पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

आता आजच्या भागातील गाणं म्हणण्याची दुसरी संधी. पुन्हा सागर जाधव गाणं गायला येतो. "या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे". मंगेश पाडगावकरांचे अजरामर गाणं. सागरने खूपच छान म्हटले. "ध" मिळाला.





नंतरचे गाणं मृण्मयी तिरोडकर "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती गं" सलीलच्या मते गाणं घाबरल्यासारखे झाले. सावनीचे मत तसेच होते, कि सुराला कमी जास्त होतं. अवधूतच्या मते हिच्या आवाजाला हे गाणं योग्य होतं. तिला "प" मिळाला.






नववे गाणं, "शंभो शंकरा, करुणाकरा " स्वरदा गोखलेच्या आवाजात. अवधूतच्या मते हिचा आवाज खूप गोड आहे. अवधूतच्या उपमा काहीही असतात असे आता जाणवले. सावनीच्या मते सुरवातीला जास्त छान झाले नंतर, कुठेतरी गाणं निसटले. सलीलला पण तसेच वाटले. तिला "प" मिळाला.





दहावे गाणं सुस्मारिता दवाळकारच्या आवाजात "नको रे नंदलाला ". सगळ्या परीक्षकांच्या मते हिने खूप छान म्हटले आणि गाण्यातले फरक चांगले दाखवून दिले. एक नोट वर चालले असते असा सगळ्यांचा सूर होता. "ध" मिळाला.





११ वे गाणं मोना कामातचे "अंगणी माझ्या मनाच्या मोर दाटू लागले". सलीलच्या मते जागा घेताना कष्ट पडत होते. पण एकूण गाणं चांगल झाले. पुन्हा "प" मिळाला.





शेवटचे गाणे "गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी" हे अश्विनी देशपांडेचे झाले. मला धृवपद जरा नाकातून वाटले. सलीलच्या मते श्वास पूरत नव्हता. सावनी म्हणाली कि हे गाणं कठीणच आहे पण तरीही तिला ते आवडले. खालचे स्वर नीट लागले नाहीत असा अवधूतचा शेरा होता. "प" मिळाला.





आता निकाल. दोन्ही गाणी ज्यांची चांगली झाली तेच पुढे जाणार असं ठरले होते त्यानुसार सुस्मिरता दवाळकर आणि स्वरदा गोखले पुढे गेल्या. आणि आजचा "बेस्ट पेर्फोर्मेर" म्हणून स्वरदा गोखलेला निवडले गेले. सावनीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.






Now the second song performance by all the participants. Sagar Jadhav sung "ya janmavar ya jaganyavar". Next song was by Mrunmayi Tirodkar "balagu kashala vyartha kunachi bhiti ga". After that Swarada Gokhale performed "Shambho shankara". Susmita Davalkar's "nako re nandalala" was the next song. and then Ashwini Deshpande sung "tu tar chaphekali". And then in the result, only 2 people went ahead, Swarada Gokhale and Susmirata Davalkar. Swarada Gokhale received the best performer award.

0 comments: