पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धकांना घेऊन स्पर्धा सुरु झाली काल सुस्मिरता बाहेर पडली. आजचे मान्यवर परीक्षक शुभा मुदगल आज पल्लवीचा ड्रेस खूप छान होता आणि मुख्य म्हणजे ड्रेस वरची ओढणी ड्रेसला सूट होत होती. आता या आठवड्यात ८०% परीक्षकांचे मार्क आणि २०% SMS असे गणित असणार आहे. मान्यवर परीक्षकांचे मार्क दिसणार नाहीत, (याचा अर्थ ते मार्क नंतर manipulation साठी वापरता येतील )

आजचा कार्यक्रम समूह गीताने झाला. "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". शेजारी या सिनेमातील हे गाणं आहे.





अपूर्वाच्या गाण्याने स्पर्धेला सुरवात झाली "ना मानोगो तो दुंगी तुम्हे गारी रे". आज सगळे स्पर्धक गाण्यावर आधारित गाणी म्हणणार आहात. त्याप्रमाणे हे गाणं "मालकंस" या रागातील होते. गाणं जास्त भावपूर्ण हवे होते. श्वास पुरत नव्हता असे अवधूतचे मत होते. अवधूतने "ध" तर सलीलने "प" दिला.




दुसरे गाणं मृण्मयी तीरोडकरचे "घनु वाजे घुणघुण वारा वाहे रुणझुण". राग बागेश्री मधील हे गाणं आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत, आणि लता मंगेशकरच्या आवाजात हेमुळ गाणं आहे. गाण्याची सुरवात म्हणावी तितकी छान झाली नाही. सुरवातीचा आलाप अगदीच जमला नाही. दोन ध मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले "येणार नाथ आता". राग धानी वर आधारित असलेले हे गाणं सुवासिनी या चित्रपटात आशा भोसलेच्या आवाजात, संगीत सुधीर फडकेचे आणि गीत ग दि माडगुळकरांचे आहे. गाणं चांगले झाले. पण खालचे स्वर तितकेसे छान लागले नाहीत असे शुभा मुदगलचे मत होते. दोन प मिळाले.




नंतर आली रुतुजा लाड "घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद". राग सालगवराळी वर आधारित हे गाणं पं. जितेंद्र अभिषेकी यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात गायलेले आहे. याचे बोल पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे तर संगीत जितेंद्र अभिषेकीचेच आहे. गाणं खूपच मस्त झाले. हि सगळीच गाणी मस्त म्हणते. हिचा आवाज अगदी मधुर नाही पण खूप सुरेल आहे. दोन नी मिळाले.





त्यानंतर आली संहिता चांदोरकर "प्रभुजी गमला मनी तोषला." भैरवी मधील हे गाणं बालगंधर्वांनी गायलेले आहे. गीत विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे तर संगीत गंधर्व नाटक मंडळी यांचे. हे गाणं एकाच प्याला या नाटकातले आहे. जरा शांत होऊन गाणं म्हणायला हवे होते असे सलीलचे मत होते. घाईघाईत म्हटले असे शुभा मुदगलने म्हटले. अवधूतने ध व सलीलने "प" दिला.





Today all the participant will sing "raag" based songs. The program starts with the group song, "lakh lakh tejachi nyari duniya". First song in the competition is by Apurva Gajjalla "na manogo to dungi tumhi gaari re". Song is based on Malkans. Second song is by Mrunmayi Tirodkar "ghanu waje ghunghun vara vahe runzun". Based on raag "bageshri". This song is by Sant Dnyaneshwar, composed by Hrudayanath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar. Third song was by Swarada Gokhale "yenar naath ata". Based on raag dhani, sung by Asha Bhosale, composed by Sudhir Phadake and written by G. D. Madgulkar. This song is from movie "suwasini". Forth song was by Rutuja Laad, "ghei chaand makarand, priya ha milind", composed by Jitendra Abhisheki, written by Purushottam Darvhekar, sung by Jitendra Abhisheki. This song is from "katyar kalajat ghusali". Then comes Sanhita Chandorkar "Prabhuji gamala mani toshala". Original singer Balgandharva, written by Viththal Sitaram Gurjar, and composed by Gandharva natak mandali. Song is from Ekach Pyala.


Part 2

0 comments: