Part 1
मग Danger zone मधील तिघींची गाणी झाली. संहिता प्रथम आली, "ये रे घना" SMS मध्ये चौथ्या क्रमांकावर होती असे म्हणणे होते. मूळ गायिका आशा भोसले, गीत आरती प्रभू यांचे आणि पं हृदयनाथ मंगेशकर यांचे. हिचे पं गाणं मध्ये मध्ये श्वासाला जरा चुकत होते. "टाकुनिया घरदार" जरा बेसूर झाले. गाणं जरा दडपणाखाली झाले असे वाटत होते. आज आपण जाणार या कार्यक्रमातून अस हिला वाटत होते कि काय असे वाटत होते.
त्यानंतर आली स्वरदा गोखले. "काय बाई सांगू कशी ग सांगू" मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शांत शेळके यांचे आणि संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे. हे गाणं पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातील आहे. गाणं ठीक झाले. खूप मस्त झाले अस वाटले नाही. गाणं लाडिक झाले तसेही हिचे गाणं तसच असते नेहमी.
अवधूतने काय बाई सांगू चे remix म्हटले.
त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "केळीचे सुकले बाग". मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत कवी अनिल यांचे आणि संगीत यशवंत देव यांचे. गाणं खूपच सुंदर झाले. वरचा सूर नीट लागला नाही असे अवधूतला वाटले. सलीलच्या मते अपुर्वाचा आवाज खूप सुंदर आहे.
आता निकाल, अपूर्वा, संहिता आणि स्वरदा Danger Zone मध्ये होत्या. सलील पण देवाची प्रार्थना करत होता. संहिताच्या अंगावर जेव्हा लाल दिवा पडला तेव्हा अपूर्वा तो दिवा आपल्या अंगावर पडतो कि काय असे बघत होती. इकडे मृण्मयी रडत होती. पण संहिता अगदी मजेत होती.
मार्क या प्रमाणे
संहिता चांदोरकर, परीक्षक ७१.६७%, SMS ११.६५
अपूर्वा गज्जला, परीक्षक ७५%, SMS ५.४७%
स्वरदा गोखले, परीक्षक ७२.३३%, SMS २०.११%
अश्विनी देशपांडे, परीक्षक ७७.३३%, SMS ५.१८%
राहुल सक्सेना, परीक्षक ७७.६७%, SMS ४.९०%
अभिलाषा चेल्लाम, परीक्षक ७८%, SMS ५.९५%
उर्मिला धनगर, परीक्षक ७८.६७ %, SMS २१.०६%
मृण्मयी तिरोडकर, परीक्षक ८१.६७%, SMS १९.०६%
ऋतुजा लाड, परीक्षक ९३.३३%, SMS ६.६१%
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment