पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दुसर्या राउंड नंतर होण्याऱ्या Knock Out Round चा आज दुसरा दिवस. आज पुन्हा ६ उभरते गायक. काल ३ स्पर्धक उपांत्य फेरीत गेले. आता आज बघायचे किती पुढे जातात. आजचे मान्यवर परीक्षक होते सुरेश वाडकर. आजच्या कार्यक्रमाची सुरवात "कोटी कोटी रुपु तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. " या सुरेश वाडकरांच्या गाण्याने झाली.



स्पर्धेची सुरवात मोना कामतच्या गाण्याने झाली. "प्रभाती सूर नभी रंगती" हे गाणं तिने चांगले म्हटले. गाणं खूप सुरात झाले नाही असे सलीलचे मत होते आणि सुरेश वाडकर म्हणाले कि गाणं भिजलेले हवे, फक्त सुरात म्हणत होती गाण्यात ओलावा नव्हता. अवधूतचे पण मत असेच काहीसे होते. आज मार्क मिळणार नव्हते तर शेवटी एकदम निकाल.



दुसरे गाणं म्हणायला मंचावर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. याने "संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतं". मध्ये मध्ये बेसूर झाला. मधला एक आलाप जमला नाही. सगळ्याच्या मते गाणं चांगले म्हटले पण सुरांकडे थोडे लक्ष द्यायला हवे असे मत होते.




तिसरं गाणं स्वप्नील चाफेकरचे "माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद" झाले. श्रीधर फडकेचे संगीत असलेली हि रचना अत्युत्तम आहे. सुरेश वाडकरांच्या मते सुराला खूप धरून नव्हते. सलीलचे असे मत होते कि रसनिष्पत्ती नीट झाली नाही. अवधूतने पण तेच सांगितले.



चौथे गाणे मृण्मयी तिरोडकरचे "वाट पाहुनी जीव शिणला दीसामागून दिस टळला." आवाज खूप छान लागला होता. गाणं अप्रतिम झाले असे तिघांचे पण मत होते. सलीलच्या मते एक सूर नीट लागला नाही पण नंतर सगळे गाणं सुरात आले.




पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "काही बोलायचे आहे पण बोलणार नाही" कुसुमाग्रजांचे गीत, त्याला यशवंत देवांचे संगीत आणि अरुण दातेचा स्वर असलेला हे गाणं तसा पेलायला कठीण आहे. माझ्या मते सगळे "नाही" नीट आले नाहीत. त्याचे उच्चार चांगले वाटले नाहीत. भाव नीट आले नाही असे सगळ्या परीक्षकांचे मत होते.





सहावे गाणं सागर जाधवने म्हटले. "दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो, कशी नशिबाने थट्टा आज मांडली". त्याने खूपच मस्त म्हटले. याच्या आवाजाला हे गाणं खूपच साजेशे होते. आणि त्याने अगदी संपूर्ण न्याय दिला गाण्याला असा मला वाटले. सलीलच्या मते अगदी भावपूर्ण झाले. अवधूतने नेहमीप्रमाणे तोडलंस, फोडलास असे मत दिले.



Today is the second day of the "knock out round". Today everyone will sing two song and judges will give marks only on that song. Result will be there at the end. Yesterday 3 participant went in the next round. Today's judge was Suresh Wadkar. Program starts by his song "Koti koti rupe tuzi, koti surya chandra tare".

Knock round starts by Mona Kamat's "Prabhati sur nabhi rangati". Next song was by Prasanna Prabhu Tendulkar "Sant bhar pandharicha". Third song was sung by Swapnil Chafekar, "Mazya mana lago chand, nitya govind". Forth song was by Mrumnayi Tirodkar "Waat pahuni jeev shinala". Then came Shrirang Joshi and performed "Kahi bolayache aahe pan bolnar nahi". Sixth song was by Sagar Jadhav, "Kashi nashibane thatta aaj mandali".

Now one more song will be performed by each participant and then result will be announced.

Part 2

0 comments: