पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धक घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आज दाखवणारे मार्क ८०% परीक्षक तर २० टक्के SMS आहे. सलीलने खूपच छान ४ ओळी सांगितल्या.
तसे नसते कोणीच आपले कसले मित्र कसली साथ
फक्त बारा सखे तुझे पाच काळे पंढरी सात.
कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. प्रथम क्रमांकावर होती ऋतुजा लाड. "चंद्रिका हि जणू" ह्या गाण्याचे सादरीकरण केले. मूळ गायक पं हृदयनाथ मंगेशकर. गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत गोविंदराव टेंबे. संगीत मानापमान या नाटकातील हे पद आहे. आजपासून SMS ला ३०% महत्व असणार आहे.




दुसऱ्या नंबर होती मृण्मयी तिरोडकर. "हि सांज सुखाने सजलेली, अन दरवळणारा श्वास तुझा". मूळ गायिका वैशाली सामंत. गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते, अल्बम "हि सांज सुखाने". गाणं छान झाले. अवधूत आणि सलीलच्या आपापसातील गप्पा मजेशीर होत्या.




तिसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. "झाल्या तिन्ही सांजा, करुनी शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा" हे गाणं सदर केले. मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत राम-लक्ष्मण. हे गाणं तुमचे आमचे जमलं या चित्रपटातील आहे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. "पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे" मूळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे यांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचे. खूपच सुंदर म्हटले. हिचे उच्चार खूपच छान आहेत. अवधूतच्या मते अंतरात लय नीट जमली नाही





पाचव्या नंबर वर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात कमी SMS आले असे म्हणणे होते. "राधा हि बावरी". याचे उच्चार नीट आले नाहीत. विशेषता रंग, शामरंग, वाट, हे नीट जमले नाहीत. मूळ गायक स्वप्नील बांदोडकर, संगीत आणि गीत अशोक पत्की, यांचे. हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे. हा नको तिथे हरकती घेतो.





सहाव्या क्रमांकावर होती अश्विनी देशपांडे. "पाखरा जा दूर देशी". मूळ गायिका सुमन कल्याणपूर, गीत अशोकजी परांजपे यांचे आणि संगीत अशोक पत्की यांचे. सलीलच्या मते गाणं दडपण ठेवून म्हटले. अवधूतच्या मते पण जरा पाखरांचा balance जरा हलत होता.



Part 2

0 comments: