Part 1
उर्मिला धनगरचे "रे नंदलाला तू छेडू नको ". राग मिश्र किरवाणी मधील हे गाणं शोभा गुर्टू यांनी गायले आहे. गीत उमाकांत काणेकर तर संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे. अधीर याद तुझी या अल्बम मधील हे गाणंआहे. गाणं चांगले झाले पण आजचे गाणं इतके छान झाला नाही म्हणजे बेसूर वगैरे कुठेच झाले नाही पण मजा आली नाही. सूर लावताना आवाजात कंप होता असे मान्यवर परीक्षकांचे मत होते. अवधूतने आणि सलीलने ध इतके कमी मार्क कधीच उर्मिलाला मिळाले नव्हते.
उर्मिला नंतर आला राहुल सक्सेना "प्रथम तुज पाहता जीव वेडावला". मुंबईचा जावई या चित्रपटातील, राग कलावती वर आधारित, हे गाणं रामदास कामत यांनी गायले आहे. ग. दि. माडगुळकरांचे गीत असून संगीत सुधीर फडकेंचे आहे. स्पर्श या शब्दामध्ये हिंदीची झाक येत होती सगळ्या ताना एकदम स्वच्छ आल्या काही ठिकाणी बेसूर झाले असे सलीलचे मत होते शुभा मुदगलच्या मते जरा संयमाने गायला हवे कारण उगाच आलाप आणि ताना घेण्याची गरज नाही आहे दोन ध मिळाले.
त्यानंतर आली अश्विनी देशपांडे " विकल मन आज झुरत असहाय". राग सरस्वती वर आधारित हे गाणं बकुल पंडित यांनी गायले आहे. गीत शांता शेळके यांचे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे. हे गाणं "हे बंध रेशमांचे" या नाटकातील आहे हि शास्त्रीय गाणं जास्त चांगले म्हणते हे परत या गाण्यावरून सिद्ध झाले पण हिचा आवाज नाकातून येतो बरेचदा असे मला जाणवते . गाणं छान झाले असे अवधूत म्हणाला श्वासावर नियंत्रण हवे . हे गाणं राग सरस्वती मधील आहे असे शुभा मुदगल म्हणाली सलीलचे उदाहरण मस्त होते . दोन्ही ध मिळाले .
शेवटचे गाणं सदर करायला आली अभिलाषा चेल्लम ऋतू हिरवा ऋतू बरवा ". राग चारुकेशी वर आधारित हे गाणं आशा भोसले यांनी गायले आहे. संगीत श्रीधर फडके यांचे तर गीत शांता शेळके यांचे आहे. हे गाणं ऋतू हिरवा या अल्बम मधील आहे. गाणं मस्तच झाले हिच्या कुठल्याच उच्चारात हिंदी किंवा तमिळची झाक येत नाही कोरस मध्ये अपूर्वागज्जला ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे होत्या कोरस मस्त झाले गाणं सोडताना जरा नित आले नाही असे अवधूत म्हणत होता आवाज खूप छान आहे असा शुभा मुदगलचा शेरा होता सलीलचे उदाहरण मस्त होते परत दोन ध मिळाले.
आजचा best performer म्हणून ऋतुजा लाड होती.
कार्यक्रमाची सांगता शुभा मुदगलच्या गाण्याने झाली. "तेरे बाके नैनो ने जादू डाला सावरिया."
Urmila Dhangar sings "re nandalala tu chhedu nako". Song based on Mishra Kirwani. Original singer Shobha Gurtu, written by Umakant Kanekar and composed by Shrikant Thakare, is from "adheer yaad tuzi". After this Rahul Saxena performs "pratham tuj pahata". Song is from Mumbaicha Javai, sung by Ramdas Kamat, written by G.D.Madgulkar and composed by Sudheer Phadake. Ashwini Deshpande sung "vikal man aaj zurat asahay", based on raag Sarswati, written by Shanta Shelke, composed by Jitendra Abhisheki, is from "he bandh reshamanche". Last song was by Abhilasha Chellam, "rutu hirva rutu barva". Original singer is Asha Bhosale, composed by Shreedhar Phadake, written by Shanta Shelke and is from album "Rutu Hirva". Todays best performer was "Rutuja Laad". Program ended by Shubha Mudgal's song "Tere baake nainone jadu daala savariya".
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment