आज ८ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील वर्षी झालेल्या हल्ल्याच्या स्मृती प्रीत्यर्थ हा कार्यक्रम पोलिसांना समर्पित केला होता. कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या "जयोस्तुते श्री महन्मंगले" या गाण्याने झाली. मूळ गाणं लता मंगेशकरने म्हटलेले आहे. गीत स्वातंत्रवीर सावरकरांचे आहे तर संगीत मधुकर गोळवलकरांचे आहे. कोरस मध्ये स्वरदा, मृण्मयी, अश्विनी आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. आज मार्क दिसणार नाहीत.
सलील म्हटलेल्या काही ओळी.
व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मुठ पोलादी जयांची हि धरा दासी तयांची
पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
हे श्वास येथे घ्यावयाचा.
त्यानंतर आली अश्विनी देशपांडे. "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधिला पेटली न वात" मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज संगीत वसंत प्रभू. गाणं चांगले झाले. पण खूप मनाला भावले नाही. आर्या आम्बेकारची आठवण आली. सलील ने कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली.
महापुरुष मरतात तेव्हा जागे होतात जागोजागचे संगमरवरी दगड
आणि पुन्हा एकदा त्यांचे आत्मे चिणून मारतात त्यांना दुसऱ्यांदा बहुदा कायमचेच
म्हणून महापुरुष दोनदा मरतात एकदा वैर्यांकडून आणि एकदा भक्तांकडून
असे संगमरवरी मरण तुला न लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना
त्यानंतर आली स्वरदा गोखले "ए मेरे वतन के लोगो". मूळ गाणं लता मंगेशकरचे, गीत कवी प्रदीप, तर संगीत सी. रामचंद्र. ह्या गाण्यात सुरवातीला लाडिक भाव जास्त आले, दुखद येण्याऐवजी असे मला वाटले. पण नंतर चांगले झाले. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, ऋतुजा आणि अपूर्वा होत्या.
राहुल सक्सेनाचे "जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो" गाणं झाले. मूळ गाणं गायलंय सोनू निगम, रुपकुमार राठोड यांनी, गीत आहे इसरार अन्सारी यांचे, तर संगीत आहे जतीन ललित यांचे. हे गाणं सरफरोश या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा मृण्मयी व अमर ओक होते. गाणं खूपच सुंदर झाले. अगदी मनापासून होते.
अपूर्वा गज्जला हिने "सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव शिरी", मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. अमर ओकची बासरी उत्कृष्ट. हिचे गाणे खूपच छान झाले. आता पर्यंत हिने जी गाणी म्हटली त्यातील हेसगळ्यात उत्कृष्ट गाणं होत.
Part 2
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment