Part 1
दुसरं गाणं सादर करायला प्रथम आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. त्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". खूपच मनापासून गाणं म्हटले असे वाटत होते. सलीलला खूप आवडले आणि विशेष म्हणजे आवाजाची नक्कल न करता गायलीस याबद्दल कौतुक करण्यात आले. सुरेश वाडकरांच्या मते काही जागा अस्पष्ट येतात. अवधूतच्या मते पण गाणं खूप छान झाले.
त्यानंतरचे गाणं गायला आला स्वप्नील चाफेकर. त्याने "प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती जोडू अमोल नाती ये ना " हे गाणं म्हटले. गाणं एकदम उडत्या चालीचे आहे. गाणं चांगले झाले असे सगळ्यांचे मत होते. मल्लिका शेरावत नऊवारी घातल्यावर ती जितकी लाजणार नाही तितका हा लाजत होता असा शेरा अवधूतचा होता. सलीलच्या मते गाणं चांगले म्हटले आणि सुरेश वाडकरांचे पण तेच मत होते.
तिसरा गाणं म्हणायला आली मृण्मयी तिरोडकर. हिने "लवलव करी पातं डोळा नाही थार्याला" माझ्या मते सुरवात इतकी छान झाली नाही. नंतर मात्र चांगले म्हटले. सलीलचे उदाहरण खूप मस्त असतात. तो म्हणाला कि तू तुझ्या मानानी नाचलीस वगैरे. सुरेश वाडकरांनी तिला काही बदल सुचवले. अवधूतने काही विशेष मत दिले नाही.
चौथं गाणं मोना कामातचे "मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतीने धुंद झाले". तिला वरचे स्वर गायला त्रास होत होता असे वाटत होते. कदाचित थोडे खाली घेतले असते तर ठीक झाले असते. गाणं चांगलं झाले असे अवधूत म्हणाला. सुरेश वाडकर म्हणाले कि तुला अजून मेहनत करायला हवी कारण गाण्याचा आत्मा हरवला आहे आहे वाटत होते. सलील म्हणाला कि मागच्या पेक्षा चांगले झाले पण सगळे मिळून चांगलं व्हायला हवा तसे झाले नाही.
पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "हा छंद जीवाला लावी पिसे " सुरवात या गाण्याची अशी आहे कि त्यात सगळे तुम्ही किती तयार आहात गाण्यात हे दिसून येते. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. स्वर खूप ठिकाणी जात होते. सलीलच्या मते या गाण्यात श्रीरंग चा उत्साह जरा जास्त झाला आणि त्यामुळे सूर गेले. सुरेश वाडकरांचे मत पण काहीसे तसेच होते. अवधूतचे मत तसे होते पण तो म्हणाला कि वयाच्या मानानी चांगले गायलास.
सहावे गाणं म्हणायला आला सागर जाधव. "लिंगोबाचा डोंगुर आबाळी गेला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला". सागरच्या आवाजात अशी गाणी खूप छान होतात. अवधूत म्हणाला कि खूप छान गाणं म्हणून स्पर्धा संपवली आहे. सुरेश वाडकर म्हणाले कि छान म्हटले आणि सलीलचे पण मत तसेच होते.
आता निकाल. प्रसन्ना श्रीरंग आणि मृण्मयी सलीलच्या गटात होते. मृण्मयी आणि प्रसन्ना सलीलच्या गटातून पुढे गेली. अवधूतच्या गटात स्वप्नील, मोना आणि सागर. त्याच्या गटातून सागर पुढे गेला.
कार्यक्रमाची सांगता सुरेश वाडकरांच्या "गुरु एक जगी त्राता". या गाण्याने झाली.
First song in the second round of this part was by Prasanna Prabhu Tendulkar. He sung "Disalis tu phulale rutu". Second song was by Swapnil chafekar. He sung "Pritichya chandarati gheuni hat hati gheuni hat hati jodu amol nati ye na". Then came Mrunmayi Tirodkar. She sung "Lavlav kari paata dole nahi tharyala". Forth song was by Mona Kamat, "mi varyachya vegane aale, tuzya pritine dhund zale" Fifth song was by Shrirang Joshi, "ha chhand jeevala lavi pise". Sixth song was by Sagar Jadhav. "Lingobacha dongur abali gela". Now the result, Mrunmayi Tirodkar, Prasanna prabhu Tendulkar and Sagar Jadhav went in the next round. End of the program was by Suresh wadkar's song "Guru ek jagi trata".
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment