठी गायली. अवधूतच्या मते भाव आणायला गेली तिथे बेसूर झाली. "ध" मिळाला.
सातवे गाणं गायला आली अभिलाषा चेल्लाम. हिने "नदिया किनारे हरायी आए कंगना,". गाणं खूपच छान म्हटले. Once More मिळाला. अभिजीतला खूप आवडले. सलीलला पण खूप जास्त आवडले. सलीलच्या अवधूतवरील कोट्या मजेशीर होत्या. सर्वोत्कृष्ट असे सलील म्हणाला. अवधूतला पण खूप आवडलं. अप्रतिम गायली असे अवधूत म्हणाला. वरचा "सा" मिळाला.
आठवे गाणं म्हणायला आली अश्विनी देशपांडे "हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते".परवीन सुलताना च्या पद्धतीने चांगली गायलीस असे सलील म्हणाला. अभिजीतला पण आवडले. अवधूतला आवडले, पण उच्चार नीट आले नाहीत असे त्याचे मत होते. "प" मिळाला. "
आता राहुल सक्सेना आला शेवटचे गाणं म्हणायला. याने म्हटले "तुमसे मेरी लगन लगी" हिंदी गाणे असल्याने तसा उच्चाराचा काही प्रश्न नव्हता याला. अभिजीतच्या मते गाणं एकदम बरोबर होते अजिबात चूक झाली नाही. सलीलला पण आवडले. अवधूतला आवडले "ध" मिळाला.
आता निकाल. आज यातील ४ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आज पुढे गेले अभिलाषा चेल्लाम, राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे.
हा निकाल अगदीच धक्कादायक होता. राहुल सक्सेनाला होता ध+ध, अश्विनीला ध+प, अपूर्वा गज्जलाला ध+ध, आणि ऋतुजा लाडला "ध + नी" पण ती पुढे गेली नाही. आणि सगळ्यात जास्त चांगला Permormance होता राहुलचा असे अभिजित म्हणाला पण नंतर लगेच बदलला, कारण खर तर अभिलाषाला ध + सा होता. यात एकाच परीक्षकाचे मार्क दाखवतात आणि इतर परीक्षकांचे नाही. त्यामुळे या मधून बरेचदा, मार्कांचा फेरबदल आणि कोणाला आत आणायचे आणि कोणाला बाहेर टाकायचे हे ठरवतात असे पुन्हा लक्षात आले आहे.
Fifth song was by Tushar Shinde, "zanak zank mori baje payaliya". Sixth song was by Swarada Gokhale, "Paan khaye saiya hamaro". Seventh song was by Abhilasha Chellam, "Nadiya kinare harayee aayee kangana". After this Ashwini Deshpande sung "Hume tumase pyar kitna" . Last song was by Rahul Saxena "tumase meri lagan lagi".
And the result was very surprising and partial. Abhilasha Chellam, Rahul Saxena, Ashwini Deshpande and Apurva Gajjala went ahead. The mystery is Rutuja laad better marks than Ashwini and Apurva, but still she was nominated for the knock out round.
महारथी (Maharathi)
8 years ago
0 comments:
Post a Comment