पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

पुढील फेरीमध्ये २४ स्पर्धक आले आहेत. त्यातील १२ स्पर्धक मागील आठवड्यात गायले आणि आज पुढील १२ गाणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "सावनी शेंडे". हि शास्त्रीय संगीतात खूपच प्रसिध्ध आहे. आज एकूण ६ स्पर्धक आहेत प्रत्येक स्पर्धक २ गाणी सदर करणार आहेत.

आजच्या स्पर्धेची सुरवात सागर जाधवच्या "गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" या गाण्याने झाली. गाणं त्याच्या आवाजात खूप छान वाटत होते. सगळ्या परीक्षकांनी त्याची वाहवा केली पण मार्क "प" मिळाले.





दुसरं गाणं अश्विनी देशपांडेचे होते. तिने "अगा करुणाकरा" हे गाणं म्हटले. गाणं चांगले म्हटले. अवधूतच्या मुंगीच्या शेपटीवरील ढेकुण म्हणजे अतीच झाले. गाणं अप्रतिम होतं असा सलीलचा शेरा होतं. "ध" मिळाला.





तिसरं गाणं सुस्मिरता दवाळकरचे झाले. "बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव". जीव आणि भाव ओतून म्हटले. खूप छान म्हटले. अवधूत प्रथमच अध्यात्मावर बोलला. मला नीटसे कळलं नाही. पण त्यावर सलीलचे मत पटणारे होते. "ध" मिळाला. एका ठिकाणी उच्चार चुकले होते.





चौथे गाणं होते मृण्मयी तिरोडकरचे. हि अपक्ष उमेदवार होती मागील भागात. हिने "डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली" हे गाणं म्हटले. सावनीच्या मते पहिली ओळ खूप सुरात येते आणि तीच ओळ परत म्हटली कि कुठेतरी बेसूर होते. आणि अवधूतच्या मते ती घाबरली होती. पण तरीही तिला "ध" मिळाला.





पाचवे गाणं स्वरदा गोखले चे "नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला". सुरवातीला स्वर हलले असे सलीलचे मत होते. सगळ्या परीक्षकांनी कौतुक केले. "ध" मिळाला.





सहावे गाणे "चांदण्या रात्रीतली ती स्वप्ना तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा" हे मोना कामतने म्हटले. माझ्या मते खालचे स्वर जरा कापत होते. पण गाणं चांगले होते. सलीलला खूप आवडले नाही. कारण त्याच्या मते भाव नीट आले नाही. "प" मिळाला.



Today was the second week of the second round. Last week 12 participant had performed and this week next 12 will perform. Today, out of this 12, 6 will present 2 songs each. Today's special judge was Savani Shende. She is one of the blooming Hindustani classical singer in today's era. The episode started with the song "Gaon jagavit aali vasudevachi swari". Song was performed by Sagar Jadhav. Sagar got "pa". The second was by Ashwini Deshpande, Aga Karuna Kara. She got "dha" for this performance. Third song was by Susmirata Davalkar, "Bolava Viththal, pahava viththal", She got "dha" for this. Forth song was by Mrunmayi Tirodkar, "Dolyavarun mazya utarun ratra geli". Performed very well and received "dha". Fifth song was by Swarada Gokhale, "Thakale re nandalala". Very well sung, received "dha". The last song was by Mona Kamat, "Chandanya ratritali ti swapna tu visarun ja". As per the judges she was little tensed and that is why performance was not upto the mark. She received "pa". So in the first round of today, Sagar Jadhav and Mona Kamat was trailing. Now let us see what happens in the next performance.

Part 2

0 comments: