Part 1
उर्मिला धनगरने म्हटले "मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे". मूळ गायक सोनू निगम, मनमोहन सिंग, गीत समीर यांचे, तर संगीत ए. आर. रहमान यांचे. हे गाणं The Legend of Bhagat Sing या चित्रपटातील आहे. गाणं अप्रतिम झाले. अगदी मनापासून म्हटले.
सलील कुलकर्णीने आज "दमलेल्या बापाची या कहाणी तुला" हे गाणं म्हटले.
मृण्मयी तिरोडकरने "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी". मुळ गायिका आशा भोसले. गीत ग. दि. माडगुळकर यांचे तर संगीत दत्ता डावजेकर यांचे. "पाहू रे किती वाट" या सिनेमातील हे गाणं आहे. गाणं चांगले झाले.
शेवटचे गाणं म्हणायला आली अभिलाषा चेल्लाम. "वंदे मातरम" , मूळ गायिका लता मंघेष्कर, गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय, संगीत हेमंत यांचे , चित्रपट आनंद मठ. कोरसमध्ये होत्या स्वरदा, मृण्मयी, ऋतुजा आणि अपूर्वा
कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मान्यवर पोलिसांना स्टेजवर बोलावून झाली.
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment