आज उपांत्य फेरीचा दुसरा भाग. आज कार्यक्रमाची सुरवात कार्तिकीच्या गाण्याने झाली. "कृष्णे वेधिली विरहणी बोले" हे गाणं म्हटले. आज मुग्धा आणि कार्तिकी कार्यक्रमाला आल्या होत्या.
आज उरलेले ९ स्पर्धक आहेत. आज पुन्हा हिंदी वर मराठी गाण्याचा समावेश असणार आहे. आजचे मान्यवर परीक्षक आहेत बासरीवादक रोणू मुजुमदार. आज अवधूतचे मार्क दिसणार आहेत.
स्पर्धेची सुरवात सुस्मिरता डवालकर च्या गाण्याने झाली. हिने "भेटी लागी जीवा लागलीसे आस" म्हटले. मधून जरा सुराला सोडून होते. गाणं चांगले झाले असे सलील म्हणाला. रोणू मुजुमदारने काय सांगितले ते नीटसे कळले नाही. अवधूत म्हणाला कि खूप कंट्रोल आवाजात गायलीस. "ध" मिळाला.
दुसरे गाणे झाले मृण्मयी तीरोडकरचे "माझ्या सारंगा राजा सारंगा". श्वास पुरत नव्हता असे वाटत होते. खालचे सूर नीट लागले नाही. गाणं चांगले झाले असे परीक्षकांचे मत होते. "प" मिळाला.
तिसरे गाणं म्हणायला आली श्रुती विश्वकर्मा "नाही कशी म्हणू तुला". श्वास नीट पुरत नव्हता खालचे सूर स्थिर लागत नव्हते. सलीलच्या मते गाणं म्हणत असताना चिंता करत असल्याने काही जागा नीट आल्या नाहीत. रोनुच्या मते relax होऊन गाणं म्हणायला हवे होते. "प" मिळाला.
मध्ये मध्ये कार्तिकीनी पण गाणी म्हटली, कार्तीकीने तिचे प्रसिध्ध "घागर घेऊन निघाली पाण्या गौळण" म्हटले. पण का कोण जाणे मला हिचे वरचे नोटस नेहमीच ओरडल्यासारखे वाटतात. तसे आजही वाटले.
चौथे गाणे सदर करायला सागर जाधवने मराठी गाणं सदर केले. "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी". गाणं खूप छान म्हटले. सगळे भाव अगदी आतून आले. ध मिळाला.
आजच्या भागातील शेवटचे मराठी गाणं म्हणायला आली उर्मिला धनगर. "हुरहूर असते तीच उरी", गाणं चांगले म्हटले. पण उर्मिलाच्या गाण्याला येते तितकी मजा आली नाही. सलीलच्या मते फक्त ९८% गायली. रोणूने पण त्याच प्रकारची comment दिली. सलीलने मुग्धाच्या गाण्याचा उल्लेख केला. सारखे कार्तिकी कार्तिकी ऐकल्यावर मुग्धाचे नाव घेतल्यावर जरा चांगले वाटले. "नी" मिळाला.
Today is the second week of the semifinal round. Rest of the 9 participants are going to sing. Pattern remains the same as last week. Today program started with Kartiki Gayakwad's "Krishne vedhili virahani bole". Today's special judge is famous flute player "Ronu Mujumdar". Actual competition started with Susmirata Dawalkar's "Bheti lagi jeeva lagalise aas". Second song was by Mrunmayi Tirodkar "mazya saranga raja saranga". Third song was by Shruti vishkarma "nahi kashi mhanu tula". In between, Kartiki sung one more song "ghagar gheun nighali panya gaulan". Then Sagar Jadhav performed "Tya kovlya phulancha bajar pahila mi". Last marathi song was by Urmila Dhangar "Hurhur asate tich uri".
Part 2
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment