आज दूसरा दिवस आणि आज कोणीही बाहेर पडणार नाही. आजचे परीक्षक आहेत रवींद्र साठे. पहिले स्पर्धक होती मृण्मयी तिरोडकर "कहना हि क्या". कोरस मध्ये शेवटी काहीतरी तालाची गडबड झाली. मृण्मयीच्या स्वरात कंप जाणवला. आज रवींद्र साठेचे मार्क दिसणार नाहीत. अवधूत आणि सलील कडून "नी" मिळाला.
दुसरे गाणं म्हणायला आली स्वरदा गोखले, "जिया ले गयो जी मोर सावरिया". सुरवातीचे स्वर अगदीच बेसूर झाले. पण तिच्या लक्षात आले. गाणं बेसूर झाले बरेच. "बासुरीया " म्हणताना बेसूर जाणवत होतेच. "ध" मिळाला. पण ध च्या लायकीचे गाणं निश्चित झाले नाही.
तिसरे गाणं म्हणायला आली ऋतुजा लाड "हिरे मोती मै न चाहू". गाणं इतके छान झाले नाही. म्हणजे काय चुकलं ते सांगता येत नाही पण गाणं मनाला भावले नाही. गाणं छान झाले असे परीक्षक म्हणाले, मार्क "ध" आणि "नी" मिळाला.
चौथे गाणं म्हणायला आली संहिता चांदोरकर "जबान पे लगा लगा". गाणं चांगले झाले. सलीलच्या मते जरा हाताचे राखून गायलीस. त्यामुळे बहुतेक त्याने पण हाताचे राखून मार्क दिले. "नी" व "ध" मिळाला.
पाचव्या गाण्यापासून मराठी गाण्याची सुरवात झाली. सुस्मिरता डवालकर आली "कौसल्येचा राम बाई". हे गाणं एकदमच संथ आहे. त्यामुळे संहिताच्या गाण्यानंतर एकदम मिळमिळीत वाटले. "राम" नीट ऐकू आला नाही तो जरा स्पष्ट म्हणावा असा एक सल्ला होता. दोन्ही "ध" मिळाले.
मग आली अपूर्व गज्जला, "तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल". गाणं चांगले म्हटले. गाणं सुरवातीला जरा बेसूर झाले. पण नंतर गाणं चांगले झाले. दोन्ही "ध" मिळाले.
त्यानंतर राहुल सक्सेना आला "काळ देहासी आला खाऊ". गाणं चांगला झाले. पण अति जास्त नको तिथे ताना घेतल्या. आणि काही ठिकाणी थोडे बेसूर पण झाले. मराठीतील उच्चार आले नाहीत. दोन "ध" मिळाले.
Today is the second day of the first final week. Today no one will be out of competition. Only the best performer will be announced. Today's special judge is Ravindra Sathe. First song was by Mrunmayi Tirodkar "kahana hi kya jo nain ek anjan se mile". Second song was by Swarada Gokhale "jiya lo gayo ji mora savariya". Third song was by Rutuja Laad "hire moti mai na chahu". Forth song was by Sanhita Chandorkar "jaban pe laga laga". From fifth song Marathi songs started. This was done by Susmirata Davalkar "kauselyecha raam bai ". Sixth song was by Apurva Gajjala "tumhavar keli mi marji bahal" Seventh song was by Rahul Saxena "kaal dehasi aala khau".
Part 2
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment